काव्यपुष्प क्रमांक:२६४ खळाळता ओहळ





         खळाळता ओहळ  


दुधाळ जलधारा वेगाने प्रवाहती

तुषार शिंपण कातळाला करती 

जलप्रवाह फेसाळत पुढे जाती

मनमयुरात थुईथुई कारंजे उडती

 


जलधारा उसळती कातळावरी

साखरनळ्यांची किमया न्यारी || 

हिरव्या शालूची किनार भरजरी

दुधनळ्यांचे खुलले रुपडे भारी ||


कड्यातून कोसळती जलधार 

जणूकाही नखरेल नटखट नार 

कातळाला करतेय अवखळ वार 

उसळवती सर्वांगी बेधुंद तुषार||


ओल्या पावसात भिजलं रानं 

पावसाचं धरतीशी नातं छान 

वारा पानातून गातोय गाणं

सरीला सप्त सुरावटीचा मान||

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड