इयत्ता सातवी निरोप समारंभ शाळा कोंढावळे २०२३

    



इयत्ता सातवी विद्यार्थी निरोप समारंभ
कोंढावळे प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ प्रमुख अतिथी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री.विलास पोळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी त्यांनी मुलांना शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन करुन गावाचे नाव उज्ज्वल करा.तुमच्या बालजीवनात संस्कारक्षम अक्षरधन पेरणाऱ्या शाळा आणि गुरुजनांचे ऋण,पितृऋण,मातृऋण आणि मायभूमीचे ऋण कधीही विसरू नका.ज्ञानवंत आणि गुणवंत व्हा.असे विचार प्रतिपादन करुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!यावेळी श्री.सुनील जाधव सरांनी अनुभव कथनपर मनोगत व्यक्त केले.तर  वर्गाध्यापक तथा मुख्याध्यापक श्री रविंद्रकुमार लटिंगे यांनी''वाचन आणि माणुसकीचे आभाळ कसं जपावं'', याविषयी मुलांशी हितगुज केले.अपर्णा कोंढाळकर, तेजस्विनी कोंढाळकर व श्रेया कोंढाळकर यांनी अनुभव कथनपर मनोगत व्यक्त केले. सातवीच्या मुलांनी श्री.सुनील जाधव सर,सौ.वर्षा पोळ मॅडम,सौ.नलिनी मुसळे मॅडम आणि स्वयंपाकी पूजा कोंढाळकर यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. विद्यार्थ्यांनी शाळेला एक आठवण भेट म्हणून एक सतरंजी दिली.स्वागत वैष्णव जांभळे, सोनाली सावंत यांनी केले. प्रास्ताविक राजश्री कोंढाळकर व आभार संस्कृती बारगे हिने मानले.सर्वांसाठी पोळ मॅडम,
मुसळे मॅडम आणि शापोआ सेविका पूजा कोंढाळकर यांनी बनवलेल्या 'पावभाजीचा आस्वाद सर्वांनी घेतला.


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड