Posts

Showing posts from March, 2022

सेवागौरव समारंभ रवळेकर गुरुजी

Image
🍁सेवागौरव समारंभ🍁 आमचे डी.एड.चे शिक्षक मित्रवर्य आदरणीय श्रीमान  सुरेश  रवळेकर मुख्याध्यापक जि.प.प्राथ.शाळा-गाढवेवाडी आज सेवानिवृत्त होत आहेत.त्यानिमित्ताने….  🌸 विद्यार्थ्यांचे गुरुजी (सर) आणि आपले शिक्षकमित्र ३१ मार्च रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी ३२ वर्षापुर्वी सेवेचा श्रीगणेशा दुर्गम घेराकेंजळ शाळेत  सुरू केला.मितभाषी आणि भिडस्त स्वभावाचे आपले सन्मित्र तसेच सुंदर अक्षरांचे कौंदण लाभलेले गुरूवर्य आहेत. अनेक शाळांमध्ये त्यांच्या हस्ताक्षरांतील शैक्षणिक साहित्य विशेषतः तक्ते आणि कार्यालयातील बोर्ड भिंतीवर दिमाखात झळकत असायचे. माहितीचा कागद तर आखीव-रेखीव असायचा. सगळ्याच शाळांत पदभार त्यांच्याकडेच होता.. त्यामुळे शालेय रेकॉर्ड उत्तमरित्या ठेवलेले असायचे. विद्यार्थ्यांतच रममाण होणारे अध्यापक आणि कामावर निष्ठा ठेवणारे गुरूजी.आमच्या या मित्राने वाई आणि महाबळेश्वर तालुक्याच्या दुर्गम भागात सेवेचे व्रत पहिल्यापासूनच स्विकारले होते. निसर्गसौंदर्य आणि गडकिल्ल्यांनी युक्त असलेल्या डोंगरी भागातील माचीवरचे घेराकेंजळ, डोंगरपायथ्याची ...

क्रिकेटचे अविस्मरणीय दिवस

Image
🏆🥇क्रिकेटचे अविस्मरणीय दिवस 🏆🥇   🏆📢🎤📢📣📢📣🏅            .. 🗣️🎤🗣️🎤🗣️🎤🗣️🎤     रोमांचकारी फायनल मॅचका समालोचन करते हुये जानमाने काॅमेंट्रेटर इकबाल पठाण.....  🌧️⛈️आसमानमें कालेघने बादल आते हुये, लेकिन बारीशकी कोई गुंजाईश नहीं..... प्रेक्षकोंसे खचाखच भरा हुवा मराठी शाला का स्टेडियम...... टुर्नामेंट की आखरी मॅच.... जितने केलिए टीमको आखरी गेंदपे चाहिये चार रन .... ,दो विकेट हाथमें.....तालीम ओरसे आखरी गेंद डालते हुये विजय शेलार.... भागते भागते आकर गेंद डाली...बॅटसमनने जोरका फटका लगाया ,गेंद उंच उठाई और ये स्ट्रेट डाईव्ह, सोसायटी के नजदीक सीमा रेषेके पास आती गेंद विजय ढोकळेने पकडी....और ये विकेट गिरा.ऑल डाऊन.............और तीन रनसे कलाविष्कार टीमने यह मॅच जिती और वे पयले नंबर के हकदार बन गये.............. मैदानके नजदिक  फटाके फुटणे लगे..... और बच्चेकंपनी शोर मचाते हुये, बहुत रोमांचकारी मॅच...........       .....अशी इकबाल ची  बहारदार व जबरदस्त काॅमेंट्री.........२० वर्षांपूर्वी भरवलेल्या सामन्याची आठ...

क्रिकेटचे अविस्मरणीय दिवस दैनिक सकाळ साप्ताहिक'शब्दांकुर'या सदरातील स्मरण गंध लेख

Image
            ऋणनिर्देश 🍁🍁धन्यवाद दैनिक सकाळ आणि आदरणीय आप्पा, मनस्वी आभार …. उपक्रमशील शिक्षक या सदराने शैक्षणिक क्षेत्रात प्रयोगशील,उपक्रमशील शिक्षकांची कर्तृत्व गाथा उठावदार केलीत. दोन वर्षापुर्वीच्या फेसबुकवरील क्रिकेटच्या सामन्यांचा लेख वाचून आपण मला सदर लेख उपक्रमशील समुहावर शेअर करण्याची आज्ञा केलीत.त्या लेखास मिळालेल्या आत्मबळाने आणि अनामिक कौतुकाने माझ्या लेखणीस प्रेरणा मिळाली….त्याची फलनिष्पत्ती 'हिरवी पाती ' व 'पाऊले चालती' ही दोन माझी पुस्तके लाॅकडाऊन काळात तयार झाली.स्वप्नवत वाटणारे कार्य अचानकपणे आपल्या साक्षीने आणि सहकार्याने संपन्न झाले.साठवणीतल्या आठवणी मनात रुंजी घालत होत्या.त्या कागदावर उमटवत त्याचे विविधांगी लेखन तयार होऊ लागले.त्याची परिपक्वता यथासांग आणि वाचनीय होण्यासाठी आपण वेळोवेळी मार्गदर्शन केलेत.लेखनाच्या मौलीक टीप दिल्या.त्यामुळं लिहित्या हाताला बळ मिळालं.   लेखणीला टर्निंग पॉइंट देणारा लेख म्हणजे 'क्रिकेटचा सामना'. क्रिकेट म्हणजे आपल्या आवडीचा खेळ . त्यामुळे आपण अनेकदा यावर दिलखुलासपणे चर्चा केलीत.फोनवरुन गप्पा केल्या...

पुस्तक परिचय क्रमांक-१०४ फॉरेस्ट बाथिंग'

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१०४ पुस्तकाचे नांव-फॉरेस्ट बाथिंग हरितवनातील स्नान लेखकाचे नांव- हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस अनुवाद-निलीमा करमरकर प्रकाशक- मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती नोव्हेंबर २०२१ पृष्ठे संख्या--१७६ वाड़्मय प्रकार- ललित,  किंमत /स्वागत मूल्य--२२५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १०४|| पुस्तक परिचय           फॉरेस्ट बाथिंग लेखक:हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस अनुवाद-निलीमा करमरकर ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃निसर्गाशी एकरूप होणं, नेत्रांनी सुखद दृश्ये अनुभवणं,कृतीयुक्त अनुभवांची शिदोरी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणारी प्रतिबंधात्मकउपचार पध्दती आहे.  जंगलातील झाडं वेली,निर्झर,वारा ,ओहळ पक्षी, प्राणी हिंडायला घेऊन जाणारी अनवटवाट अथवा मळलेली वाट .अशा सृष्टी सौंदर्याने नटलेल्या परिसराला भेटणे.त्याच्याशी एकरुप होणं.देहभान विसरून रममाण होणं…..हेच जपानी चित्र लिपीतले निसर्ग प्रेमावर आ...

पुस्तकांचे गाव भिलार येथील पुस्तक भेट

Image
पुस्तकांचे गाव भिलारला भेट.... प्रदर्शनिय पुस्तक दालनास भेट... आत्मचरित्र व गडकिल्ले दालनातील पुस्तकांशी हितगुज साधताना..... संस्मरणीय आठवण भेट.... पर्यटनाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचे नवे विकास पर्व ... अप्रतिम संकल्पना........       पुस्तकांच्या गावात  महाराष्ट्र राज्य वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे ,वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी डॉक्टर वसुधा वैद्य लिखित मेघदूत (अनुवादि)ग्रंथ भेट ; पुस्तकांचे गांव भिलार येथील पुस्तक दालनात देताना..... स्वलिखित पाऊले चालती व हिरवी पाती' ही पुस्तके व गणेश तांबे संपादित'पाझर मातृत्वाचा' ही पुस्तके वाचनप्रेमी विद्यार्थी, लेखिका व शिक्षिका यांचे पुस्तकांचे गाव भिलार येथे  पुस्तकरुपी स्वागत  करताना...  तसेच आठवण भेट म्हणून कॉफीमग देताना रवींद्र लटिंगे....

काव्य पुष्प:२५५ महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

Image
💐💐💐💐💐💐💐  *जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिलांना मानाचा सलाम व हार्दिक शुभेच्छा ❗ * शुभेच्छा! शुभेच्छा! शुभेच्छा! * त्यांच्या कर्तुत्वाला  त्यांच्या नेतृत्वाला    त्यांच्या दातृत्वाला      त्यांच्या धाडसाला !  * त्यांच्या सहनशक्तीला त्यांच्या समयसूचकतेला  त्यांच्या समर्पित त्यागाला     त्यांच्या माया ममतेला! त्यांच्या अभिव्यक्तीला त्यांच्या कलाविष्काराला त्यांच्या सहकार्यवृत्तीला त्यांच्या स्वप्नानातील ध्येयाला!  🌹त्यांच्या स्नेहप्रेमाला त्यांच्या विचारधारेला  त्यांच्या सृजनशीलतेला त्यांच्या नवनिर्मितीला !  माझा सलाम ! त्रिवार वंदन* * खुप खुप आभाळभर शुभेच्छा !!! *🌹 🌹🌹🌹        

काव्य पुष्प:२५४ बहारदार काटेसावर

Image
निसर्गाची रंगपंचमी वसंत ऋतूचे स्वागत करायला बहारदार काटेसावर..... काटेसावर म्हणजे सुईरच्या झाडांची पानगळ होऊन कळया लगडायला सुरुवात होते.अन् तदनंतर काही दिवसांनी लाल शेंदरी,गुलाबी आणि पिवळ्या फुलांच्या रंगछटेत झाडं न्हाऊन निघतात.ती झाड नजरेत भरतात. विलोभनीय आणि बहारदार दृश्य मनाला भुरळ घालतं.एखादे वेळी परिसरात भटकताना त्या फुलातील मकरंद चोचायला पाखरं  झाडांवर येऊन बसतात. छोटीशी पाखरं मकरंद चाखताना बघायला फारच मजेशीर वाटते.याचवेळी पळस आणि पांगाराही फुललेला असतो. त्याचीही लालभटक छोटी छोटी फुलं नजर वेधून घेतात. आज कोंढावळे येथील कोंढमाळाला क्षेत्रभेटीत वृक्षांचे निरीक्षण करताना पिवळ्या फुलांची काटेसावर दृष्टिस पडली... बऱ्याच दिवसांनी मुलांसमवेत भटकंती.... फुलांनी लगडली काटेसावर  निळ्या आकाशी रुप गोजिरे फांद्यांना लगडली शेंदरी झुंबरे अंगाखांद्यावर फुलले फुलोरे  झाडाचे रुप नव्याढंगात साजिरे| उमलते फुल प्रतिक प्रितीचं   गुलाबी ढंगात सजण्याचं नवलाईचं रुप काटेसावरीचं दुसऱ्यांना हर्ष वाटण्याचं| पंचकार खुलली पाकळ्यांची गोलाकार तुराई पुंकेसरांची गोडसर चव मकरंदाची  फांद...