प्रथम पुण्यस्मरण दिन ऊनसावली पुस्तक प्रकाशन
प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राध्द)
मातोश्री यमुनाबाई गणपत लटिंगे ओझर्डे वाई यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी'ऊनसावली'स्मरणगंध स्मरणिकेचे प्रकाशन पिताश्री गणपत तुकाराम लटिंगे,सौ पारुबाई धेडे(मावशी),श्रीमती तारुबाई चौधरी (मावशी), श्रीमती मालन मर्ढेकर (मावशी), श्रीमती मीना डांगरे (मावशी) ,श्री धनंजय जठार (मामा), श्री.दिनेश गणपत लटिंगे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे अवचित्य साधून आमच्या साळी
समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर. या मंदिराच्या (साळीतीर्थ) व सांस्कृतिक भवनाच्या बांधकामास लटिंगे परिवाराच्या वतीने ₹२११११ देणगी प्रदान करण्यात आली.आयोजित धार्मिक वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमास पैपाहुणे, नातलग,इष्ट मित्र मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
भावपूर्ण श्रद्धांजली!!!
अभिप्राय.....
श्री. रविंद्रकुमार गणपत लटिंगे व श्री.दिनेश गणपत लटिंगे रा. ओझर्डे यांनी श्री जिव्हेश्वर सामाजिक विकास संस्था, ओझर्डे या संस्थेच्या श्री जिव्हेश्वर मंदिर व सांस्कृतिक भवनाच्या बांधकामास आज रोजी त्यांच्या मातोश्री कै. सौ.यमुना गणपत लटिंगे यांच्या प्रथम वर्षश्राध्दाचे औचित्य साधून आईच्या स्मृतीप्रित्यर्थ रु.२१११०/- देणगी दिली. दिनांक ३०/१२/२०२० रोजी मुलाच्या (श्री हर्षद) लग्नाचे औचित्य साधून रु. २१०००/- संस्थेस दिले होते.तसेच रु.५०००/- वडीलांचे वाढदिवसानिमीत्ताने दिले होते. अवांतर खर्चास बगल देऊन सामाजिक बांधिलकी जपणारे त्यांचे हे कार्य खरोखरच समाजाला प्रेरणा देणारे आहे. ते व्यवसायाने प्राथमिक शिक्षक आहेत. आदर्श शिक्षक म्हणुन त्यांचा गौरव झाला आहे. तसेच ते चांगले लेखक, कवी म्हणुनही ओळखले जातात. त्यांच्या कविता, प्रवास वर्णन, ललित लेख इत्यादी साहित्य पुस्तकाच्या माध्यमातून व फेसबुक माध्यमातून प्रकाशीत झाले आहे. आज २७सप्टेंबर २०२३ रोजी त्यांनी ही देणगी देऊन खर्या रुपाने आपल्या आईस श्रद्धांजली वाहीली आहे.श्री जिव्हेश्वर सामाजिक विकास संस्थेचे पदाधिकारी व सभासदांच्या वतीने त्यांच्या मातोश्री कै. यमुनाबाई लटिंगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वहात आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शब्दांकन:श्री विवेक टपळे ओझर्डे
Comments
Post a Comment