सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी

व्याजवाडी केंद्र समूहाच्या मुख्याध्यापिका सौ.नलिनी जाधव यांच्या सेवा गौरव समारंभात धान्य व वही तुलादान आणि उपस्थितांचे स्वागत फुलझाडांचे रोपटे देऊन केले.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक उपस्थितांनी केले. जाधव बाईंचे पिताश्री रघुनाथ कदम,पहिले शिक्षक सहकारी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री.बा.की. गायकवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सौ. विजया कांबळे , सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सौ.नकुसा देशमुख मॅडम, श्रीमती रोहिणी निकम मॅडम, श्री विलास पोळ आणि पती श्रीमान भानुदास जाधव यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाला.यावेळी सुपुत्र श्री.रोहीत आणि संकेत, सूना मीनल व सौजन्या आणि नातवंडे यांच्या शुभहस्ते जाधवबाईंची धान्य,गुळ आणि वही तुला केली. श्री बाबूराव गायकवाड,श्री प्रदीप फरांदे, श्री नारायण शिंदे,सौ.शारदा शिंदे सौ.मुक्ता शिंदे,सौ ज्योती नेमाडे,सौ.ललिता गायकवाड मॅडम आणि स्नुषा सौ मीनल जाधव यांनी गौरवपर मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तदनंतर वाई तालुका शिक्षक मित्र परिवाराच्या वतीने शैक्षणिक कार्याच्या गौरवार्थ ‘मानपत्र’ देऊन...