पुस्तक परिचय क्रमांक:२१० साद

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२१० पुस्तकाचे नांव-साऽऽद लेखिका: डॉ.प्रज्ञा शरद देशपांडे प्रकाशन- नचिकेत प्रकाशन, नागपूर प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२३फेब्रुवारी २०१७ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१२६ वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २१०||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव -साऽऽद लेखिका: डॉ प्रज्ञा शरद देशपांडे 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 मला मला वाटते मुक्त असावे, सदा विवेकी युक्त असावे | आत्मानंदी मग्न असावे, शक्य असे का सांग ? सख्या रे,शक्य असेल का सांग? प्रियकराला सखी'सांग सख्या रे'या काव्यातून मनातील अनावर भावना व्यक्त करतायत प्राध्यापिका तथा कवयित्री डॉ.प्रज्ञा देशपांडे 'साऽऽद'या काव्यसंग्रहात. कविता म्हणजे अंतर्मनाच्या चिंतन मंथनातून बाहेर पडलेला सौंदर्यगर्भ असा उद्गार! ही सहज साधना नव्हे, त्यासाठी चिंतनऊर्जेचा दाह सहन करावा लागतो.तेंव्हाचअक्षरांच्या चित्रलिपीला प्राणसत्वासह अक्षरत्व प्राप्त होतं.. शब्दांची वि...