शिक्षक क्षमता समृध्दी द्वितीय दिवस अहवाल







महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, आणि जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था फलटण तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांचे(इ.१ते ५वी) सक्षमीकरण व क्षमता वृद्धि प्रशिक्षण 
दिनांक -१० ते १४ फेब्रुवारी २०२५
              वर्ग क्रमांक -२

       द्वितीय दिवस अहवाल 

प्रशिक्षणाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने करून प्रशिक्षणाला सुरुवात केली.प्रथम सुलभक श्री. दत्ता नाळे सरांनी 
क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया या CBA-1 तासिकेचा फीडबॅक घेऊन आजच्या तासिकांचे वेळापत्रक सांगितले.
क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन संकल्पना CBA-2या पहिल्या तासिकेची प्रस्तावना सुलभक श्री.महेश धुमाळ सरांनी पीपीटी द्वारे केली. शिक्षणाची लक्ष्ये ते अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षणार्थींशी आंतरक्रिया साधत गटचर्चा केली. क्षमता म्हणजे काय? मूल्यांकन व मूल्यमापन यातील तुलना करत फरक स्पष्ट करुन दिला.
मूल्यांकनाचे स्वरूप, आकारिक व संकलित मूल्यमापन आणि क्षमतेवर आधारित अध्यापन पद्धती याविषयी समर्पक शब्दात विवेचन केले.तदनंतर 
थ्री एडियटस सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप दाखवून त्यावर वैचारीक चिंतन करायला उद्युक्त केले.आईसब्रेकिंग सदरात तुमच्यात कोणत्या ‘क्षमता’ आहेत त्यांची नावे लिहा.यावर चर्चा घडवून आणली.सद्यपरिस्थितीतील मूल्यांकन यावर मार्गदर्शन केले.
  दुसरा तास सुलभक श्री विशाल खताळ यांनी क्षमता आधारित मूल्यांकन कार्य नीती CBA-3या विषयावर खेळीमेळीच्या वातावरणात सुरुवात केली.क्षमतांची निश्चिती कशी करावी? मूल्यांकनाची कोणती पध्दत निवडावी? तसेच पीपीटीतील चित्र निरीक्षण करायला लावून 
त्यावर चर्चा घडवून आणली.अनेक प्रशिक्षणार्थींनी मतमतांतरे व्यक्त केली. त्याचे समर्पक व अचूक शब्दात माहिती सांगितली.पतीच्या उपचारासाठी मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेती झालेल्या लता आजींची कथा सांगून क्षमतेचे मार्मिक उदाहरण दिले.तसेच सचिन तेंडुलकर,उद्योगपती रतन टाटा,लता मंगेशकर यासारख्या दिग्गजांची क्षमता समृध्दी यावर विश्लेषण करून तासिकेची सूत्रे सुलभक श्री विजय रिटे यांच्याकडे दिली.सरांनी क्षमताधारित मूल्यांकनाची कार्यपद्धती मूल्यांकनाचे घटक आणि त्यातील रुब्रिक्स या शब्दाचा नेमका अर्थ त्यांचे मूल्यांकनातील महत्त्व पटवून दिले.मळलेल्या वाटेनेच आपली पाऊले पडतात.आपण बदल सहजपणे स्विकारत नाही किंवा वेगळी वाट चोखाळत नाही. यावर आधारित रांगोळीच्या ठिपक्यांची मोकळीका घेतली.विविध विषयातील मूल्यांकनाचे फायदे सोदाहरण स्पष्ट केले.
शिक्षण विस्तार अधिकारी श्री दारासिंग निकाळजे यांचे स्वागत साधन व्यक्ती श्रीम. दमयंती कुंभार मॅडम यांनी केले. सरांनी या प्रशिक्षणाचा मुख्य हेतु कथन करुन यातील घटकांचा शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोग करणे आवश्यक आहे.
भोजनानंतर CBA-4 क्षमता आधारित प्रश्न प्रकार ही तासिका सुलभक श्री. अनिल भंडलकर यांनी ज्ञानप्राप्तीचे मूलभूत साधन प्रश्न आहे.अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे.प्रश्न आणि मूल्यांकन संकल्पना सविस्तरपणे स्पष्ट केल्या. तदनंतर स्मृती जाधव मॅडम यांनी हीच तासिका पुढे मूल्यांकनिसाठी प्रश्न निर्मिती आणि प्रकार यांचे विवेचन करून एका घटकावर  प्रश्न निर्मितीचे गटकार्य करायला सांगितले. त्याचे सादरीकरण करण्यात आले.मुक्त आणि आवर्ती प्रश्न प्रकारांचे समर्पक शब्दात सुलभतेने स्पष्ट केले.
चतुर्थ तासिका CBA-5 क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती कौशल्य सुलभक श्री. मतिन शेख यांनी आशयाशी निगडीत एका गोष्टीवरून समजावून सांगितले.प्रश्न निर्मितीची गरज आणि हेतू, शास्त्रीय निर्मितीचे आधार या विषयावर चर्चा घडवून आणली.तदनंतर सुलभक श्रीम. सीमा भोईटे मॅडम यांनी समज पडताळणी व प्रश्नांचे स्तर आणि ओघतक्ता आपल्या ओघवत्या शैलीत पटवून दिला.तसेच थोर शास्त्रज्ञ निकोला टेस्ला यांच्या संशोधनपर  कार्याची यशोगाथा स्व: आवाजातील ऑडिओ क्लिप द्वारे ऐकवली.
प्रशिक्षणाच्या मार्गदर्शक साधनव्यक्ती श्रीम. दमयंती कुंभार मॅडम यांनी आजच्या सत्राचा आढावा घेऊन उद्याच्या सत्राचे नियोजन सांगून समारोप केला.


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड