खाऊ गल्ली माझेरी पुनः फलटण
'खाऊ गल्ली' एकाच ठिकाणी सर्व अल्पोपहाराचे पदार्थ या उपक्रमाचे जिल्हा परिषद आदर्श शाळा-माझेरी ता.फलटण येथे उत्साही वातावरणात संपन्न... प्रारंभी शिक्षणप्रेमी सरपंच श्री ज्ञानेश्वर दिघे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विष्णू दिघे, उपाध्यक्ष श्री उमेश झांजुर्णे ,माजी अध्यक्ष श्री रामचंद्र दिघे,श्री गणेश दिघे तसेच सर्व समिती अध्यक्ष आणि महिला पालक आणि शिक्षकवृंद यांच्या हस्ते 'खाऊ गल्ली'चा शुभारंभ झाला...
पालकांच्या मदतीने बनवलेल्या पदार्थांची नुसती रेलचेल होती.३० स्टॉलवर तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ पाहून खाण्याची इच्छा झाली.अन् पालकांची पाऊलं नकळत एकेका स्टॉलवर रेंगाळू लागली. आस्वाद घ्यायला गर्दी होऊ लागली.एकसोएक पदार्थ नाष्ट्यामध्ये उपलब्ध होते.चमचमीत चटकदार भेळ,तिखटगोड पाणीपुरी,मिठ्ठास गोड गुलाबजाम, वाफाळलेला चहा,खमंग आणि स्वादिष्ट वडापाव, कुरकुरीत मसाला पापड, स्वादिष्ट शाबुवडे सोबतीला खोबऱ्याची चटणी तर दही, खमंग रुचकर भजी,मंच्युरीयन,सामोसे, कुरकुरीत वेफर्स आणि मऊसर खिचडी, पॅटिस, कुरकुरीत नाचणीची तळलेली बॉबी,मक्याचा चिवडा, वेलकम रसना,मलईदार लस्सी,बुंदीचे लाडू, मेथीचे पराठे, सेंद्रिय गूळ, बिस्किट्स पुडे,खारे शेंगदाणे, चिक्की, खुसखुशीत भडंग,व्हेज बिर्याणी, खमंग ढोकळा, बासुंदी चहा,कुरकुरे ....आणखी बरंच काही.. खरंच नेटकं नियोजन सर्व शिक्षकांनी केलं होतं.
Comments
Post a Comment