पुस्तक परिचय क्रमांक:१२९ मोबाईल माझा गुरु







वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१२९
पुस्तकाचे नांव-मोबाईल माझा गुरु
लेखकाचे नांव- नागेश शेवाळकर 
प्रकाशक- श्री सुभाष शंकर विभूते,मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड,आजरा 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०२३ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–७२
वाड़्मय प्रकार-बाल कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१२९||पुस्तक परिचय
         मोबाईल माझा गुरु 
लेखक: नागेश शेवाळकर
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

     संवादरुपाने हितगुज करणाऱ्या बालकथा
संस्कारी गुणांचे आचरण कसे असावे याची शिदोरी समजावून देणाऱ्या बालकथा आहेत.
     पालकांचे समुपदेशन करणारा हा कथासंग्रह आहे.हल्लीची मुलं मोबाईल शिवाय जगूच शकत नाहीत.कारण सतत त्यांना मोबाईल हवं असतो. त्यातील खेळ,गाणी, व्हिडिओ,कोडी पाहण्यासाठी ती उतावीळ झालेली असतात. त्यापायी ते तहानभूक विसरून जातात.याचं मोबाईल मुळे कैकदा नवलाईच्या घटना ही घडतात.
     'मोबाईल माझा गुरु'हा बालकेंद्रित कथासंग्रह आहे.यातील अकरा कथांमधून जीवनमूल्ये, संस्कार आणि आचरण यांचा वास्तूपाठ घालून दिला आहे.मुले अनुकरणप्रिय असतात.मोबाईल मुलांच्या हाती पालकच आपलं काम पूर्ण होताना त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून मुलांना गोड गोड बोलत मोबाईल हातावर टेकवतात.अन्  तोच मुलगा पुन्हा पुन्हा हट्ट धरु लागला की शिक्षा करतात.तर कधी रागावतातही.
नातवंड म्हणजे आजोबांचा जीव की प्राण असतो.जशी दुधावरची साय. त्यांचे सगळे हट्ट पुरवायला आजोबा एका पायावर तयार असतात.यातील बऱ्याच कथांमधील घटना प्रसंग आपण वाचताना आजोबा असणाऱ्या वाचक मंडळींना आपल्या नातवंडांची आठवण येणारच.आपल्याच घरात घटना घडतेय असं आपणास जाणवते. इतकी ताकद या कथांमधील लेखन शैलीत आहे. बऱ्याच कथा संवादाभिमुख आहेत.संवादामुळे कथानक आपल्यासमोरच घडतंय असं वाटतं.
या कथांमधील भाषा सहजसुंदर आणि सोपी आहे. यातील कथा 'बोधकथा' म्हणून शाळाशाळांमधून परिपाठात सांगितल्या तर संस्कारक्षम वयात मुलांना मोबाईलचे खरे रुप लक्षात येईल.अगदी छोट्याशा प्रसंगातूनही लहानग्या मुलांचे मोबाईल वेड गुरुपदी कसे पोहोचतेय याचीही उकल या कथांमधून अवगत होते. लेखक नागेश शेवाळकर यांनी या कथांमधील अनेक घटनांचे नायक असणारी नातवंड ;चि.रामांश आणि रिधान यांना हे पुस्तक अर्पण केले आहे.
या कथासंग्रहात अकरा कथा गुंफलेल्या आहेत.
    प्रसंगचित्रांचे रेखाटन गरजेप्रमाणे आशयाधिष्ठीत आहे.या कथांमध्ये बालके नायक नायिका आहेत.
मुखपृष्ठ शिर्षकाप्रमाणेच बोलकं असून आजी आणि नातीची स्नेहाची मैत्री दृढमूल करणारी आहे.जणू आजी म्हणजेच नातवंडाची मोबाईल गुरु वाटते.मलपृष्ठावर प्रकाशन संस्थेचा रौप्यमहोत्सवी बालकेद्रिंत चळवळीचा प्रवास अधोरेखित केला आहे.
अकरा कथा संवादाभिमुख आहेत. त्यातील काही कथांचा आशयाचे विवेचन केले आहे. 'समजूतदार आसावरी' कथेतील आसावरी आई आणि आत्त्या यांच्यातील अबोला मेसेज द्वारे संपुष्टात आणून पुन्हा त्यांना मोबाईल द्वारे संपर्कात ठेवण्यासारखी, संवाद साधण्यास तिने काय केले.तो संवाद या कथेतून आपणास समजतो.तर 'हट्टी रितेश' चा मोबाईल बघत  जेवणेचा हट्ट;आजोबा प्रत्यक्ष कृतीतून कसा घालवतात याची कथा.या कथेतून कथाकार अश्या मुलांना प्रत्यक्ष कृतीतून कसे समजावे यांचा आदर्श वास्तूपाठ घालून देतात.
मोबाईल आपणास पाहिजे त्या अडलेल्या प्रश्नाची तसेच अनभिज्ञ असणाऱ्या गोष्टीची तत्काळ माहिती हजर करतो.तो आपल्या उपयोगी पडतो.मग तो आपला गुरु होत नाही क?असा चौकस प्रश्न विचारणारी प्रेरणा.तिची आजी आणि आजोबा सोबतची  देव आणि मोबाईल आपला गुरु कसा आहे.याची उत्तम प्रचिती देणारी कथा'मोबाईल माझा गुरु'.गुरु मार्ग दाखवितात चांगले विचार सांगतात. हल्लीच्या पिढीला मोबाईल महत्त्वाचा आहे.
'जास्वंदी' तिच्या मावस भावाला केदारला आजी आणि आजोबा तिच्यासाठी काय काय करतात.याचा फोनसंवाद अतिशय बोलका आहे.आई आणि बाबा नोकरी करत असतील तर मुलांची काळजी घ्यायला आजी आजोबा असतात.नातवंड सांगतील ते हजर करण्याचं काम करतात.त्यांच्याशी सान होऊन खेळतात.
    अशा धमाल मजेशीर आणि संस्कारक्षम कथांचा आस्वाद घ्यायला अतिशय सुंदर असा ' मोबाईल माझा गुरु' हा कथासंग्रह आहे.' सांग सांग भोलानाथ'या लोकप्रिय गाण्याचे बीज घेऊन बनविलेली जमाडी जम्मत… गमाडी गम्मत..भंबेरी भूम्म ही कथा विनोदी आहे.कृतीयुक्त अध्ययन अनुभव देणारा, 'प्रकल्प' कथासार.प्राणीमात्रांना दया करा, त्यांना चारा पाणी देऊया.याचे प्रत्यक्ष दर्शन या कथेतून घडते.
हल्ली मोबाईल आणि मुलं म्हटलं की त्याचा गैरवापर करतील अशी भिती पालकांना वाटते. पण विचारांची सकारात्मकता या लेखक नागेश शेवाळकर यांनी 'मोबाईल माझा गुरु' कथासंग्रहातून प्रस्तुत केली आहे.बालकेंद्रित मनोरंजक कथांतून संस्काराची बीजे पेरणारा कथासंग्रह आहे….

परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई

Comments

  1. नमस्कार. खूप छान परिचय करून दिला आहे. धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड