काव्यपुष्प क्रमांक:२६३ वर्षा ऋतूचं गाणं



🍁 वर्षा ऋतूचं गाणं

डोंगराच्या पायथ्याशी  
दाट झाडीत वाडी 
दुधाळ साखरनळ्या 
आवेगात धारा सोडी....
हिरव्यागार रानी 
 वारा गाई गाणी
पानावर ठिबकती 
थेंब थेंब पाणी ....
खाचरात नांगरली 
लोण्यावाणी माती
धानाची हिरवी रोपं 
लावणीची वाटं बघती...
हिरव्यागार शालूत 
वसुंधरा साजात सजती 
सौंदर्याचा वर्षा ऋतू 
मजेत आनंद ऊधळती....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड