काव्यपुष्प क्रमांक:२६५ पाऊसपाणी
पाऊसपाणी
दाट धुकं अन् रिमझिम पाऊस
थंड गारवा देतोय तनमनाला
अंगावर घेत भिजण्याची हौस
आठवण करते क्षणाक्षणाला.. ||
ओथंबून भरलेलं काळं आभाळ
क्षणाभरात रितं होवू लागले.....
रानातल्या भुईवर थेंबाची धार
नक्षीदार रांगोळी उमटवू लागले.....||
हिरव्या रानी चिंब गार वारा
पानापानातून बासरी वाजवितो ....
क्षणात डोंगरावर धुकं पसरुनी
निसर्गाविष्कार मनाला भुरळवतो....||
हिरव्यागार रानी पावसाचं पाणी
तृणपाती लतावेली गाती गाणी
धबधब्यातून उसळी दुधाळ पाणी
अंगाव शहारे आनी वाऱ्याची वाणी||
बैलं पाट्याळानी करतायत चिखलणी
खाचरात चिखल झाला मऊ लोण्यावाणी
ओठावरी येतात मग माहेराची गाणी
मुसळधार पावसात धानाची लावणी||
शब्द सुमनाचा वर्षाव 🌧️
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete