काव्य पुष्प-२४९ ना.धो.महानोर





वाचन साखळी स्पर्धा

वाचन समृद्धी कविता लेखन स्पर्धा 


 विख्यात निसर्ग कवी व गीतकार ना.धों.महानोर जन्मदिन १६ सप्टेंबर 


मातीच्या चैतन्याचे गाणे गाऊन 

शब्दांचे फुले- मळे फुलवले

शेतीत काबाडकष्ट करून 

शब्दफळांचे सुगंध दरवळले||


निथळ घामाची शाई करुन 

शेतीमातीची ओवी बहरली

खुरप्याची लेखणी करुन 

रानातली कविता फुलविली ||


रानशिवारातल्या कवितांचं

चित्रपटात झालं गाणं

रसिकांच्या मनावर कोरलं

ताल बोल अन् ठेक्यानं ||


काव्यविश्वातले निसर्ग कवी

साहित्य पंढरीचे वारकरी 

शेतीचा महिमा गाणारे 

जगाचे पोशिंदे शेतकरी||


माती अन् बोली भाषेचे 

नाते सांगणारी शब्दकळा

गाणं मातीच्या चैतन्याचे

गाऊन फुलतो फुलमळा||



स्पर्श गंध ध्वनींचा मिलाफ

निसर्ग काव्याच्या मैफिलीत

लोककथांचे व्यक्तीचित्रण 

शब्दझुल्यांच्या अंगणात||


रानातल्या कवितांचं झालं काव्य 

 निसर्गाच्या सौंदर्याचं गाणं झालं

  सूरताल लय बोल अन् ठेक्यानं 

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजलं||



श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे 

२९० अ सावित्री सहनिवास गंगापुरी वाई 

ता.वाई जि.सातारा पिन-४१२८०३

मोबाईल-७०८३१९३४११

ई-मेल -ravindralatinge@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड