पुस्तक परिचय क्रमांक:२१० साद



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२१०
पुस्तकाचे नांव-साऽऽद 
लेखिका: डॉ.प्रज्ञा शरद देशपांडे
प्रकाशन- नचिकेत प्रकाशन, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२३फेब्रुवारी २०१७
प्रथमावृत्ती 
पृष्ठे संख्या–१२६
वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१०||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -साऽऽद
लेखिका: डॉ प्रज्ञा शरद देशपांडे 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
मला मला वाटते मुक्त असावे,
 सदा विवेकी युक्त असावे |
 आत्मानंदी मग्न असावे,
 शक्य असे का सांग ?
सख्या रे,शक्य असेल का सांग?
प्रियकराला सखी'सांग सख्या रे'या  काव्यातून  मनातील अनावर भावना व्यक्त करतायत 
प्राध्यापिका तथा कवयित्री डॉ.प्रज्ञा देशपांडे 'साऽऽद'या काव्यसंग्रहात.
 कविता म्हणजे अंतर्मनाच्या चिंतन मंथनातून बाहेर पडलेला सौंदर्यगर्भ असा उद्गार! ही सहज साधना नव्हे, त्यासाठी चिंतनऊर्जेचा दाह सहन करावा लागतो.तेंव्हाचअक्षरांच्या चित्रलिपीला प्राणसत्वासह अक्षरत्व प्राप्त होतं.. शब्दांची विटकळं रचून कवितेचे किल्ले बांधता येत नाहीत. तर त्यात वास्तव भावनांना पाहिलेल्या, नोंदलेल्या,दिसलेल्या आणि हृदयात साठलेल्या भावनांना व्यक्त करणं.ओळीत शब्दसुमनांनी गुंफणं म्हणजे कविता होय.
कवयित्री डॉ.प्रज्ञा देशपांडे पेशाने उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापिका असून शैक्षणिक सेवेत वीस वर्षांहून अधिक काळ सेवेत आहेत. त्यांनी संस्कृत भाषेत डॉक्टरेट मिळवली असून ,त्या पाली भाषेतील पदवीधर सुवर्णपदक विजेत्या आहेत. त्यांचे साहित्यही प्रकाशित आहे.ते ही संस्कृत भाषेत.त्या दैनिक वृत्त-जगतातही नियमित लेखन करतात.
'साद ' या काव्यसंग्रहात प्रियकराला प्रियाराधन
करताना मनात ओथंबून भरलेल्या भावना
कागदावर उतरवून त्यांचं प्रेमाचं काव्यशिल्प 
तयार केलेले आहे.सहज सुंदर प्रवाही शैलीतील कविता रसग्रहण करताना मनाला भावतात.भुरळ घालतात.कॉलेजचे जीवनही डोळ्यासमोरून जाताना क्षणभराच्या सुखद आठवणींचे स्मरण होते.
अश्या पंक्ती ओळी या काव्यसंग्रहातील कवितेतून मांडल्या आहेत.कवयित्री डॉ. प्रज्ञा देशपांडे यांनी काव्यसंपदा परमेश्वराला अर्पण केली आहे.त्यांची प्रस्तावना सुध्दा काव्यारचनेत आहे.हे या संग्रहाचे वेगळं वैशिष्ट्य नमूद करावसं वाटते.
 देवासाठी शब्दसुमनाची ,केली ओंजळ
त्यात गुंफल्या मनोभावना,असे प्रांजळ 
देवा तुझिया कृपे मिळाले,मज हे काव्यजीवन
सदैव लाभो असे निरंतर,मजला नवसंजीवन 
   ' साद' काव्यसंग्रहात एकंदर एकशे तीन कविता चोखंदळ वाचक रसिकांना आनंद देण्याकरता उपलब्ध आहेत.प्रेमाचा जागर अन् आगर ही 'मी मला भेटले','प्रेमामध्ये पडलास हृदया','तू असतोस ना','सांग सख्या रे','मन माझे झुलते', 'मुक्त मी,' 'बेजार' अशा अनेक रचनेतून याची प्रचिती येते.
'सूर्य'कवितेत सुर्योदय ते सुर्यास्त कालावधीत दिसणारी सूर्याची रुपं आणि प्रकाशऊर्जा याचं
विश्वाला उपयोगी असणारं दिनचक सुंदरशा
काव्यातून मांडले आहे.
तुझ्यामुळे काळ, वेळ,ऋतू आणि भान
तूच करतो जीवन,सुखी अन् गतिमान…
मनोमन करते सूर्या,तुझी मी आळवणी
सुखी कर विश्व सारे,माझी ही विनवणी…
 अवेळी येणाऱ्या वळवाच्या पाऊसात जीवाची  उन्हानं झालेल्या  काहिलीला सुखद गारवा मिळतो.सर्वांग शीतल होतं.पण त्याच वेळी 
वीजांच्या लखलखाट ढगांचा गडगडाट ऐकू येतो.त्या पावसाचं वर्णन शब्दांच्या बरसणाऱ्या गारा आणि धारांनी चिंब भिजवते.असं सुंदर शब्दात वळवाच्या पावसाचे वर्णन कवितेत रचलेले आहे.
नसांगता येणारा थोडासा बरसणारा | निरुपयोगी, पुन्हा दाहउष्मा वाढवणारा 
गरज खरी धरणीला,हे तो जाणतो ना?  आदत से मजबूर, हेच त्याचं खरं लक्षण
 पावसाने बरसावे,धरणीवर संतत एकसारखे
 बेधुंद आवेग खुले नसो, सातत्य त्यात असावे
 बरसतो कोसळतो म्हणून मिळेल धरेला नवजीवन 
मी जीवनदाता, मीच उद्धार कर्ता, तिचा संजीवन 
पावसाला कुठे ठाऊक की, जलसंधारण सोपे नाही 
झिरपत रुजणे, कोसळून  वाहण्यात इतके  सोपे नाही.
कोसळत्या पावसाचे पाणी,पुरानंतर ओसरुन जाते 
पण धरणीत मुरले की, अखंड धार ओघवत राहते….
     काही संस्कृत भाषेतील काव्य या पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
अतिशय सुंदर आणि उत्तमोत्तम रचना आपणास ‘साऽऽद’या काव्यसंग्रहात वाचायला मिळतात.

परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक-८ एप्रिल २०२५


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड