शिक्षक क्षमता समृध्दी प्रथम दिन
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, आणि जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था फलटण तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांचे(इ.१ते ५वी) सक्षमीकरण व क्षमता वृद्धि प्रशिक्षण
वर्ग क्रमांक -२
दिनांक -१० ते १४ फेब्रुवारी २०२५
प्रथम दिन अहवाल
प्रारंभी मालोजीराजे शेती विद्यालय व ज् ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.. वेदपाठक सर,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे जेष्ठ अधिव्याख्याते डॉ.सतिश फरांदे सर ,साधन व्यक्ती श्रीम.कुंभार मॅडम संस्थेचे विश्वस्त या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलन करून प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला.
प्रस्तावना सुलभक श्री.दत्तात्रय नाळे सरांनी केली.सर्वांचे स्वागत साधन व्यक्ती श्रीमती कुंभार मॅडम यांनी केले.यावेळी शिक्षकक्षमता समृध्दीमुळे शिक्षकांचे शिक्षणातील नवीन ज्ञान अपडेट राहते.
या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण, केंद्र व राज्य अभ्यासक्रम आराखडा शाळेच्या मूल्यांकनाचे नवीन तंत्र प्रणाली तसेच समग्र प्रगतीपुस्तक या मुख्य घटकांना स्पर्श करत मूळ हेतू फरांदे सरांनी विषद केला. मा.प्राचार्यांनी प्रशिक्षणास शुभेच्छा देऊन, मुलांना भविष्यवेधी ध्येय प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचे उपयोजन करून नवनिर्मिती करता येणं गरजेचं आहे यासाठी नवनवीन तंत्रज्ञाचा वापर गरजेचा आहे.असे प्रतिपादन केले.
श्री .मतिन शेख सरांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण या तासिकेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पार्श्वभूमी कथन केली.धोरणाची ठळक वैशिष्ट्ये, शिक्षण व्यवस्था अध्ययन -अध्यापन आणि मूल्यमापन तंत्रे यांचे महत्त्व सांगितले.तदनंतर सुलभक अश्विनी जाधव यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२० दूरदृष्टी व तत्त्वे, धोरणाची वैशिष्टे,अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि मूल्यमापनातील परिवर्तन,आकृतिबंध सहज सुंदर ओघवत्या शैलीत पटवून दिला.पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर चर्चा घडवून आणली.
दुसऱ्या तासिकेची सुरुवात श्री दत्ता कोकरे सरांनी केली.प्रास्ताविकेत राज्य अभ्यासक्रम आराखडा: शालेय शिक्षण २०२४ या विषयातील आकृतीबंध आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीने सकारात्मक अशा पाठ्यक्रमाचे कामकाज सुरू आहे.आपण या सत्रात राज्य अभ्यासक्रम आराखड्याची माहिती घेणार आहोत.
तदनंतर श्री रवींद्रकुमार लटिंगे सरांनी आराखड्याची मुख्य तत्त्वे , दृष्टिकोन,अंतरसमवाय क्षेत्रे , शालेय शिक्षण, शालेय संस्कृती व प्रक्रिया आणि सहाय्यभूत परिसंस्था निर्माण करणे
या मुद्द्यावर सविस्तर विवेचन करत शिक्षणाची लक्ष्ये,अध्ययनाची मानके, पंचकोश,पंचपदी ,वेळेचे नियोजन,मूल्ये सोदाहरण स्पष्ट करुन दिली. अभ्यासक्रमाची आठ क्षेत्रे आणि ठळक वैशिष्ट्ये सांगितली.
राज्य अभ्यासक्रम आराखडा -पायाभूत स्तर २०२३ ही तिसरी तासिका सौ.स्मृती जाधव मॅडम घेतली.शैक्षणिक स्तरांची पुनर्रचना सविस्तर सांगितली.आराखड्याचे मुख्य ध्येय,प्रमुख तत्त्वे आणि अभ्यासक्रमाचे ध्येय ते अध्ययन निष्पत्ती यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.तदनंतर श्री संजय भोसले सरांनी वाचन कार्यनीती, लेखन कार्यनीती आणि भाषा साक्षरतेचे चार आयाम यावर चर्चा घडवून आणून गरजे नुसार मार्गदर्शन केले.तसेच पायाभूत स्तरावरील खेळाधारित अध्ययन अध्यापन कार्यनीती समर्पक गाणी आणि बडबडगीतातून सादर केली.
क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया या विषयी सीमा भोईटे मॅडम यांनी आशय ते क्षमता, क्षमतांच्या निश्चितीचा आधार,क्षमतेवर आधारित अध्ययन अध्यापनाचा उद्देश व मापन या उपघटकांचे सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
तदनंतर या विषयावर सुलभक श्री दत्ता नाळे सरांनी अध्यापन पध्दतीचा वापर करताना गटचर्चा कशी करावी यावर चर्चा घडवून आणली.तसेच भारतासमोरील चिकित्सकपणे अभ्यास करण्यासाठी गटचर्चा कशी घडवून आणावी.हे टास्क शिक्षकांना देऊन. त्यावर विवेचन समर्पक शब्दात केले.उद्याच्या सूचना आणि तासिकेचे वेळापत्रक सांगून पहिल्या दिवसाचा समारोप करण्यात आला.
शब्दांकन श्री रवींद्रकुमार लटिंगे
Comments
Post a Comment