जिव्हेश्वर जन्मोत्सव सन २०२३
भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव वाई विविध उपक्रमांनी साजरा....
समस्त साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव विविध उपक्रमांनी स्वकुळ साळी समाज बांधवांनी साजरा केला. सुर्योदयापुर्वी पूजा,पाळणा, आरती आदी कार्यक्रम संपन्न झाले. दुसऱ्या सत्रात देशासाठी शहीद झालेल्या वीरांना व ज्ञात- अज्ञात कलाकार, समाजसेवक व समाज बांधवांना श्रध्दांजली अर्पूण जन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक सचिव श्री रवींद्र लटिंगे यांनी केले.प्रमुख अतिथी व महाप्रसादाचे मानकरी श्रीमती सरोजिनी मारुतराव हावरे , सल्लागार श्री दत्तात्रेय मर्ढेकर, भास्करराव कांबळे यांचे स्वागत अध्यक्ष श्री महेंद्र धेडे, उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मर्ढेकर यांनी केले.तद्नंतर कलाविष्कार रेकॉर्ड डान्स दिशा कोदे, ज्ञानदा दाहोत्रे ,श्रिया दाहोत्रे यांनी बहारदार सादर केला.श्रेया पोरे हिने उत्कृष्ट वक्तृत्वाची झलक सादर केली. तदनंतर स्पर्धापरिक्षेतून पोलिस उपनिरीक्षक व राज्यकर निरीक्षकपदी निवड झालेले श्री मयूर प्रमोद गवते ओझर्डे ,आदर्श धन्वंतरी पुरस्कार विजेते डॉ.श्रीकांत तांबे , शास्त्रीय संगीत गायन परीक्षा उत्तीर्ण सौ.विद्या साळी, आदर्श महिला पुरस्कार विजेत्या सौ.सोनाली कोदे , महाप्रसादाचे मानकरी श्रीमती सरोजिनी मारुतराव हावरे आणि उत्सव सोहळ्याचे स्थळप्रमुख श्री रघुनाथ दाहोत्रे यांचा सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.इयत्ता दहावी-बारावी परीक्षेत सुयश मिळविलेल्या पृथ्वी हावरे, वैष्णवी सुकाळे,शरयू गवते आणि इंजिनिअरिंग पदवी आणि पदविका प्राप्त शुभम सुकाळे, साक्षी दाहोत्रे, दीक्षा अरबुणे,रजत गवते, ओंकार मर्ढेकर तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती धारक विदीत तांबे आणि श्रेया पोरे, फेन्सिग स्पर्धेत सुयश मिळवलेल्या विरजा साळी आणि तबलावादन स्पर्धेत यशस्वी झालेल्या वरद साळी या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. समाजातील शालेय विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या हस्ताक्षर व संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. संगीतखुर्ची स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या सौ.पूनम दातरंगे, द्वितीय क्रमांक विजेत्या सौ.चारुशीला दाहोत्रे आणि तृतीय क्रमांक विजेत्या सौ.रुपाली मर्ढेकर यांनाही रोख पारितोषिक प्रमुख अतिथी, अध्यक्ष, उपाध्यक्ष,खजिनदार यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
तदनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन श्री महेन्द्र धेडे यांनी केले. जमाखर्च व ताळेबंदाचे वाचन श्री रवींद्र लटिंगे यांनी केले.यावेळी योगेश दाहोत्रे,सौ.शकुंतला मर्ढेकर,सौ.स्मिता भागवत भंडारी आणि दत्तात्रय मर्ढेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अवचित्य साधून श्री रविंद्र लटिंगे यांनी मातोश्री कै.सौ.यमुनाबाई गणपत लटिंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आमचे दैवत भगवान श्री जिव्हेश्वर प्रतिमा भेट सौ.प्रेमा लटिंगे आणि प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते उपस्थित साळी बांधवांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका तांबे हिने केले.आभार स्वप्निल दाहोत्रे यांनी मानले.जिव्हेश्वर महाआरतीचा मान प्रमुख अतिथी श्रीमती सरोजिनी मारुतराव हावरे आणि परिवार यांना देण्यात आला. महाप्रसादाचा आस्वाद सर्व समाज बांधवांनी घेतला.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री रमेश बारगजे, श्री दत्तात्रय मर्ढेकर,श्री भगवान गवते,श्री जनार्दन अरबुणे, सौ.चारुशीला दाहोत्रे, योगेश दाहोत्रे,श्री महेंद्र धेडे,श्री स्वप्नील दाहोत्रे,श्री अजित हावरे, श्री.योगेश पोरे,श्री आनंदा सुकाळे,सौ.पूनम दातरंगे, सौ.विद्या साळी, भास्कर मर्ढेकर,योगेश पोरे,श्रीमती सारिका गवते, सौ.प्रेमा लटिंगे,सौ.विजया कांबळे,सौ.सुमन कांबळे ,सौ सोनाली कोदे,श्री.तुषार कोदे,श्री.शेखर डांगरे, श्री.सागर मर्ढेकर,श्री.उमेश तांबे, रमेश भागवत सौ.शकुंतला मर्ढेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास सौ.सुमती मगर, श्री दीपक मगर, श्री राजू साळी,सौ.उर्मिला साळी,सौ.इर्षा तांबे, डॉ.श्रीकांत तांबे, सौ.संगिता गवते,श्री प्रमोद गवते आणि वाई शहर व परिसरातील सर्व स्वकुळ साळी समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.......।।
Comments
Post a Comment