पुस्तक परिचय क्रमांक:१४५ वेळेचे व्यवस्थापन
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१४५
पुस्तकाचे नांव-वेळेचे व्यवस्थापन
लेखक- प्रसाद ढापरे
प्रकाशक- मायमिरर पब्लिशिंग हाऊस पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-जानेवारी २०२१ अकरावी आवृत्ती
पृष्ठे संख्या–१४४
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य--१४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१४५||पुस्तक परिचय
वेळेचे व्यवस्थापन
लेखक: प्रसाद ढापरे
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
“मैं समय हूॅं|मैं अनंत काल से चला आ रहा हूॅं|मैं किसी के लिये नहीं रुका|हॉं,मगर जो मेरे साथ चला है वह हमेशा कामयाब हुआ है|”वेळ कोणासाठी कधीही थांबत नाही.हे त्रिकालाबाधित सत्य आहे.वेळेत चालून तर कधी वेळप्रसंगी त्याच्याही पुढे जाऊन दोन पावले पुढचा विचार करण्याची कला अवगत करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.असं मत प्रस्तावनेत टाईम मॅनेजमेंटचे लेखक प्रसाद ढापरे यांनी व्यक्त केले आहे.
“Precaution is better than cure” एखादी घटना घडल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा आपण अगोदर काळजी घेणं आवश्यक आहे.आपणच वेळेचा आदर करुन त्याचा पुरेपूर फायदा घेऊ.असे विचार प्रसाद ढापरे यांनी ‘वेळेचे व्यवस्थापन ‘या पुस्तकातून अधोरेखित केले आहे.जीवनात पैश्यापेक्षा वेळेला किंमत आहे.हे या पुस्तकाच्या चिंतनपर रसग्रहणातून आपल्याला समजून येते. नेमकेपणाने वेळचे भान ठेवून पूर्वनियोजन कसे असावे यावर विचारमंथन करायला लावणारे हे यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
वेळेचे व्यवस्थापनाची आखणी करताना कामाला प्राधान्य देऊन आदर्श वेळापत्रक बनवा.आपले काम शून्य मिनिटांत पूर्ण करा.वेळ खर्च करण्यापेक्षा वेळेचे गुंतवणूक करा.हाच यशस्वितेचा महामंत्र आहे.
२४तासांचा विनियोग कसा करावा?याचे आयडियल सूत्र आपण या पुस्तकातील २३घटक(प्रकरणे) वाचले की समजते.प्रत्येक प्रकरणाचे शेवटी घटकाचे विश्लेषण केले. तदनंतर नेमका संक्षिप्तपणे आशय चौकटीत सुविचार स्वरुपात दिला आहे. तर काही ठिकाणी प्रात्यक्षिक स्वरूपात तक्ते दिलेले आहेत. विवेचनात गरजेनुसार उदाहरणे आणि दाखले सत्यता पडताळून पाहण्यासाठी दिले आहेत.
किती खरे विचार त्यांनी मलपृष्ठावर दिले आहेत.जर आपल्याकडे स्वतःचे वेळेचे वेळापत्रक नसेल तर आपल्याला दुसऱ्यांचे वेळापत्रक जगावे लागते.वर्षे, महिने, दिवस, तास,मिनिटे व सेकंद वाचवण्याचे रहस्य.वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी एकदाच वेळ द्या आणि आयुष्यभर वेळ वाचवा.
आकर्षक मुखपृष्ठ आशयाचे उकल करणारे असून वेळेचे व्यवस्थापन करण्याचा महामंत्र दिला आहे.बारा तासांचे घड्याळ आपणाला पुस्तकाचा आशय वाचण्यास उत्सुकता दर्शविते.यातील तेवीस प्रकरणे आपणाला वेळेचे व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे याची जाणीव करून देतात. घटकांचे शिर्षकच व्यवस्थापनाचा महत्त्वाचा पॅटर्न आहे.शून्य मिनिटे पूर्तता,स्वनियोजन,वेळमापन,वेळेचे मूल्य, कार्यक्षमता,मार्गदर्शक घड्याळ,निर्णयक्षमता,दिवस व वर्षे वाचवा,एका वेळी अनेक कामे, आदर्श वेळापत्रक पिगी बॅंक, नियम हे महत्त्वाचे घटक आहेत.
कामांची यादी करून एकसारखी कामे एकाच वेळेला संपवा. उत्कृष्टतेचा आग्रह धरणे, तुमच्या वेळेला तुम्हीच किंमत देणे. अभ्यासासाठी मोठ्या पृष्ठांची पुस्तके वाचताना त्याचे छोटे भाग बनवून ते अभ्यासा. स्मरणशक्तीपेक्षा सिस्टीमला जास्त महत्त्व द्या. तुमच्या कामाला वेळेचे बंधन घाला. महत्वाचे काम प्रथम पूर्ण करा. युनिटीने कामे करा,जास्त वेळ जास्त कार्यक्षमता,एक दिवस एक लक्ष्य एक अडथळा असे ११नियम तयार करून वेळेचे व्यवस्थापन नियमबद्ध करा.
वेळेचे रुपांतर योग्य वेळी सोन्यात केले नाही तर त्याची माती होती. हजारो पावलांची यात्रा ही एका पावलाने सुरू होते.वेळ दिल्यास पैसे कमावले जाऊ शकतात,पण पैसे देऊन आपण स्वतः वेळ विकत घेऊ शकत नाही.नळ बंद करून आपण पाणी वाचवू शकतो,पण घड्याळ बंद करून आपण वेळ वाचवू शकत नाही.
वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी घड्याळच सर्वोत्तम मार्गदर्शक आहे.प्रत्येकाचा एक तास वेगवेगळ्या किमतीचा असू शकतो. या सुविचारातून आपणाला ‘वेळेचे व्यवस्थापन’ कसं असावं याची माहिती समजते.
धकाधकीच्या जीवनात आपले काम पुर्णत्वास नेण्यासाठी पूर्वनियोजन दिवस महिना आणि वर्षाचे कसं करावं याचं आदर्श मार्गदर्शन या पुस्तकातून अधोरेखित होते….
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment