पुस्तक परिचय क्रमांक:१५१ केवळ. मैत्रीसाठी




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१५१

पुस्तकाचे नांव-केवळ मैत्रीसाठी 

लेखकाचे नांव- उमेश कदम

प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे   

प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०१६ 

डिसेंबर २०१६

पृष्ठे संख्या–१७०

वाड़्मय प्रकार- कथासंग्रह 

किंमत /स्वागत मूल्य--१८०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१५१||पुस्तक परिचय

         केवळ मैत्रीसाठी 

लेखक: उमेश कदम 

📚📚📚📚📚📚📚📚📚

आयुष्याचा प्रवासात अनुभवांची शिदोरी होते च माणसाचे वैभव असते. त्याचे अनुभव चिरकाल काळीज कप्पात रेंगाळत असतात. लेखकांना व्यवसायानिमित्ताने परदेशी वाऱ्या घडत असतात.यावेळी जगात फेमस असणारे व्यक्तिमत्त्वं आयुष्यात योगाने भेटलेतर,स्वप्नवत वाटतं.त्यांच्या सहवासाच्या क्षणांचा आनंद काळजात सुगंधासारखा दरवळतो.अन कधी शब्दांच्या फुलोऱ्यात फुलून येतो.एक आगळीवेगळी मैत्री..’केवळ मैत्रीसाठी’

‘परकीय देशांच्या मुशाफिरीतून लेखकाच्या जिवलग मित्रांचा स्नेहभाव मित्रत्व’केवळ मैत्रीसाठी’या कथासंग्रहातून उलगडून दाखविले आहे.’ अश्या अभिप्रायाची मोहर दैनिक पुण्यनगरी व नवशक्ती यांनी उठविली आहे. उच्चशिक्षणासाठी आणि कायदा सल्लागारीसाठी देशोदेशीचा प्रवास लेखक उमेश कदम यांनी केला.विविध देशांमध्ये फिरण्याची संधी त्यांना मिळाली.विविध देशाच्या विविधांगी लोकप्रिय व्यक्ती प्रवासात भेटल्या.त्यापैकी काही.जिवलग मित्र बनले.अशा मित्रांच्या कथा’केवळ मैत्रीसाठी’या कथासंग्रहात मांडल्या आहेत.साध्या सोपा सहज गप्पागोष्टींच्या भाषाशैलीत या कथा आहेत.गप्पांच्या मैफलीतून त्यांना या कथा उमजल्या आहेत.या कथेतील अनुभव गंमतीशीर आणि विस्मयकारक आहेत.

    परदेशातील पर्यटन स्थळे आणि तेथील कॉमन माणूस तटस्थपणे पाहण्यापेक्षा ते समरस होऊन समजून घेतात. परकीय देशातील सर्वांगिण पार्श्वभूमी आणि सध्यस्थितीच्या माहितीचे रसग्रहण करुन समजून घेतो. खेड्यातील जीवनशैली बघणं,गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या वस्त्यांमध्ये भटकणं, त्यांचा बाजारहाटचे बारकाईने निरीक्षण करणं, रेस्टॉरंट-बारमध्ये जाऊन निरीक्षण करणे. स्ट्रीटवरील विक्रेत्यांशी संवाद साधणे.यामधूनच कथांची बीजे कळतनकळत मनात रूजत गेली.अन् त्यांच्या कथागोष्टी झाल्या. लोकप्रिय कादंबरीकार बाबा कदम यांचे सुपुत्र लेखक आहेत.त्यामुळे साहजिकच लेखणीचा वारसा पिताश्रीकडून मिळाला. अन् तेच त्यांचे प्रेरणास्थान.

 या कथासंग्रहात मैत्रीच्या चोवीस कथा समाविष्ट केल्या आहेत.कथांची नावे  वाचतानाच कुतूहल आणि उत्सुकता वाढत जाते.एखाद्या अनोख्या विश्वाचे दर्शन विविध कथेतून घडते.डॉक्टर जुंगांची विद्यार्थी असतानाची कथा’सेरिमती जुंगा’शिर्षक कथा ‘केवळ मैत्रीसाठी’ही कथा भारत पाकिस्तान देशांतील लोकांची मैत्री वृध्दिंगत व्हावी.दोन्ही देशातील उच्चपदस्थांसमवेत लेखकाचे भोजन म्हणजे त्यांना लाभलेलं सदभाग्यच्.

छायाचित्रं आणि शुटींगच्या सवयीमुळे तेथील पोलिसांनी मला दहशतवादी ठरवून माझ्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. ती कथा‘मी दहशतवादी’तर‘फुकट फुफेट’ या कथेत एका अतिशय महागड्या अशा पर्यटनाची संधी अनाहूतपणे लेखकाच्या कुटूंबियांना कशी लाभली याची स्टोरी छानच रेखाटली आहे.अंदमान जवळील एक प्रेक्षणीय बेट फुफेट. 

 आगळगाव बार्शी येथील ओढ्यात बबन सोबत पकडलेल्या माश्यांची आठवण हजारो मैल दूर असलेल्या लाओस देशाच्या राजधानीत व्हियेतनाम येथील मेकॉंग नदीत तसेच मासे पकडायला मिळालेली संधी म्हणजे गत स्मृतींना उजाळाच.छानच आठवण ‘मेकॉंग आणि बबन’या कथेत रेखाटली आहे.कुतूहल आणि उत्सुकता निर्माण करणाऱ्या नवनवीन माहिती देणाऱ्या कथा आहेत..सुंदर शब्दात कथा मांडली आहे.


परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी