काव्य पुष्प-२५३ अनाथांची माय
पद्मश्री पुरस्कार विजेत्या थोर समाजसेविका 'अनाथांची माय' सिंधुताई सकपाळ यांना भावपूर्ण आदरांजली.🌹🌹
अनाथांची माय
अनाथ लेकरांची माय
वंचित पिडीतांची आय
बेसहारा मुलामुलींना
जगण्यास दिला न्याय....
सामाजिक समस्येचे
डोंगराएवढं मोठंकाम
स्वकृतीतून मानवतेचे
उभारलं निस्वार्थी काम....
आभाळमायेची सावली
हजारो लेकरांना भावली
कारुण्यसिंधू मायमाऊली
अनाथांची माय हरपली.....
संघर्षमय जीवनाची धार
निराधारांना दिला आधार
उपेक्षितांना दिलं मुक्तदार
मातृत्वाचा दिला पदर....
परमेश्वर हरवला राऊळी
सेवाकार्याला तोड नाही
अमोघ वाणी उत्तुंग कार्य
सदैव स्मृतीत चिरकाल राही....
Comments
Post a Comment