पाऊले चालती प्रवासवर्णन परिचय श्री रमेश जावीर सर









......."पाऊले चालती" ....

रवींद्रकुमार लटिंगे यांचे भटकंतीचा ध्यास  पूर्ण करणारे  प्रवास वर्णन......

समीक्षक--रमेश जावीर सर खरसुंडी सांगली

        सातारा जिल्ह्यातील वाई गणपती मंदिरामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.वाईच्या गणपतीची मूर्ती भव्य असून आजूबाजूला हेमाडपंती पाषाण मध्ये नक्षीकाम केलेली बरीच मंदिरे आजूबाजूला आहेत. कृष्णा नदी चा परिसर विलोभनीय आहे.या ठिकाणी खूप सिनेमांची शूटिंग झालेली आहेत. शिवाय जवळच महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे .सातारा जिल्ह्यामध्ये अनेक गड किल्ले सह्याद्री पर्वत रांगा असल्याने निसर्ग सानिध्यात ची रेलचेल झालेली आहे .अशा या वाईमध्ये रवींद्रकुमार लटिंगे यांचा जन्म झाला ही भाग्याची गोष्ट आहे. श्रीयुत रवींद्रकुमार लटिंगे  हे  पेशाने शिक्षक आहेत. त्यांनी नुकतीच   'हिरवी पाती'   कविता संग्रह व 'पाऊले चालती 'प्रवास वर्णन  ही दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. पाऊले चालती हे ग्राममित्र पब्लिकेशन नांदलापूर तालुका कराड जिल्हा सातारा तर्फे जुलै  २०२१मध्ये प्रकाशित झाले. या प्रवास वर्णन पुस्तकात एकूण १३१ पानांचे असून त्याचे मुखपृष्ठ व रेखांकने नितीन जठार  यांनी केली आहेत. प्रवास वर्णन लेखमालेची अर्पणपत्रिका त्यांचे पिता श्री गणपत तुकाराम लटिंगे व मातोश्री सौ यमुना गणपत लटिंगे यांना केली आहे. या प्रवासवर्णन लेख मालिकेस दैनिक सकाळचे पत्रकार व स्नेही शिक्षक श्री सुनील शेडगे यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रवास वर्णन लेखमालिकेत एकूण 31 प्रवास वर्णन लेख आहेत.ते खालील प्रमाणे 1 माजी पदभ्रमंती कोंढावळे ते क्षेत्र महाबळेश्वर  2रायरेश्वर पदभ्रमंती 3 देवगड कशेळी निसर्गाचा विलोभनीय अविष्कार4 जांभळी निसर्ग पर्यटन 5 कोंढावळे परिसर पदभ्रमंती 6 परिसर भेट कमळगड  माड गणी 7वर्षा सहल मांढरदेव ते भोर घाट मार्गे ओहळी 8 निसर्ग भ्रमंती रायरेश्वर ओहळी भोर वेरुळि ते वाई7 शिवज्योत मशाल मिरवणूक रायगड ते  ओझर्डे 10 मैत्री तुर प्रतापगड पे ठपार कुंभरोशी 11 स्ट्रॉबेरीचे भिलार 12 हरिहरेश्वर मंदिर रायगड 13सहल तापोळा बामणोली 14 माझी भटकंती वासोटा 15 शिक्षक मित्रा सोबत सहल 16 धोम धरण रिंग रोड ओझर  दर्शन 17 मुरुड कोकण भटकंती 18 देव दर्शन आषाढी एकादशी करहर 19 गणपतीपुळे व रत्नागिरी वीस फॅमिली व मैत्री टूर गोवा 21 भौगोलिक कातळशिल्प 22 आनंद सागर शेगाव व जालना 23 माझी भटकंती धनगरवाडी व जोर 24 फॅमिली टूर नाशिक सापुतारा मुंबई अलिबाग 25 छंदवेड्या मित्रा

समवेत मुशाफिरी औंध खरसुंडी पोसेवाडी 26 ज्ञानज्योत मिरवणूक नायगाव ते ओझर्डे 27 माझी भटकंती मांढरदेवी 28 निसर्गरम्य बलकवडी धरण 29 नाईकबा बनपुरी  30 निसर्गाच्या सहवासात..

            आडात असेल तर पोहऱ्यात येते अशी जुनी म्हण आहे. या म्हणीच्या उक्तीप्रमाणे श्री रवींद्रकुमार लटिंगे सर हे कृती प्रधान शिक्षक आहेत. त्यांनी अध्यापन करत असताना प्रथम केले आणि नंतर सांगितले. विद्यार्थ्यास समवेत ,मित्रा समवेत, तर कधी कुटुंब समवेत त्यांनी बऱ्याच वेळा प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे, गड ,किल्ले, संग्रहालये, वेगवेगळ्या शाळा यांना भेटी दिल्या आहेत. खूप प्रवास केला आहे .केवळ प्रवास केला नाही तर त्यांनी प्रवास वर्णने लिहून काढली आहे या प्रसंगी मला प्रसिद्ध साहित्यिक गो .नी .दांडेकर यांच्या 'माझी दुर्ग भ्रमणगाथा'प्रसिद्ध साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचे 'केल्याने देशाटन'  त्याच बरोबर प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या 'माझी भटकंती'  व प्रसिद्ध मानदेशी  साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या 'काझीरंगा'  इत्यादींची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

     परिसर भेट कमळगड-माडगणी या लेखामध्ये कमळगड ते वर्णन करताना  गडाला कमळ फुला सारखा आकार प्राप्त झाला आहे. गडाच्या पायथ्याला असणारे आदिवासी लोकांचे जीवन राहणीमान वर्णन करण्यात रवी सर यशस्वी झाले आहेत. विद्यार्थ्या समवेत गडभ्रमंती करताना मुलं काव आणण्यासाठी पिशवी सोबत  घेतात काव मातीचा एक प्रकार आहे .घर भिंती रंगविण्यासाठी वापरतात. तर कधी औषध म्हणून वापरतात. इत्यादी सूक्ष्म निरीक्षण लेखकाने केले आहे . हरिहरेश्वरला रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणतात .याठिकाणी अद्भुत लाखांचा समुद्रकिनारा पहायला मिळतो. सावित्री नदी समुद्राला मिळते .नदीकाठाला गुळगुळीत दगड गोटे पहायला मिळाले. क्षणाक्षणाला बदलणारे समुद्र लाटांचे दर्शन झाल्याचे वर्णन लेखक करताना दिसतात. कोकण म्हणजे निसर्ग सानिध्याचा साठा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी ,साने गुरुजी यांची जन्मभूमी ,कवी केशवसुत, साहित्यिक मधू मंगेश करनिक, राजकारणी मधु दंडवते, शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांची जन्मभूमी ,पहायचा योग रवींद्रकुमार यांनी साधला आहे. गणपतीपुळे येथे त्यांना देव माशाचा सांगाडा ही पहायला मिळाला .पुणे जिल्ह्यामध्ये निघोज येथे कुकडी नदी मध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले रांजणखळगे निसर्ग अप्रतिम चित्रकार असल्याचे वर्णन करतात.

            Covid-19 कोरोना विषाणू संपर्क रोग साथीमुळे जगामध्ये आहाकार उडाला. या रोगाला बरीच माणसे बळी पडली. भारतामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव जाणवला .या रोगा पासून बचाव करण्यासाठी शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था उद्योगधंदे बंद ठेवावे लागले . शाळेला टाळे लावण्यात आले. अशा अवस्थेत विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये दुरावा निर्माण झाला. वाहतूक व्यवस्था ठप्प झाली .अशा कालावधीमध्ये दूरदर्शन दूरध्वनी माध्यमे चांगलीच  उपयोगाला पडली.या माध्यमांचा उपयोग करून बऱ्याच शिक्षकांनी साहित्यनिर्मिती केली. सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी ,वाई ,खटाव ,फलटण, माण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी तसेच पाचगणीचे शिक्षक पत्रकार काष्ठशिल्पकार ,कवी, ललित लेखक केंद्रप्रमुख दिपक चिकणे सर यांच्या प्रेरणेने छंदिष्ट गुरूंच्या कथा नावाचा व्हाट्सअप ग्रुप स्थापन केला. या ग्रुपच्या माध्यमातून काव्यलेखन ,प्रवास वर्णन ,काष्ट शिल्प , चित्रकला इत्यादी कला माध्यमांचा अंगीकार करण्यात आला. मीही त्या ग्रुपचा सदस्य झालो .आणि दररोज एक मी निर्माण केलेले काष्ठ शिल्प ग्रुप वरती पोस्ट करू लागलो .नवोदित कवी रवींद्र लटिंगे, कवी महादेव भोकरे ,कवी संतोष ढेबे, लक्ष्मण नरुटे ,ललित लेखक राजेंद्र वाकडे, श्री राजेन्द्र बोबडे ,डॉक्टर अशोक पाटील , नितीन जाधव ,छायाचित्रकार उद्धव निकम, कवी अंकुश लोखंडे ,यांचा समावेश होता. प्रस्तुत कवी मंडळी माझे काष्ठशिल्प वरती चारोळी काव्य करत असत .ही मालिका महिना ते दोन महिने चालली भरभरून प्रतिसाद मिळाला . सदर चारोळी काव्य मी संग्रहित केले आहे लवकरच मी त्याची पुस्तिका काढणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये श्री रवींद्रकुमार लटिंगे सरांनी आपले प्रवास वर्णन लेख त्याच बरोबर कविता ही ग्रुप वरती पोस्ट करीत असत. त्यामुळे 'पाऊले चालती'प्रवास वर्णनाचे पूर्व वाचन छंदिष्ट गुरूंच्या कथा या व्हाट्सएप ग्रुप मधून मला झाले.

         रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना मला सातारा ,रायगड, पुणे ,सोलापूर ,सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाखा तून बदल्या चा योग आला. त्यामुळे मी साहित्य लेखनाबरोबर काष्ठशिल्प संग्रह करण्याची ही कला अवगत केली .सातारा जिल्ह्यातील औंध संस्थान मध्ये भवानी चित्र संग्राहालय औंध  येथील जगप्रसिद्ध  संग्रहालयाची प्रेरणा घेऊन मी ही माझे खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली याठिकाणी जावीर काष्ठशिल्प चित्र संग्रहालय ची निर्मिती केली आहे .या संग्रहालयामध्ये 250 हून अधिक झाडांच्या मुळा खोडामध्ये पशुपक्षी मानवी आकार शोधले आहेत. ते प्रदर्शनासाठी ठेवले आहेत .त्याच बरोबर या संग्रहालयामध्ये चित्रकार सुधीर जावीर, चित्रकार सोमनाथ वायदंडे ,चित्रकार अमोल पवार ,चित्रकार बाळासाहेब पाटील ,चित्रकार धम्मपाल श्रावस्ती, चित्रकार भाऊसाहेब नलावडे ,व इतर  प्रसिद्ध चित्रकारांची दोनशेहून अधिक लँडस्केप, पोर्ट्रेट्स प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. पाऊले चालती या प्रवास वर्णन पुस्तकात  "छंदवेड्या अवलिया मित्रांसमवेत मुशाफिरी औंध खरसुंडी पोसेवाडी "हा विशेष लेखाचा समावेश करण्यात आला आहे. या लेखामध्ये रमेश जावीर यांचे काष्ठशिल्प संग्रह व पोसेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील लक्ष्मीनारायण पुराण वस्तु संग्रहालय यांचे वर्णन आले आहे. गड-किल्ल्यांचे प्रवास वर्णन करत असताना संग्रहालय यांचाही संबंध येत असतो. प्रस्तुत लेखामध्ये संग्रहालयाचे वर्णन करून श्री रवींद्रकुमार लटिंगे सरांनी वाचकांना प्रस्तुत 'पाऊले चालती' हे पुस्तक वाचण्याची प्रेरणा करून दिली आहे. भटकंती करणारे लोक छंदिष्ट व ध्येयवेडे असतात .याचे प्रत्यंतर पाऊले चालती हे प्रवास वर्णन करताना येते. मुखपृष्ठ रचना नितीन जठार यांनी केली असली तरी मूळ फोटो फोटोग्राफर कवी शिक्षक मित्र उद्धव निकम यांच्या कॅमेरातून मिळालेले आहे. कवी मनाचे भटकंती करणारे रवींद्र कुमार लटींगे मलपृष्ठावर कवितेत म्हणतात,


