पुस्तक परिचय क्रमांक;१६२ नोबेल पुरस्कार विजेते
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६२
पुस्तकाचे नांव-नोबेल पुरस्कार विजेते
लेखकाचे नांव- संभाजी पाटील
प्रकाशन -रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- ऑगस्ट २०१६ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–४१६
वाड़्मय प्रकार-संदर्भ ग्रंथ
किंमत /स्वागत मूल्य--५००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६२||पुस्तक परिचय
नोबेल पुरस्कार विजेते
लेखक: संभाजी पाटील
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
जगात सर्वात प्रतिष्ठेचा सर्वश्रेष्ठ मानांकित आणि सर्वांत मौल्यवान पुरस्कार... म्हणजे 'नोबेल पुरस्कार'.हा पुरस्कार विजेता कोट्याधीशच होतो. दरवर्षी १० डिसेंबर या दिवशी अल्फ्रेड नोबेल यांचा स्मरणदिन. याच दिवशी हा पुरस्कार जाहीर केला जातो.मानव कल्याणासाठी शांती, साहित्य, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, चिकित्सा व शरीर विज्ञान शास्त्र आणि अर्थशास्त्र अशा सहा विभागात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तिला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
नोबेल पुरस्कार विजेत्यांचे पुढील आयुष्य सुखा-समाधानात आणि पीडामुक्त जीवन जगावे.याच उद्देशाने पुरस्काराची रक्कम भरमसाठ दिली आहे.
या पुस्तकात सन १९०१ पासून २०१५ पर्यंतच्या ८३५ पुरस्कार विजेत्यांच्या संक्षिप्त कार्याचा आढावा घेतला आहे.साधी सोपी आणि ओघवती भाषा शैलीचा प्रभाव या संदर्भ पुस्तकात केला आहे.ध्येयाचे तत्वात रुपांतर होते अन् तत्त्वांचे ग्रंथात! हा विचाररुपी आणि तत्वरुपी कार्य केलेल्या महनीय व्यक्तींचा परिचय या ग्रंथात समावेश केला आहे.
सध्या अनेकजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.त्यांना एकाच ध्येयाने वाटचाल करण्यासाठी दीपस्तंभ ठरेल. यशाचा निश्चित मार्ग सापडेल अशी आशा वाटते.
लोककल्याणकारी आणि मानवतावादी कार्य केलेल्या महनीय व्यक्तीच्या नावाने पुरस्कार दिला जातो.'अल्फ्रेड नोबेल'त्यांच्या कार्याची ओळख या ग्रंथात सुवर्णाक्षरांनी कोरली आहे.नोबेल हे त्यांचे आडनाव.त्यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला.त्यांना अनेक भाषा अवगत होत्या.उद्योगवृध्दी साठी त्यांचा जर्मनी, फ्रान्स, इटली आणि अमेरिका इत्यादी देशांत दौरे होत असत.अनेक भाषा संबंधांमुळे त्यांच्या मनात वैश्विक भाव निर्माण झाला. स्वीडनमध्ये त्यांनी वडिलांसोबत रसायनशास्त्रांशी संबंधित अलौकिक कार्य केले.स्फोटक द्रव्य तयार करण्याचे काम ते प्रयोगशाळेत करत.स्फोटके, रबर,चमडे इत्यादी वस्तू व पदार्थाची निर्मिती करीत साधारणपणे ३५५ वस्तू बनविल्या होत्या.वीस देशात नव्वद कारखाने त्यांचे होते.त्यामुळे जगातील पहिली सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी स्थापन करण्याचा बहुमान अल्फ्रेड नोबेल यांना मिळाला होता.
इटलीतील रेमोनगर येथे १० डिसेंबर १८९६ला त्यांचा मृत्यू झाला.१८९७ साली त्यांचे मृत्यूपत्र सर्वांसमोर खुले झाले. अल्फ्रेड नोबेल यांच्या २७ नोव्हेंबर १८९५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व चल- अचल संपत्तीचे धनात रुपांतर करावे.त्या धनसंपत्तीच्या व्याजातून दरवर्षी पुरस्कार दिला जावा.त्यानुसार नोबेल फाऊंडेशनची स्थापना करुन शांती पुरस्कार व्यक्ती ठरविणे.तसेच फाउंडेशनचा अध्यक्ष ठरविण्याचा अधिकार स्वीडन सरकारला देऊन वेगवेगळ्या संस्थांना पुरस्कार देण्याचे अधिकार देण्यात आले.या ट्रस्टमध्ये सहा सदस्य असतील.संपूर्ण व्याजाच्या रकमेचे सहा भाग करून पदार्थविज्ञान, रसायन शास्त्र, शरीरविज्ञान चिकित्सा शास्त्र, साहित्य,शांतता व बंधुभाव प्रस्थापित करणारे वअर्थशास्त्र इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मान्यवर पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम दिली जाते. सन १९६९पासून अर्थशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिला पुरस्कार दिला जातो.
या संदर्भ पुस्तकात सहा विभागाची स्वतंत्र अनुक्रमणिका आहे.त्यात पुरस्कार व्यक्ती अथवा संस्था ,देश आणि वर्षाचा उल्लेख केलेला आहे. १९१३ साली आपल्या भारतातील पहिले साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आहेत.सन-२०१५ पर्यंत साहित्य पुरस्कार विजेते ११२,शांती पुरस्कार विजेते १२७, अर्थशास्त्र पुरस्कार गौरवांकित ७६, शरीरविज्ञान व चिकित्सा शास्त्र पुरस्कार विजेते २१०आहेत,तर रसायनशास्त्र क्षेत्रातील पुरस्कार विजेते १७२ आणि भौतिकशास्त्र विभागातील पुरस्कार विजेते २०१ आहेत.अशा मान्यवरांच्या कार्याचा आलेख कृष्णधवल छायाचित्रासह रेखाटला आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे मलपृष्ठावर मान्यवरांच्या मांदियाळीत भारतीय पुरस्कार विजेत्यांची छायाचित्रे आहेत.
लेखक संभाजी पाटील यांनी अतिशय चिकित्सक अभ्यास करून नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे.खरोखर हे एक प्रेरणादायी कार्य त्यांनी केले आहे.स्पर्धा परीक्षांचे धनुष्य पेलणाऱ्या शिष्यांना या पुस्तकाची खरी गरज आहे…
परिचयक श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
समर्पक आशय मांडणी👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete