पुस्तक परिचय क्रमांक:२३० जुगलबंदी

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२३० पुस्तकाचे नांव-जुगलबंदी लेखक: शंकर पाटील प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती -पुनर्मुद्रण,ऑक्टोंबर२०१८ पृष्ठे संख्या–११६ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २३०||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव: जुगलबंदी लेखक: शंकर पाटील 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 तमाम महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना पोटधरून हसायला लावणारे,ग्रामीण जीवनाचा वेध व्यक्ति चित्रांतून घेणारे पटकथाकार,जेष्ठ कथालेखक, सुप्रसिद्ध विनोदी कथाकथनकार शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक अढळ स्थान मिळवून आहे.त्यांच्या ग्रामीण कथा म्हणजे मराठी साहित्याला मिळालेले लेणे आहे.ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे पारदर्शी चित्रण व खुमासदार संवाद आपल्याला त्यांच्या अनेक कथांतून अनूभवायला मिळतात.ऐकायला व वाचायला मिळतात. नैसर्गिकपणे आसलेला कोल्हापुरी भाषेचा बाज हा त्यांच्या कथेला ताजेपणा आणि जिवंतपणा आणतो. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन यांचा...