पुस्तक परिचय क्रमांक:२५१ कृष्णाकांठ
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२५१ पुस्तकाचे नांव-कृष्णाकांठ खंड-१ लेखक : यशवंतराव चव्हाण प्रकाशन-रोहन प्रकाशन, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण, जानेवारी,२०२० पृष्ठे संख्या–३१६ वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र किंमत /स्वागत मूल्य-२५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २५१||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव-कृष्णाकांठ लेखक: यशवंतराव चव्हाण 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 महाराष्ट्राचे थोर भाग्यविधाते आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी जीवनपट संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावरील कराड गावातून आपल्या आयुष्याकडे बघत ‘कृष्णाकांठ’हे आत्मचरित्र लिहिले आहे.ग्रामीण जीवन, कष्टकरी माणसांच्या समस्या,स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक बदल तसेच स्वातंत्र्यानंतरच्या महाराष्ट्राच्या घडणीचा आलेख उठावदारपणे मांडला आहे.सन १९१२ ते १९४२ या काळातील जीवनाची ओळख करून देणारी मौलिक जीवनगाथा म्हणजे ‘कृष्णाकांठ’एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते विधिमंडळातील सचिवापर्यंतच्या शैक्षणिक राजकीय आणि सामाजि...