वन भटकंती


ओहळाचं खळाळत पाणी

 वारा गातो गुंजन गाणी 

पाखराची किलबिल गाणी 

वृक्षलतांचे सळसळ वनी


 चढ-उताराच्या जंगल वाटा

 निर्झराचे अवखळ पाणी 

किर्र झाडीतल्या अनवटवाटा

जंगल वाचूया पाउलखुणांनी


          शाळेमध्ये चार भिंतीत विद्यार्थ्यांचेही अध्यापन करत ज्ञानाचे चार शब्द कानात भरत लेखक निसर्ग सानिध्यात डोंगरदऱ्यात गड किल्ल्यात विविध तीर्थक्षेत्री संग्रहालयात वावरताना दिसत आहे .व्हिडिओ मोबाईल वरील व्हॉट्सऍप माध्यमातून प्रसारित झालेले लेख वाचून लेख आवडल्याचे कळवणारे व सदर पुस्तकाला शुभ संदेश देणाऱ्या व्यक्तींचा परिचय व त्यांचे भावपूर्ण विचार पुस्तकाच्या शेवटी श्री शरद पोतदार,श्री सुनील जाधव,श्री शशिकांत कदम वाई ,श्री अमोल माने वाई, श्री उद्धव निकम वाई ,श्री संतोष ढेबे, भास्कर पोतदार ,श्री सहदेव फणसे , श्री नितीन जाधव ,श्री दीपक भुजबळ, सौ अनिता गोरे, महेंद्र इथापे ,रवींद्र जंगम ,सौ अंजली गोडसे ,सौ शोभा पवार, अमित कारंडे , अमोल माने संगीता ,गायकवाड, स्वाती पाखरे,सौ नलिनी जाधव  ,श्री रामचंद्र टिके ,रमेश लोखंडे, नागेश जगताप ,सोमनाथ भंडलकर ,अनिल पवार, विक्रमसिंह पिसाळ ,विजय पवार इत्यादींचा नामोल्लेख व त्यांचे पुस्तका विषयीचे प्रतिक्रिया दिल्या आहेत व त्यांचे आभारही मानले आहेत

         एकंदरीत पुस्तकाची छपाई पुस्तकाची मांडणी पुस्तकाचे मुखपृष्ठ फारच बोलके, शुद्धलेखन विचार ,इत्यादीचा बारकाईनं विचार केलेला आहे. साहित्य शारदेच्या प्रांगणात श्री रविन्द्रकुमार लटिंगे यांचे पहिले पाऊल अधिक दमदार पडले आहे .

पुस्तकाच मध्ये शेवटच्या पानावर लेखक परिचयात श्री रवींद्र कुमार लटिंगे विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात .ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाखा वाईचे मार्गदर्शक आहेत. ते अनेक शैक्षणिक कार्यशाळेत सहभाग नोंदवतात. त्यांना वाई तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर त्यांना आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर फलटण जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2018 ला मिळाला आहे. त्याच बरोबर मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे गुणवंत शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2020 रोजी  प्राप्त झाला आहे आहे .ते सामाजिक कार्यामध्ये अग्रस्थानी असतात. अति पर्जन्यवृष्टी च्या काळामध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना जीवनोपयोगी वस्तू रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळवून दिल्या .समाजाविषयी, विद्यार्थ्या विषयी तळमळ व साहित्य लेखन हा त्यांचा सेवाभाव आहे .

पाऊले चालती हे प्रवासवर्णन पुस्तक भटकंती करणाऱ्या नवयुवकांना प्रेरणादायी ठरणार आहे .यापुढेही त्यांचे लेखन अधिक दमदार व्हावे. त्यांना अनेक पुरस्कार मिळवत .त्यांच्या या प्रवासवर्णनाचे शाळा, महाविद्यालय पातळीवर पर्यटन या विभागामध्ये मैलाचा दगड ठरेल अशी आशा आहे. त्यांच्या या प्रवासवर्णन लेखांचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा असे मनोमन वाटते . माझ्या काष्ठशिल्प चित्र  संग्रहालया संबंधीचा ललित प्रवास वर्णन लेख पाऊले चालती या प्रवासवर्णनपर पुस्तकात उल्लेख उल्लेख केल्याबद्दल व दखल घेतल्याबद्दल व संग्रहालयास भेट दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो .ऋण व्यक्त करतो .त्यांना त्यांच्या या पुढील लेखन वाटचालीस व भटकंती स माझ्या हार्दिक शुभेच्छा..


पुस्तक मिळवण्यासाठी पत्ता.


 पाऊले चालती            

प्रवासवर्णन लेख

 लेखक 

रवींद्रकुमार लटिंगे

 290 सावित्री सहनिवास नगरपालिका शाळा क्रमांक पाच जवळ गंगापुरी वाई सातारा महाराष्ट्र .मोबाईल नंबर-98 50 05 77 04


पुस्तक समीक्षक रमेश जावीर 

साहित्यिक, कवी ,काष्ठ शिल्प कार 

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मिती राज्य पुरस्कार विजेते

 संस्थापक अध्यक्ष

 जावीर काष्ठशिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी 

ता आटपाडी जि सांगली महाराष्ट्र राज्य 94 20 66 61 46



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड