पुस्तक परिचय क्रमांक:१२५ क्रिकेटच्या ऐश्वर्या
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे
ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१२५
पुस्तकाचे नांव-क्रिकेटच्या ऐश्वर्या
लेखिकेचे नांव-निता चापले
प्रकाशक- ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०१६/ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१०३
वाड़्मय प्रकार- चरित्र माहितीपट
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१२५||पुस्तक परिचय
क्रिकेटच्या ऐश्वर्या
लेखिका: निता चापले
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃
महिला क्रिकेटच्या खेळाडूंचे स्कोअरिंग या पुस्तकात प्रस्तुत केले आहे.
२०-ट्वेंटी क्रिकेट वर्ल्डकप मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पहात असताना, टाळ्यांचा कडकडाट,शिट्ट्यांचा गजर, अमाप उत्साहात चेअरप देणारे प्रेक्षक, आणि विराट हार्दिक दिनेश आणि अश्विन यांनी बहारदार बॅटिंग करुन शेवटच्या षटकात एका षट्काराने सामना भारताच्या बाजूने झुकविला.आणि हा सामना विराट कोहलीने भारतास जिंकून दिला.देशात गल्लोगल्ली जल्लोषात हा विजय साजरा झाला.या बहारदार रोमांचकारी खेळीने दोनदिवस अगोदरच भारतीयांनी दिवाळी आतषबाजीत साजरी केली.शेवटच्या षटकातील सहा चेंडूवर १६ धावा काढणे अशक्यप्राय होते.पणविराटने शांतपणे खेळून विराट विजय मिळवून दिला.संस्मरणीय खेळी पहायला मिळाली.
क्रिकेटमध्ये काळजाचं थरकाप उडविणारे दृश्य असं क्वचितच पहायला मिळतं. शेवटच्या चेंडूपर्यंत विजयासाठी झगडणं बघायला मिळते.पण तेच जर महिला क्रिकेटिअर असतील तर एवढा जल्लोष आणि अमाप उत्साह बघायला मिळेल काय?हेच जर महिला क्रिकेट दृश्य बघायला मिळालं तर किती आनंदाची पर्वणी ठरेल.हेच अशक्य दृश्य काहीजणींच्या अथक परिश्रमाने शक्य झाले असून भारतीय महिला क्रिकेट विश्वाला वेगळ्या उंचीवर ठेवण्याचे अनमोल कार्य अश्याच कणखर हातांनी घडविले आहे. महिलांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेऊन स्पृहणीय यश संपादित केले आहे.
भारतीय महिला क्रिकेटसाठी तनमनधनाने धडपडणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा उलगडा करुन देणारे पुस्तक. तसेच क्रिकेटचा आत्तापर्यंतचा उंचावलेला आलेख क्रिकेटपटू व प्रशिक्षक नीता चापले यांनी 'क्रिकेटच्या ऐश्वर्या'या पुस्तकात उलगडून दाखविली आहे.अनेक लोकप्रिय क्रिकेटर्सची गगनभरारी जगासमोर आणण्याचा प्रयत्न लेखिका निता चापले यांनी या माध्यमातून केला आहे.जणू काही हे पुस्तक म्हणजे धावते समालोचन वाचत माहितीपट नजरेत समोर उभा राहतो. नवख्या खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे हे पुस्तक आहे. आपले स्वप्न अर्ध्यावर सोडून गेलेल्या प्राणप्रिय कन्या आणि मातोश्रीस हे पुस्तक अर्पण केले आहे.
या पुस्तकास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.खेळाडू म्हणून आलेल्या अनुभवासह देशातील महिला क्रिकेट क्षेत्राच्या विकासासाठी धडपडणाऱ्या मान्यवर व्यक्तिंचा वेध या पुस्तकात सखोलपणे घेतला आहे. लेखिका निता चापले यांनी 'काही मनातले' या मनोगतात या पुस्तक प्रकाशित करण्याचा हेतू विषद करून कुटुंब आणि खेळाचा माहितीपट सांगितला आहे.त्या म्हणतात की, ''क्रिकेटने जे मला दिले,घडवले.त्यामुळे आयुष्यात आलेल्या संकटांचा मी समर्थपणे आणि ताकदीने सामना करु शकले.माझ्याप्रमाणे अनेक खेळाडूंना या खेळाने घडविले,त्या सगळ्याजणींचे अनुभव एका ऊर्मीने शब्दबध्द करून इतरांना प्रेरणादायी ठरावे. ''यास्तव क्रिकेट खेळाचा शब्दपट चार प्रकरणात मांडलाय.
भारतात सगळ्यात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे.अनेक विश्वविख्यात तारे क्रिकेट जगतात चमकले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेटचे भारतीय पर्व सुरू व्हावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत.हा प्रवास सहजसुलभ नसून अतिशय वळणावळणाने झालेला आहे. त्यातील प्रसिध्दीपराड्मुख असणारे नायक आहेत श्रीमान महेंद्रकुमार शर्मा.यांनीच महिला क्रिकेटला चालना दिली.
हैदराबादला मुलींची सॉफ्टबॉलची टिम घेऊन गेले असताना, केवळ मजा म्हणून सॉफ्टबॉलने क्रिकेट खेळताखेळता नंतर त्याच मुलींनी क्रिकेट खेळ शिकण्याचा हट्ट सरांकडे धरला. हीच खेळाची नांदी होय.तदनंतर सरांनी १९७३ला लखनौ येथे महिला क्रिकेट असोसिएशन स्थापून नव्या पर्वाची सुरुवात केली.अध्यक्षा होत्या बेगम हमीदा हबीबुल्ला आणि सचिवपदी महेंद्रकुमार शर्मा.याच काळात देशात महिला क्रिकेटचा प्रसार व्हायला सुरुवात झाली होती.याचवेळी पुण्यात दिलीप चिंचोरे,सुरेश ठुमके व नरेंद्र निकम यांनी महिला क्रिकेट सुरू केले होते.पहिली राष्ट्रीय स्पर्धा 1973साली पुण्यात नेहरू स्टेडियम येथे भरविली होती.कासवगतीने प्रसार सुरू झाला.अखिल भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनची पुनर्रचना होऊन चंद्रप्रभा त्रिपाठी अध्यक्षा तर संसद सदस्या प्रमिलाताई चव्हाण उपाध्यक्षा झाल्या.अन् आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेला सुरूवात झाली.
लेखिका नागपूर विद्यापीठाच्या क्रिकेट कर्णधार होत्या.नागपूर मधील बालपण आणि शिक्षण घेतानाच्या गमती जमतीची व्यक्तीचा अलवारपणे केली आहे.विशेषत: खंडोबाचे मंदिर आणि पहिलवान आजोबांचे गावातील मानसन्मानाची ओळख उठावदार शब्दात अधोरेखित केली आहे.नागपुरची प्रसिध्दी, विदर्भ क्रिकेट असोसिएशनची माहितीचा उल्लेख केला आहे. रेशीमबाग क्रिकेट क्लबची माहिती.महिला क्रिकेट खेळाडू म्हणून आलेल्या अनुभवांचा प्रातिनिधिक लेखाजोखा मांडला आहे.गाजलेल्या आणि यशस्वी करिअर केलेल्या क्रिकेटपटूंच्या माहितीचे 'स्कोअरिंग' सुंदरशा शब्दांत प्रस्तुत केले आहे. भारतीय महिला संघाची पहिली कर्णधार उज्ज्वला निकम पवार हिचाही खेळपट छानच मांडलाय.तसेच दीपा भाटिया, डायना अॅडलजी, शांथा रंगास्वामी,शुभांगी कुलकर्णी, मिथाली राज, पौर्णिमा राव यांची यशस्वी कारकीर्द रेखाटली आहे.तसेच आकर्षक रंगीत छायाचित्रे पाहताना पुस्तकाचे वास्तव स्वरुप दिसून येते.मी नोकरी करावी असे सासुबाईंना सतत वाटायचे.त्यामुळे सतत त्या माझ्या तक्रारी करत असत.लेखिका नागपुर हून मुंबईत आल्यावर क्रिकेटचे वेड त्यांना स्वस्थ बसू देईना.मुंबईलातर अनेकजण नशीब आजमावून पहायला येतात.नेमकं काय करावे याचे विचार मनात घोळत रहायचे.त्यातच त्या आई होणार होत्या.ऐश्वर्या नावाचं मायेचं काळीज जन्माला आलं.पण जन्मजात बाळाला हृदयाला छिद्र होतं. त्यामुळे दु:ख अनावर होत होतं.सतत रडारड घरात होयची.मुलीचे शिक्षण सुरू झाले.सन २००५ला ऐश्वर्याचे शिक्षक सोनावणे सरांनी मौलिक सल्ला दिला.तुम्ही राष्ट्रीय खेळाडू असून घरी बसून न राहता प्रशिक्षक म्हणून करिअर सुरू करा.२००६ ला क्रिकेट अकॅडमी सुरू केली.ऐश्वर्या शिकत शिकत चित्र, वक्तृत्व,नृत्य, बुध्दिबळ आणि अभिनयात चुणूक दाखवत होती.तिचा आवाज खणखणीत होता.छोट्यामोठ्या स्पर्धांतून ती सहभागीव्हायची.चित्रकलेचे वेडही छंदात बदलू लागले.हृदयशस्त्रक्रियेनंतर तिला त्रास जाणवत नव्हता. माझी आता अकॅडमी सुरू झाली होती.योगायोगाने एकदा पराडकर सरांनी ऐश्वर्याला 'एक बॉल टाक' म्हणून म्हटले. तिची बॉल टाकण्याची कृती पाहून सर खूष झाले.आणि मला म्हणाले,"नीता मॅडम, मला वाटते तुमची मुलगी भविष्यात इंडियाच्या टीममध्ये खेळू शकेल."हाच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.त्याच एका वाक्याने तिच्या हातात क्रिकेटचा चेंडू आला. तिचे ध्येयवेडे स्वप्नं पक्के झाले.सततच्या सराव आणि चिकाटीने वयाच्या १२व्या वर्षी तिचे क्रिकेट सुरू झाले.समंजसपणा वयामुळे वाढत होता. ऐश्वर्या नेहमी म्हणायची, "प्रत्येक माणसाच्या जगण्याला काहीतरी कारण असते.तसे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी उद्देश असतो."वाढदिवसाच्या दिवशीच तिचा अपघात होणं.यासारखा दैवदुर्विलास दुसरा कोणता. अगदी हृदय पिळवटून टाकणारी घटना होती. भावनांचा कडेलोट झाला.हे असं दु:ख आमच्या वाट्याला का यावे.एका अपघाताने सारा डावच ऊधळला गेला.त्यातच अवघ्या चार महिन्यांत जन्मदात्या आईचे निधन झाले.
क्रिकेट तर बंद झाले.आता स्वत:ला सावरत मुलासाठी जगतेय.माझ्या मावळून गेलेल्या स्वप्नांना ऐश्वर्याच्या रुपात उगवाईचे किरण होते.पण त्यावर निष्ठुर काळाने झडप घातली. पण महिला क्रिकेट विश्वावर प्रेम करणाऱ्या रणमर्द खेळाडू याच ऐश्वर्या समजून त्यांचे व्यक्तिमत्त्व रेखाटण्याचा प्रयत्न हा पुस्तकात केला आहे.
आठवणींचा झोका सतत येत राहतो. तिच्या सगळ्या वस्तू आठवण करून देत मनात रुंजी घालतात. पण आता शांतपणे विचार करून एकच ध्येय यापुढील काळात ठरविले आहे.. अश्रुंना थोपवून मी नेटाने प्रयत्न करत राहणार…आता मला एक ऐश्वर्या घडवायची आहे.की जी भारताचे नाव रोषण करेल. त्यासाठी तिच्या नावाने अकॅडमी सुरू करणार आहे.अनेक ऐश्वर्या मला मैदानावर भेटतील. मुलीनेच मातेला आदर्श निर्माण करुन दिलाय. सुंदरशी मायलेकीची सार्थ अभिमानाची कथा 'क्रिकेटच्या ऐश्वर्या'या पुस्तकात क्रिकेटपटू नीता नितीन चापले यांनी रेखाटली आहे. प्रेरणादायी पुस्तक आहे.
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment