काव्य पुष्प-२४८ कविता




           कविता 

मूक भावभावनांना मिळाली 
सजग चेतवत्या शब्दांची साथ 
कागदावर नक्षीदार उमटली 
अक्षरांची वाजत-गाजत वरात ....

उमंग विचार वलये तरंगली
हृदय गाभाऱ्याच्या अंतरंगात
लेखणीने शब्दमाला गुंफली
नवतीच्या इंद्रगोफाच्या रंगात.....

नजरेने तिची रुपं न्याहाळली
पाहुनी आशयघन गर्भाची खोली
वाणीतून प्रकटली लयबध्द बोली
बहरली मग शब्दफुलांची झोळी....

भावभावनांनी शृंखला उभारली 
हृदयाच्या स्पंदनाची शब्दावली
भारावलेल्या सुगंधानी दरवळली
ती काव्यरचना अलंकारांनी नटली....

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड