पंगत जेवणाची गंमत मेजवानीची पितृपक्षातील पंगत
पंगत जेवणाची गंमत मेजवानीची
पितृपक्षात तर महाळाला सकस भोजनाची मेजवानी असते.यालाच महालय श्राद्ध असेही म्हटले जाते. भारतीय संस्कृती पितृपक्षाचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.भाद्रपद मासातील दुसऱ्या कृष्ण पंधरवडयास पितृपक्ष म्हणतात.यात भरणी श्राद्ध आणि महाळ श्राद्ध असते.पितरांना जेवायला घालण्याबरोबरच भावकी आणि मित्र परिवारालाही आवातणं दिलेलं असतं. केळीच्या पानावर वाढलेल्या पदार्थांची रेलचेल असते. पानाभोवती रांगोळी काढली जाते.अगरबत्तीचा मंद सुवास दरवळत असतो. केळीच्या पानावर फळांचे काप,आल्याचे तुकडे, काकडीचे काप, शाकाभाज्या, कढी,आमटी,अळुची वडी आणि बाकरवडी,बेसण पीठाच्या थापलेल्या वड्या, तळण,पापड,मेथीची भाजी, खीर, वरणभात, गोडाचा पदार्थही खास असतो.पुरणपोळी,श्रीखंड पुरी, बालुशाही, खीर चपाती,गुलाबजाम यापैकी काही नसेलतर निदान शिरा (रवा) तरी असतोच.
या महाळाच्या पंधरवड्यात दररोज कुणाच्या ना कुणाच्या घरी घरगुती पंगती उठत असतात.संपूर्ण शाकाहारी पौष्टिक भोजन.षडरिपुयुक्त हे भोजन असते. तिखट, आंबट,कडू,गोड,तुरट आणि खारट अशी चव असणारे भाजलेले, तळलेले, शिजवलेले, परतलेले, उकडलेले पदार्थ असतात.या ही पंगतीला आपल्या जवळचा परिवार असतो.तसेच हरेक कामात सहकार्य करणाऱ्या लोकांना शेजारधर्म म्हणून बोलावलं जातं.ही एक आगळीवेगळी धार्मिक मेजवानी असते.
क्रमशः भाग-६
Comments
Post a Comment