शिक्षक क्षमता समृध्दी २.०
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, आणि जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था फलटण तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने
प्राथमिक शिक्षकांचे(इ.१ते ५वी) सक्षमीकरण व क्षमता वृद्धि प्रशिक्षण
वर्ग क्रमांक -२
दिनांक -१० ते १४ फेब्रुवारी २०२५
चतुर्थ दिवसाचा अहवाल
दिनांक १३ फेब्रुवारी २०२५
पार्श्वसंगीताच्या साथीने सुलभक श्री.संजय भोसले सरांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन सुरुवात झाली.तदनंतर सरांनी स्वागतगीत सादर केले.
प्रस्तावनेत क्षमता आधारित मूल्यांकनाचे प्रश्ननिर्मिती कौशल्य आणि गटकार्य यावर फीडबॅक सुलभक श्री रवींद्रकुमार लटिंगे यांनी घेतला.तसेच अहवालाचे वाचन केले. सुलभक श्री विशाल खताळ सरांनी स्कॅफ-१ शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या विषयाच्या प्रस्तावनेत समता-समानता व सर्जनशीलता -सृजनशीलता या शब्दांवर चिंतन घेतले.वरील शब्दांचाअर्थ काही शिक्षकांनी एका शब्दात, व्याख्येत व उदाहरणासह स्पष्ट केला.तदनंतर मूल्यांकन का करायचे?यावर चर्चा घडवून आणली.चर्चा सुरू असतानाच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.सतिश फरांदे सरांचे आगमन झाले.सरांनी आपल्या ओघवत्या आणि समर्पक शैलीत ‘शिक्षक क्षमता समृध्दी- २.०’या प्रशिक्षणाचे शिक्षक कर्तव्याचे महत्त्व पटवून दिले.सातत्याने व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षात किमान ५० तासांचे प्रशिक्षण होणे महत्त्वाचे आहे.याचे सोदाहरण पटवून दिले.यावेळी अचानक वीज गेलेली असताना सुद्धा सरांनी कौशल्यपूर्ण पध्दतीने आपल्या अभ्यासपूर्ण वक्तव्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.स्कॅफ आणि एचपीसी यांना स्पर्श करीत विद्यार्थी केंद्रीत राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि अभ्यासक्रम आराखड्याचे महत्त्व पटवून दिले.तदनंतर श्री.खताळ सरांनी विषय घटकातील स्कॅफची संरचना क्षेत्र ते श्रेणी स्पष्टीकरण करत सांगितले. शाळासिध्दी व स्कॅफ यातील नेमका फरक यावर चर्चा केली.
द्वितीय तासिका सुलभक श्री विजय रिटे सरांनी ‘स्कॅफ’ या विषयातील क्षेत्र क्रमांक १ते ६ या घटकांचे अर्थपूर्ण व समर्पक शब्दात विवेचन केले.प्रत्यक्ष हे टुल वापरताना क्षेत्र,उपक्षेत्र,मानके आणि स्तरातील ‘मानकांची वर्णन विधाने’ सोदाहरण सरांनी समजून सांगितली.
दुपारच्या भोजनानंतर सुलभक श्रीम.निलम कोकाटे मॅडम यांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा :परिशिष्टे या सेशनची सुरुवात कृतीयुक्त आनंददायी मनोरंजन खेळ घेऊन केली.खेळास उस्फूर्त प्रतिसाद शिक्षक -शिक्षिकांनी दिला.त्यामुळे चेतकबदल होऊन आनंददायी वातावरणात तयार झाले.शाळा मूल्यांकनिसाठी आपले नियोजन कसे असावे?यावर प्रतिक्रिया घेतल्या.
एक ते सात परिशिष्टांची ओळख उदाहरण देऊन केली.शाळा सुधार आकृतिबंध आणि शालेय सुरक्षा यावर विश्लेषणात्मक चर्चा केली.तीच तासिका पुढे सुलभक श्री रवींद्रकुमार लटिंगे सरांनी या ‘साधनाची’ ऑनलाईन माहिती भरण्यासाठी काय तयारी करावी?पुरावे उपलब्धसाठी काय नियोजन असावे?या अनुषंगाने गटकार्य करायला चिंतनात्मक प्रश्न दिले.तदनंतर ‘स्कॅफ’या टुलची थोडक्यात माहिती दिली.
चौथे सेश एचपीसी -१ सुलभक श्री. मतिन शेख सरांनी पीपीटी द्वारे प्रेझेंटेशन सादर केले.समग्र प्रगतीपुस्तक संकल्पना व पार्श्वभूमी सांगताना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०,परख, शाळा मूल्यांकन पध्दत, सद्यस्थितील प्रगती पुस्तक यावर विवेचन केले.आणि प्रगतीपुस्तकाचा हेतू विषद केला. तदनंतर सुलभक श्री अनिल भंडलकर सरांनी समग्र प्रगतीपुस्तकाची उद्दिष्टे समजावून दिली.तसेच सर्वांगीण प्रगती, सर्वसमावेशक मूल्यांकन,३६० अंशात प्रगती अहवाल, बालकांच्यातील क्षमतांचे मूल्यांकन आणि स्तरनिहाय प्रगती पुस्तक यांचे विश्लेषण केले;व प्रगती पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगितली.आणि त्यावर चर्चा घडवून आणली.
साधनव्यक्ती श्रीम दमयंती कुंभार मॅडम यांनी देऊन थोडक्यात आढावा घेऊन चौथ्या दिवसाच्या तासिकांचे वेळापत्रक आणि प्रशासकीय सूचना देऊन समारोप केला.
Comments
Post a Comment