काव्य पुष्प-२४७ शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मला घडविणाऱ्या समस्त गुरुजी आणि बाईंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पाटीवर धुळाक्षरे गिरवत
बोटांवर अंक मोजत
शाळेची पुस्तके वाचत
वहीवर अक्षरं उमटवत
दंगा मस्ती खेळ खेळत
सहलीचा आनंद लुटत
बालसभेत भाषण करत
परीक्षेचे पेपर सोडवत
एकेक इयत्तेची शिडी चढत
ज्ञानाचे भांडार उलगडत
गाणी गोष्टींची पुस्तके वाचत
प्रयोगशाळेत प्रयोग करत
अभिव्यक्तीची संधी मिळवित
स्नेहसंमेलनात अभिनय करत
निबंध भाषण स्पर्धेत व्यक्त होत
अमृतरुपी ज्ञानाचे कण वेचत
मग शालेय परीक्षा पूर्ण करत
अध्यापक विद्यालयात प्रवेशलो
मिळाली संधी अभिव्यक्तीला
विचारांची कक्षा रुंदावत गेलो
अन् मीही प्राथमिक शिक्षक गुरुजी झालो
अभिमानाने मनपुर्वक सलाम , वंदन करतो
तयाला ज्या गुरुजीं अन् बाईंनी मला घडविले
तयाप्रति नतमस्तक होऊन प्रणाम करतो
श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
Comments
Post a Comment