सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

🍁🌹आमचे शिक्षक सन्मित्र श्रीमान राजेंद्र जाधव सर ओझर्डे गावचे सुपुत्र ३१ऑगस्ट २०२५रोजी नियत वयोमानानुसार वरिष्ठ मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या शैक्षणिक कर्तव्य पुर्तीच्या सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा 🌹 सातारा जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयाच्या वार्षिक क्रिडा स्पर्धेत कबड्डीत आपण नेत्रदीपक पकड करत,क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालयास विजेतेपद मिळवून देण्यात आघाडीवर होतात. फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील प्राथमिक शाळेत आपण शैक्षणिक सेवेचा श्रीगणेशा केलात. तदनंतर आपली बदली वाई तालुक्यातील दुर्गम भागातील वासोळे,कणूर, पांडे,देगांव येथे झाली. तेथील ज्ञानमंदिरात अध्यापकाचे प्रभावी कामकाज केलेत. आपल्या ओझर्डे ग्रामभूमीजवळील पांडे शाळेत झाली.इथेच खऱ्या अर्थाने आपणास कलागुणांना सादर करण्याची संधी मिळाली.शिक्षकवृदांच्या सहकार्याने श्री भैरवनाथ नवरात्र उत्सवात साजरा झालेला शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम बहारदार आणि नाविन्यपूर्ण असायचा.ढोलकी हार्मोनियम वादक आणि गायकांसह सादर व्हायचा.प्रेक्षकांची वाहवा मिळायची. उळुंबबलकडी येथील प्राथमिक शा...