पुस्तक परिचय पाऊले चालती





पुस्तकांचे नाव .   पाऊले चालती
लेखक.... रवींद्रकुमार लटिंगे
पुस्तक प्रकार.... प्रवास वर्णन
प्रकाशक... ग्राम मित्र पब्लिकेशन
किंमत .. एकशे पंचवीस रूपये
पाने... एकशे बत्तीस 
वाचन साखळी समूहाच्या माध्यमातुन रवींद्र लटिंगे सरांचा परिचय झाला. प्रचंड वाचन असणारा हा माणूस. त्यांनी केलेली अनेक पुस्तक परिक्षण वाचून हा व्यक्ती केवळ वाचतच नाही तर त्या वाचनावर त्यांचे सखोल चिंतन आणि मनन पाहायला मिळत होते. त्यांनी केलेलं एखाद्या पुस्तकाचं परीक्षण म्हणजे लेखकाच्या कलाकृतीला मिळालेला बूस्टर डोस असे समजायला काहीच हरकत नाही. पेशाने शिक्षक असणारा माणूस म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. शिकवण हा तर प्रत्येक शिक्षकाचा स्थायीभाव आहे. या शिकवण्याबरोबर भ्रमंती, सूत्रसंचालन , वाचन ,लेखन, काव्यरचना अश्या अनेक क्षेत्रात ते कार्यरत आहेत.
त्यांचं पाऊले चालती हे पुस्तकं हातात घेतलं. पुस्तकाचं मुखपृष्ठ आपल्याला आकर्षित करते.
यात एकूण तीस छोटी मोठी प्रवास वर्णन या पुस्तकात आहेत. माणसाने ज्ञान आणि निसर्ग अनुभवण्यासाठी फिरल पाहिजे. भ्रमंती केल्यामुळे माणूस अगदी डोळसपणे पाहायला शिकतो.
आपल्या आजूबाजूला निसर्गात अनेक घटक असतात ते आपल्याला काही ना सांगत असतात फक्त आपण त्याकडे त्या दृष्टीने पाहायला पाहिजे. पाऊले चालती या पुस्तकातून आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद कसा घ्यावा याचा एक वस्तुपाठ यातून मिळतो. त्यांनी कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्या सोबत केलेला प्रवास छान पद्धतीने शब्दबध्द केला आहे. जवळच्या परिसरात केलेल्या पायी प्रवासाचे वर्णन त्यांनी केले आहे.
एखाद्या पर्यटनस्थळी गेल्यानंतर तिथे नक्की काय पाहावं हा प्रश्न अनेकांना पडतो. पण सरांच पुस्तक वाचल्यानंतर काय पाहावं हे वाचकांना समजते. आपला वेगवेगळ्या कामानिमित्त अनेक वेळा प्रवास होत असतो. त्या परिसरात वेगळं काय पाहण्यासारख हे जाणून घेतलं तर आणि त्या परिसराला भेट देऊन तेथील निसर्ग सौंदर्याचा आणि भौगोलिक परिस्थिती पाहता येते याच उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची रांजणखळगे निघोज येथील भेट होय.
निसर्ग , माणसं, भौगोलिक परिस्थिती, राजकीय , ऐतिहासिक परंपरा, निसर्गातील बदल असे अनेक घटक या पुस्तकात आहेत. प्रवासच वेड असणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक अधिक मार्गदर्शक ठरणार आहे पण ज्यांना प्रवास , भटकंती यांची रुची नाही त्यांनी हे पुस्तक वाचल्यास त्यांनां प्रवासाची आवड नक्की निर्माण होईल.

प्रा कुंडलिक शांताराम कदम,
तळेगांव ढमढेरे. तालुका शिरूर पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड