पुस्तक परिचय क्रमांक:२०४ रामाचा शेला

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२०४ पुस्तकाचे नांव-रामाचा शेला लेखक: साने गुरुजी प्रकाशन-रिया पब्लिकेशन, कोल्हापूर प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती-१५ऑगस्ट, २०११ पृष्ठे संख्या–२१६ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--२१०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २०४||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव-रामाचा शेला लेखक:साने गुरुजी 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 निर्मळ पवित्र सकस अजरामर साहित्य सर्जनशील संस्कारक्षम संस्कृतीचे दर्शन संस्कारक्षम धडे अन् अमृतमय वाणी मुलांची हृदये जिंकली साने गुरुजींनी| अध्यापन कार्य,समाजसेवा, स्वातंत्र्ययुद्ध अशा बहुविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. संवेदनशील हृदयमनाचे समाज शिक्षक आणि साहित्यिक साने गुरुजी यांच्या अक्षरधनातील एक अनमोल ठेवा‘रामाचा शेला’ही कादंबरी अतिशय संवेदनशीलतेने गुरूजींनी या कादंबरीचे लेखक केले आहे. गरीब कुटूंबातील उदय आणि सरला यांच्या प्रेमाची कादंबरी.सरलाच्या पाठीवर ...