सेवानिवृत्ती गौरव सोहळा
आज वयगाव,वाशिवली व मेणवली केंदसमुहाचे *केंद्रप्रमुख ,आमचे सन्माननीय बापूराव भगवान वैराट साहेब* हे नियतवयोमानाने २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
*"आजची सकाळ एक बातमी घेऊन आली.
जी ऐकूण क्षणभर शांतता पसरली
सेवापुर्तीच्या वृत्ताने नयन भरुन आले
अन् क्षणात आपले ज्ञानकार्य मनी दिसू लागले"*
या चार ओळी लिहिणे जेवढे सोपे तेवढे प्रत्यक्षात आणणे महाकठीण…पण आपण मात्र या आज सत्य करवून दाखवल्या.
*सर्वांशी मिळूनमिसळून,शिक्षकांचा कल पाहून काम कसं करावं अथवा करवून घ्यावं* हे जर कोणाकडून शिकायचे असेल तर आपल्याकडूनच. *कोणत्याही वयाच्या शिक्षक सहकार्यासोबतच काय तर विद्यार्थ्यांनसोबत ही आपण दुधात साखर विरघळावी तसे आपण विरघळलात.*
म्हणूनच म्हणावेसे वाटते,
*आठवणी आपल्या सोबतच्या पुन्हा पुन्हा आठवतात*
*नयन सागरात दाटलेल्या अश्रूंना त्याच तर पाठवतात.*
आपल्या सोबत घालवलेला प्रत्येकक्षण आम्हांस नक्कीच बरेच काही शिकवून गेला.या शिदोरीवर नक्कीच आम्ही आमच्या आयुष्यातील हा ज्ञानदानाचा प्रवास दैदिप्यमान करु.मात्र
*वाटले नाही कधी आम्हाला तुमचा निरोप आपला घ्यावा लागेल*
*सदा हास्यरूपी गालावर लपलेला अश्रूचा थेंब नकळत ओघळेल*
असो पण नक्कीच आपले यानंतर चे आयुष्य सुखी समाधानी जाईल अशा हृदयापासून शुभेच्छा देतो.
*सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही*
*नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही*
आपलं हे मित्रत्वाचे शालेय सहकार्याच्या पलीकडचे नाते हे चिरंतर राहील एवढे मात्र नक्की.
# मराठीच्या प्रांगणी
शारदेच्या अंगणी
कृष्णेच्या काठी
सेवागौरवा साठी...….
जमले ज्ञानरथाचे यात्री
घेऊन शुभेंच्छांची जंत्री
वैराट सरांची सेवापुर्ती
जुळली आपुलकीची नाती……..
-आपले शुभेच्छुक-
वाशिवली केंद्रसमुहातील सर्व शिक्षकवृंद - -शब्दांकन-
रविंद्र लटिंगे शाळा कोंढावळे
दिनांक-२७फेब्रुवारी २०२२
Comments
Post a Comment