क्रिडा साहित्य वाटप
🎖️🏅🥇
हार्दिक अभिनंदन!!!
'सिंपल स्टेप्स ' या ध्येयाने प्रेरित होऊन स्वतःच्या आनंद आणि आरोग्यासाठी दररोज आपण धावूया..... हा संदेश देणारे धावपटू श्रीमान आशिष कसोडेकर,पुणे यांनी मॅरेथॉन स्पर्धेत जागतिक स्तरावर रेकाॅर्डब्रेक कामगिरी केली आहे.
पन्नास वर्षांच्या या अवलियाने भारताच्या शहात्तराव्या वर्धापनदिनानिमित्त केरळ ते लडाख अशी ७६ दिवसांची मॅरेथॉन पूर्ण केली आहे.१जूनला केरळ येथून शुभारंभ करुन १५ ऑगस्ट यादिवशी लडाख येथे त्यांनी ध्वजारोहण केले.अशी अलौकिक कामगिरी करून भारताचे नाव जगात उंचावले.यापूर्वी त्यांनी सलग ६०दिवस धावून मॅरेथॉन पूर्ण केली आहे.दररोज ते ४२किमी धावायचे.या दैदिप्यमान ऐतिहासिक कामगिरीनिमित्ताने ७६ क्रिडा साहित्याच्या कीटचे वाटप त्यांनी केले.या कार्याची शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन स्वतःचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी करावे.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी श्री मधली आळी गणेशोत्सव मंडळ,वाई यांनी या धावपूटचा गौरव केला. त्यावेळी वाशिवली, वडवली आणि कोंढावळे या दुर्गम भागातील शाळांना क्रिडासाहित्याच्या कीटचे वाटप जननायक आमदार मकरंद पाटील, धावपटू आशिष कसोडेकर,अध्यक्ष श्री अमोल पटवर्धन आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याबद्दल वाशिवली केंद्र समूहाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष श्री अमोल पटवर्धन आणि प्रायोजक श्रीमान आशिष कसोडेकर यांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹
Comments
Post a Comment