पौष्टिक तृणधान्यं पाककृती शाळा कोंढावळे
कोंढावळे शाळेत पाककृती स्पर्धांचे आयोजन
दुर्गम भागातील नाचणी या तृणधान्याचे विविध पदार्थ बनवून ''पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला.''बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक तृणधान्यांचा वापर दिवसेंदिवस कमी होतोय.पौष्टीक तृणधान्यातून रोजच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी आपण भोजन अल्पोपहार करत असतो.आपला आहार कर्बोदके,प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असणे आवश्यक आहे.शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना तृणधान्ययुक्त आहाराची सवय लागावी म्हणून 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण'योजने अंतर्गत विद्यार्थी व पालकांमध्ये तृणधान्यांविषयी जागरूकता निर्माण करणे विषयी *पोषण पंधरवडा* निमित्त आज शुक्रवार दिनांक ८/ ९/ २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढावळे,ता.वाई येथे 'पौष्टिक तृणधान्यांवर आधारित पाककृती' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडी व इयत्ता पहिली ते सातवीतील ४५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध प्रकारच्या पाककृतींचे पदार्थांचे सादरीकरण केले. सदर स्पर्धेस शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र समन्वयक श्री भास्कर पोतदार यांनी भेट देऊन कौतुक केले. मुख्याध्यापक श्री.रविंद्र लटिंगे यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्व विषद केले.स्पर्धेत ३५ महिला पालक सहभागी झाल्या होत्या. त्यांनी विशेषतःनाचणी आणि तांदळाचे पीठ वापरून पदार्थ बनविले होते.यातील पोषणमूल्य संवर्धित करणारे तृणधान्यापासून बनविलेले खासियत पदार्थ नाचणीची भाकरी व भालगीची भाजी,नाचणीची लाडू, नाचणीची भाकरी व भारंग्याची भाजी, नाचणीचे लाडू,नाचणीची पुरी,डोसा ,भाकरी व अळूची वडी,शेवग्याची पाने मिश्रीत पराठा,कांदाभजी, गुलगुली, इडली,शाबुदाणा वडे,बटाटे पराठे, खोबऱ्याची बर्फी,गुलाबजाम,उसळ व घावण, तांदळाचे घावण व चटणी,अप्पे व चटणी असे गोड तिखट खुसखुशीत आणि खमंग पदार्थ तयार करून आणले होते.सौ.वर्षा पोळ व सौ.रत्नाबाई कोंढाळकर यांनी परीक्षण केले.स्पर्धेतील उत्तम पाककृती प्रथम क्रमांक सौ.राजश्री हरिभाऊ जंगम, द्वितीय क्रमांक सौ.तुळसा भगवान कोंढाळकर, तृतीय क्रमांक सौ.माधवी ईश्वर कोंढाळकर,चतुर्थ क्रमांक सौ.ज्योती सचिन कोंढाळकर,पंचम क्रमांक सौ.उषा पांडुरंग निगडे मिळाला.यावेळी बहुसंख्य विद्यार्थी ,पालक व एस.एम. एसी.सदस्य उपस्थित होते.श्री सुनील जाधव सर ,सौ.नलिनी मुसळे मॅडम,सौ.वैशाली बारगे आणि पूजा कोंढाळकर शापोआ मदतनीस यांनी संयोजन केले.
अप्रतिम👌👌
ReplyDeleteThank
ReplyDelete