शिक्षक क्षमता समृध्दी तृतीय दिन अहवाल









महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, आणि जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था फलटण तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांचे(इ.१ते ५वी) सक्षमीकरण व क्षमता वृद्धि प्रशिक्षण 
वर्ग क्रमांक -२
दिनांक -१० ते १४ फेब्रुवारी २०२५
               तृतीय दिवसाचा अहवाल 

दिनांक १२ फेब्रुवारी २०२५

 प्रशिक्षण वर्गाच्या तृतीय दिवसाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने केली.तदनंतर प्रस्तावनेत गेल्या दोन दिवसांचा फीडबॅक श्री.रविंद्र लटिंगे यांनी घेतला.अध्ययन अध्यापन प्रक्रिया, संकल्पना आणि कार्यनीती या घटकांना स्पर्शून क्षमता आधारित विचार प्रवर्तक ही तासिका सुलभक श्रीम.अश्विनी जाधव यांनी सुरू केली.मूल्यांकनासाठी प्रश्ननिर्मिती करण्यापूर्वी शिक्षकाने सजग कसे असावे.अशी प्रस्तावना करत मानवी विचार प्रक्रिया कशी घडते.यावर स्पष्टीकरण देऊन जिज्ञासा विषयी प्रश्नावर चर्चा घडवून आणली.प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांनी या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
ब्लूम यांच्या श्रेणीबध्द वर्गीकरणातील स्तरांची आवश्यकता सांगून सोदाहरण स्पष्ट केले.तदनंतर निम्न व उच्च स्तरीय विचारांचे स्पष्टीकरण केले.सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी चर्चेत सहभागी होऊन घटक समजून घेतला.
दुसरी तासिका सुलभक श्री.दत्तात्रय नाळे सरांनी  विचार कसा करावा याविषयी दोन विशेष वाक्य देऊन त्यावर चर्चा घडवून आणली.तदनंतर क् ज्ञान,आकलन उपयोजन, विश्लेषण सर्जनशीलता, तर्काधिष्ठित ,आवर्ती प्रश्न आणि समस्याप्रधान प्रश्नावर सोदाहरण पटवून दिले.याच वेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणच्या अधिव्याख्याता श्रीम.माळी मॅडम आणि विडणी केंद्रप्रमुख श्रीम.दिक्षीत मॅडम यांनी भेट दिली.त्यांचे स्वागत साधनव्यक्ती श्रीम.दमयंती कुंभार मॅडम यांनी केले.माळी मॅडमने शिक्षक क्षमता समृध्दी २.० यातील महत्त्वाचे घटक का महत्वाचे आहेत.याची माहिती दिली.तदनंतर तासिका तशीच पुढे सुरू झाली.तदनंतर प्रश्न निर्मितीचे गटकार्य कसे करावे.याचे प्रात्यक्षिक नमुने पीपीटी द्वारे सादरीकरण केले.क्षमता आधारित ओघतक्ता समजावून दिला.
दुपारच्या भोजनानंतर सुलभक  श्री.संजय 
भोसले सरांनी संख्या ज्ञान क्षमतेवर पायाभूत घटाचे बडबडगीत सादर केले. तदनंतर ‘अटक कोणाला झाली’या अॅक्टिव्हीटीवर चर्चा घडवून आणली. विचार करून उत्तर कसे द्यावे.याची पडताळणी घेतली.चोरी कोणी केली?त्यांचे स्पष्टीकरण प्रातिनिधिक स्वरूपात घेतले.तदनंतर चौथी CBA-७,८,९  या घटकांचे गटकार्य घेतले.
शिक्षकांचे गट पाडून विषय वाटून अध्ययन निष्पत्ती नुसार प्रश्न प्रकारांचे गटकार्य श्री विशाल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले.इतर सुलभकांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना  गटकार्य कसे लिहायचे?याचे गटागटात मार्गदर्शन केले.तसेच प्रातिनिधिक स्वरूपात गटकार्याचे सादरीकरण घेतले.विशेषत: नवनिर्मिती आणि मूल्यमापन प्रश्ननिर्मिती यावर गटातील शिक्षकांनी गरजेनुसार दुरुस्ती सुचवली.सादरकर्त्यांचे अभिनंदन करुन चौथ्या दिवसांच्या तासिकांचे वेळापत्रक आणि प्रशासकीय सूचना साधनव्यक्ती श्रीम दमयंती कुंभार मॅडम यांनी देऊन सत्राचा आढावा घेऊन समारोप केला.



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड