भटकंती सोनेश्वर ओझर्डे नदीचा प्रवाह






कृष्णानदीच्या पात्रातील कातळाचा नैसर्गिक आविष्कार....कातळशिल्प

सोनेश्वर ओझर्डे वाई येथे कृष्णानदीचे पात्र कातळावरुन प्रवाहित होताना खळाळता नाद आपणाला मंत्रमुग्ध करतो. अन् आपली पाऊलं आपोआप तिकडे त्या आवाजाच्या दिशेने वळतात. तिथली प्रवाहित जलधारा पाहताना  मन ओलेचिंब होवून जातं. त्याचवेळी तेथील सभोवतीचा खडक आणि खडकातील विविध आकार मनाला भुरळ घालतात.तो प्रवाह खडकावरुन आणि काठावरुन पुढे जाताना पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे,घर्षणामुळे पाणी भोवऱ्यासारखे फिरुन  पुढे जाते असते.तिथल्या नदीपात्रातील खडकाला छोटेमोठे  कुंडासारखे लांबट गोल आणि  खोलगट खळगे कमीअधिक  खोलीचे पडलेले आहेत .ते बघताना उत्सुकता शिगेला पोहोचते तर  कुतूहल निर्माण होते. जणू काही लाकडावर रंधा फिरवल्याने गुळगुळीत मुलायम स्पर्श लागतो.तसेच इथल्या कातळावरुन हात फिरवल्याने जाणवते. काठावरील खडकाच्या दोन्ही बाजूला आणि जलप्रवाह धारेत वेगवेगळे आकार विशेषतः रांजण, उखळ,खड्डे, पाण्याची खोलगट धार अथवा ओहळ या रुपात दिसतात. ते बघताना निघोज येथील कुकडी नदीच्या पात्रातील कातळशिल्पाची आठवण येते.त्याच पध्दतीचे छोटेमोठे खळगे डोह ते पूल दरम्यान कातळ खळगे बघायला मिळतात...
निसर्गाच्या सान्निध्यात अमाप ऊर्जा आणि नवचेतना मिळते. विरंगुळ्यासाठी अशी ठिकाणं खुणावत असतात.नवनवीन काही तरी बघायला मिळते.जशी दृष्टी तशी बघायला मिळते सृष्टी...

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड