पुस्तक परिचय क्रमांक:२४१ हे जीवना रिलॅक्स प्लीज
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२४१ पुस्तकाचे नांव-हे जीवना, रिलॅक्स प्लीज! लेखक : स्वामी सुखबोधानंद प्रकाशन-प्रसन्ना ट्रस्ट,बॅंगलोर प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण, ऑक्टोबर,२००३ पृष्ठे संख्या–२५५ वाड़्मय प्रकार- कादंबरी किंमत /स्वागत मूल्य-१२५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २४१||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव-हे जीवना, रिलॅक्स प्लीज! लेखक:स्वामी सुखबोधानंद 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 अकल्पित घटनांना सामोरे जाताना तणावमुक्त जीवन कसं जगावं.हे पटवून देणारं पुस्तक.योगिक विद्वत्तेतून जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे?याची माहिती करून देणारं,विक्रीचा उच्चांक प्रस्थापित केलेलं, ‘हे जीवना, रिलॅक्स प्लीज!’ हे पुस्तक स्वामी सुखबोधानंद यांनी त्यांना आलेले अनुभव शब्दात मांडले आहेत. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.पण त्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलायला लावणारं हे पुस्तक आहे. बुद्ध,येशू ख्रिस्त,श्रीकृष्ण, सुफी,ताओ आणि झेन यांच्या विचारांची सद्सद्विवेक बुध्दीने अलौकिक दिव्यत्वाची प्रचिती करून देणारं ...