सेवागौरव सोहळा श्री.राजेंद्र गायकवाड
सेवागौरव सोहळा
श्री राजेन्द्र गायकवाड केंद्रप्रमुख बावधन.
संथ वाहणाऱ्या कृष्णेच्या काठी
जमले समस्त ज्ञानरथाचे यात्री
जुळून आली आपुलकीची नाती
गायकवाड सरांची आज सेवापुर्ती
निरोप समारंभ नव्हे हा तर ओलावा माणूसकीचा
विसरू कसे आम्ही क्षण हा सौख्याचा
हरेक शिक्षक सेवानिवृत्त होतच असतो
पण त्यांनी दिलेली शिकवण आणि वारसा
प्रत्येक विद्यार्थ्यांसह कायम जपला जातो.
सेवाप्रारंभ आणि सेवापुर्ती या दोन शब्दांमधील यशस्वी वाटचाल म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घकाळ केलेली तपस्या...*
स्कूलमास्तर,अध्यापक,पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख असा शैक्षणिक व प्रशासकीय वाटचाल करीत ३८वर्षाच्या प्रदीर्घ ज्ञानसेवेतून शिक्षकमित्रवर्य श्रीमान राजेंद्र गायकवाड केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त होत आहेत.
जीवनातील वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा…
हजरजबाबी आणि अभ्यासूवृत्तीचा घेऊ आम्ही धडा…
आरोग्य संपदा तुम्हाला लाभो हीच मनापासून सेवापुर्तीची शुभेच्छा….
सूर्याचे हृदयही पाघळते
दिवस मावळत आल्यावर
कठोर मनेही हळवी होतात
सेवापुर्ती नजीक आल्यावर
खुबी माझ्यात एवढी नाही की
एखाद्याच्या मनात घर करून जाईल
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल
इतक्या आठवणी देऊन जाईन…
शैक्षणिक कार्यकर्तृत्वाची पताका दुर्गम भागातील शाळेत फडकवत ठेवून प्रशासकीय कार्यकुशलतेने केंद्र समूहातील विद्यामंदिरांची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण केलेले प्रयत्न म्हणजे आम्हा शिक्षकांसाठी प्रेरक दीपस्तंभच..
शिक्षणातून देशसेवा, शिक्षणातून प्रगती, शिक्षणातून उजळतो इतरांना उजळविणारा एक ज्ञानदीप…सेवागौरव एका तेजस्वी प्रशासकीय ज्ञानगुरुचा..
१९८५ साली प्राथमिक शिक्षक म्हणून वाई तालुक्यातील आजही दुर्गमपणाचा ठसा असलेल्या कोळेश्वर डोंगररांगेच्या कड्यात वसलेल्या आदिवासी माडगणी पाड्यात ज्ञानसेवेचा प्रारंभ केलात.आपल्याच नांदगणे ग्रामभूमीत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेत.लोकसहभाग, निरंतर शिक्षण आणि कलापथक आदी उपक्रमातून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावलात.अनेक उत्तमोत्तम व्यक्तिमत्त्वाचे विद्यार्थी घडवलेत.उळूंबबलकवडी,आकोशी आणि जांभळी येथील शाळांमध्ये संस्काराचा ज्ञानवारसा विद्यार्थ्यांना देऊन अनेक यशवंत गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे कार्य केलेत. प्रशासकीय बदलीने आपण जावली तालुक्यातील आलेवाडी शाळेचा लोकसहभागातून चेहरामोहरा बदललात. तदनंतर आपण २०१३साली प्रमोशनने बावधन केंद्रसमूहाची धूरा स्विकारलीत. सर्वांना बरोबर घेऊन आपल्या संकुलातील शाळांचा गुणात्मक दर्जा संवर्धित करण्यासाठी सूक्ष्मपणे नियोजन करून यशस्वीपणे राबविलेत.गुणवत्ता आणि स्पर्धा परीक्षांचा आलेख उंचावत गेलात. आपल्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यकिर्दीस सलाम…..
आपल्या शुभारंभाच्या माडगणी शाळेशी जुळलेले नाते आपण निरपेक्ष भावनेने सेवापुर्तीच्या समारोपापर्यंत जोपासलेत. सेवेची पुर्ती माडगणीतील सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ आणि शिक्षकांना स्नेहभोजन देऊन ऋणानुबंध जपलेत.
त्यानिमित्ताने आपल्या कार्याचा गौरव मान्यवरांच्या शुभहस्ते सपत्नीक संपन्न होतोय..
आपल्या शैक्षणिक सेवापुर्तीच्या कार्यास प्रारंभीच्या हार्दिक शुभेच्छा…
श्री . राजेंद्र गायकवाड नावा प्रमाणेच ज्यांनी आपल्या शिक्षक बांधवाच्यावर मानुसकीचा ओलावा अविरत ठेवून राज केले . कालचा कार्यक्रमाचे उपस्थित मायाजाळ पाहून केलेल्या कार्याची पोहच पावती मिळते . त्यांना आरोग्य संपन्न सुखी आनंदी जीवनासाठी शुभेच्छा💐
ReplyDelete