कोंढावळे शाळेत खेळाचे साहित्य वाटप






🍁कोंढावळे शाळेत खेळाचे साहित्य व गणवेश वाटप       दि वी क्रिया फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढावळे येथील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य व गणवेश वितरण करण्यात आले.या वेळी दि वी क्रिया फाऊंडेशनचे विश्वस्त श्री नरेंद्र हिरासकर,श्रीमती दिव्या हिरासकर,श्री जितेन्द्र जोशी,श्रीमती प्रिती जोशी,कुमारी तानिया जोशी,श्री धीरज म्हेत्रे,सौ प्रिती म्हेत्रे मॅडम  यांच्या शुभहस्ते सुमारे ५१०००रु.साहित्य वितरित करण्यात आले.यावेळी सरपंच धोंडिबा कोंढाळकर,आनंदा कोंढाळकर,बाळासाहेब कोंढाळकर,सर्कल कोरडे मॅडम, मधूकर कोंढाळकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तर साहित्य उपलब्ध करणेसाठी श्री अंकुश कोंढाळकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र लटिंगे यांनी केले. यावेळी श्री नरेंद्र हिरासकर आणि नारायण कोंढाळकर यांनी विचार व्यक्त केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.आभार श्री सुनील जाधव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीते साठी सौ नलिनी मुसळे,सौ रत्नमाला कोंढाळकर यांनी सहकार्य केले.🌹🙏🏻

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड