पुस्तक परिचय क्रमांक:२०८ घर आता शांत आहे....
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२०८
पुस्तकाचे नांव-घर आता शांत आहे.
लेखिका: डॉ.मंजूषा सावरकर
प्रकाशन-कुसूमाई प्रकाशन, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- १० मे २०२४
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–२४६
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-३००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२०८||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-घर आता शांत आहे.
लेखिका: डॉ.मंजूषा सावरकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
बालविश्वातील काही नकळत घडलेल्या घटनांचे चटके कालौघात आपण विसरून जाऊ शकत नाही.वेदनांचे आभाळ अधूनमधून गडगडून येतच असतं.म्हणून वेळीच सावधगिरी बाळगण्यासाठी लेखिका डॉक्टर मंजूषा सुनील सावरकर यांनी वाचकांशी संवाद साधण्यासाठी 'घर आता शांत आहे'हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे.
डॉ.मंजूषा सावरकर विदर्भातील नव्या आघाडीच्या लेखिका तथा आकाशवाणीवर वृत्त निवेदिका आणि संपादिका आहेत.त्यांच्या शैक्षणिक आणि साहित्यिक सेवेचा सन्मान महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार , विदर्भरंग कथा विशेषांक पुरस्कार आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठानने केला आहे. त्यां कुसुम विष्णूपंत बनकर स्मृती आई प्रतिष्ठान नागपूरच्या अध्यक्षा आहेत.त्यांचे 'डांगोरा', 'भोवडा,'आणि 'सहचर'हे कथासंग्रह प्रकाशित आहेत.
या कथासंग्रहातील कथांना दैनिक वृत्तपत्रात, दिवाळी अंकात आणि मासिकात पूर्व प्रसिध्दी मिळालेली आहे.या पुस्तकात एकूण वीस कथांचा समावेश लेखिकेने केला आहे.प्रत्येक कथेचं कथाबीज वेगळं आणि विचारचक्र सुरू करणारं आहे.या कथांचे मला उमघलेलं वैशिष्ट्य म्हणजे 'विचार करून बोलावे, बोलून विचार करु नये',हा सुविचार सार्थ करणारं आहे.उंबराचं फूल, परतावा, चुकामूक, काल परवा म्हणाला तू…, जात,अंधाराचे हात, मिस्ड कॉल.., आणि मग सुटले, धन्नो, चॅलेंज, गुलाल रानूऽऽ, सल, उत्तेजनार्ह,त्याची कथा -तिची कहाणी,सोयरा,लेटर टू अ टीचर, तरीसुद्धा… ?, हाइड अँड सिक आणि घर आता शांत आहे… या कथा.आशयघन कथा आणि साधी सोपी भाषा काही ठिकाणी शब्दउपमा समर्पक शब्दांत समर्थन करतात.मातृत्वाला वंदन करून सुखासमाधानाने जीवन जगण्यासाठी विश्वास सार्थ करणाऱ्या मुलांमुलींना हे पुस्तक समर्पित केले आहे.
कथांचे बीज शिर्षकाला अठावदार अन् गडद करणारं आहे.कथेच्या समारोपात नकळत छान शब्दात संदेश दिला आहे. स्वता:च्या मुलीचा चंदाचा मुलगा वीस वर्षांनी भेटतो.पण मुलगी राहिलेली नसते.नातवाला पाहताना आजीच्या अवस्थेचं वर्णन तसेच विनूचंदाचं प्रेम याचा परामर्श घेणारी कथा 'उंबराचं फूल'.
शैक्षणिक कार्यात भेटीसाठी अपडेट करताना चिमणीच्या पिलाला खायला आलेला साप पाहून सगळी मुलं घाबरुन जातात.आता साप पिल्लांना खाणार एवढ्यात वाऱ्याच्या वेगाने आलेली पाखरं सापाला जखमी करून इरादा बदलायला भाग पाडतात ती कथा 'परतावा.'शाळेतून घरी येताना बहीणभावाची चुकामूक ही कथा अंतरीच्या वेदना देणारी भावस्पर्शी आहे.
जात कथा म्हणजे एका मुलाची शाळा बुडू नये म्हणून आत्ताच पाऊस पडायला पाहिजे याचं आर्जव करायला लावणारी कथा.गणू नावाचं पोपटाचं पिल्लू पावसाच्या सरीने जखमी झालेलं असतं. त्याची सेवाश्रुषुशा लेखिका करतात.पण त्याला लळा लागल्याने ते पिंजऱ्यातून उडून न जाता तेथेच राहते. कालांतराने पोपटांचा थवा येतो अन् गणू त्यांच्याबरोबर भुर्रकन निघून जातो.ती 'जात'कथा.
यातील सर्वच कथा भावनांनी ओतप्रोत भरलेल्या आहेत.विचारमंथन करायला उद्युक्त करणाऱ्या भावस्पर्शी कथा.
‘घर आता शांत आहे’.अप्रतिम पुस्तक आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक -२५मार्च २०२५
Comments
Post a Comment