पुस्तक परिचय क्रमांक:१५३ विखुरलेले स्वप्नचांदणे

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१५३ पुस्तकाचे नांव-विखुरलेले स्वप्नचांदणे लेखकाचे नांव-मीनल येवले प्रकाशक-ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०२३ प्रथम पृष्ठे संख्या–९७ वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह किंमत /स्वागत मूल्य--२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १५३||पुस्तक परिचय विखुरलेले स्वप्नचांदणे लेखक: मीनल येवले 📚📚📚📚📚📚📚📚📚📚 असंख्य विचारांचे काहूर कवयित्री सख्याच्या अनुपस्थितीत विरह साहते अन् भावभावनांच्या कल्लोळातून कवितेच्या परिघावर स्वतःला मोकळं करते.मनोकुंभातून दाटलेल्या भावना, अनावर झालेल्या भावनांना घटनेत बध्द करून काळीजकप्पातल्या प्रिय सहचराच्या स्मृतींना शब्दात लयबध्द बांधून वेदनेचं आभाळ रितं करणारा काव्यसंग्रह “विखुरलेले स्वप्नचांदणे” कवयित्री मीनल येवले यांनी नियतीने एकाएकी केलेल्या ताटातुटीच्या आकांताचे गाणे या काव्यपुष्यात गुंफलय.अन् हे अक्षर नक्षत्र प्रिय सख्याला अर्पण केलेय....