पुस्तक परिचय क्रमांक:१२४चंद्राचा रथ





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१२४

पुस्तकाचे नांव-चंद्राचा रथ  

कवयित्रीचे नांव-लतिका चौधरी 

प्रकाशक- दिशोत्तम प्रकाशन, नाशिक 

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-ऑक्टोंबर २०१७/ प्रथमावृत्ती

पृष्ठे संख्या--५९

वाड़्मय प्रकार- बालसाहित्य काव्यसंग्रह 

किंमत /स्वागत मूल्य--६०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚

१२४||पुस्तक परिचय

          चंद्राचा रथ

कवयित्री: लतिका चौधरी 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃

सत्यम् शिवम् सुंदरम्

हा आरसा कवीचा

जे न देखे रवी तेथे मात्र 

जाई कटाक्ष कवीचा

कवी शब्दरत्नांचा सागर

कवी भांडवलाची घागर….

 'कवी' या नामाच्या कवितेतील वरील ओळी कवीच्या मनातील भावना आणि उमाळा यथार्थ शब्दात प्रगल्भता स्पष्ट करतात.ही कविता आहे,लतिका चौधरी यांच्या 'चंद्राचा रथ ' या बालकाव्यसंग्रहातील.सहज सुलभ मनाचा स्वाभाविक हुंकार म्हणजे 'चंद्राचा रथ' हा काव्यसंग्रह आहे.

हा बालकाव्यसंग्रह वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांनी आयोजित केलेल्या पुस्तक परिचय उपक्रमांत उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल भेट मिळालेला आहे. 

  साहित्यिका लतिका चौधरी यांचा 'चंद्राचा रथ'हा काव्यसंग्रह बालविश्वातील मुलांना आणि कुमारांना रसग्रहण करायला आकर्षित करणारा आहे.'बालपण देगा देवा 'या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला बालपण आठवत राहते.त्यातील जमाती गंमत जंमत आपण कुतूहलाने इतरांशी शेअर करतो.समवयस्क मित्रांसोबत गप्पांमध्ये रंगून जातो. बालपणी आपणाला गारुड करणाऱ्या पावसाच्या कविता वाचताना आपणही नकळतपणे भिजून जातो.तर  यातील तळपते पराभव, शपथ, कंपास,कवी, शिकावं,'थेंब थेंब वाचवू या' आदी कविता वाचताना वैचारिक मंथन होते.

लहान मुलांचा लाडका पाऊस !तो बरसणारा मुलांना चिंब भिजायला, चिखलात उड्या मारायला व नाचायला फारच आवडते.तसेच मनाला उल्हास आणि हिरवगार मन करणारा श्रावण महिना आणि तनमनाला संजिवनी देवून हर्षो उल्लाहासात आनंद वाटणाऱ्या पावसाच्या कविता,'पाऊस आला',प्रवास पावसाचा, पावसाची किमया,अरे वेड्या पावसा, पाऊस सर या कविता वाचताना पावसाची रुपं,प्रकार व चराचरातील  प्राणीमात्रांशी होणारे निसर्गाशी हितगुज अप्रतिम रचनेतून व्यक्त होताना दिसून येते.


टपोरे थेंब तुझे मन पुलकित करती

सर सर सरी तुझ्या मन धुंद करती

अलौकिक प्रेम आकाशधराचे सारे जाणती

रिमझिम सरी हेच प्रेम दूर होवून सांगती..


"चंद्राचा रथ " याच शीर्षकाची रचनाही सहजसुंदर व अलवारपणे रचलेली आहे.

ती वाचताना मराठी साहित्यातील  सुप्रसिध्द लेखक व कवी गीतरामायणकार आदरणीय ग.दि.माडगूळकर यांच्या 'गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण "या  लोकप्रिय बालगीताची आठवण मनात रुंजी घालायला लावते…


"आई आम्ही दोघं बहीण भाऊ 

पावसाच्या धारेने गगनी जाऊ

तेथेच मनवू आम्ही राखी दिवाळी

ताऱ्यांच्या दिल्याने ताई ओवाळी…"


मुलं म्हणजे देवाघरची फुलं असणाऱ्या मुलांना कवयित्री लतिका चौधरी यांनी 'चंद्राचा रथ'हा काव्यसंग्रह अर्पण केला आहे. मायेची ऊब देणाऱ्या नातेवाईक आणि कुटुंबातील सर्वांचा उल्लेख करुन या काव्यसंग्रहाला प्रेरणा आणि शुभेच्छा देणाऱ्या मार्गदर्शक जेष्ठ पदाधिकारी  गुरुवर्य व सहकार्यशील सन्मित्रांशी ऋणाईत राहणंच त्या पसंत करतात.

बाल संस्काराची शिदोरी म्हणजे -चंद्राचा रथ ! या काव्यसंग्रहाचा उलगडा कवयित्री लतिका चौधरी यांनी रसिक मित्रांशी हितगुज या मनोगतात मांडलेलं आहे.रमेश चव्हाण नवापूर यांनी 'चंद्राचा रथ' या काव्यसंग्रहाची प्रस्तावना लिहिली असून ती प्रवाही अलवारपणे समर्पक व यथार्थ शब्दोत्सवात मांडलेली आहे.या संग्रहात ५९कविता रसिकांना रसग्रहण करायला उपलब्ध आहेत.मुलांच्या भावविश्वातील परिसरातील शब्दांच्या,गोष्टींच्या घटनांच्या रचना केलेल्या आहेत.यातील काही रचना नाद ताल व गेयदार आहेत.मुलांना गुणगुणूशी वाटणाऱ्या आहेत.'कंपास' कविता साधी असूनही जीवनाचं तत्त्वज्ञान उलगडून दाखविणारी आहे.सुखदु:खाचे घटनाप्रसंगी धीरोदात्तपणे कसे जगावे. याचाही उलगडा तळपते पराभव,शपथ, आळस,जीवन-क्षणाचा खेळ आदी कवितेतून जाणवितो.विशिष्ट प्रकारात काव्य लेखन न करता सर्वच प्रकार त्यांनी अतिशय अलवारपणे सहज सोप्या शब्दात कविता रचलेल्या आहेत.निसर्ग, आनंदीआनंद,गांव,पाऊस,शिक्षण,नातीगोती, स्वप्नं, भावना अशा सर्व प्रकारच्या अनुभवांच्या सृजनशील कविता रचलेल्या आहेत.तसेच समाजातील अनिष्ट प्रथा व परंपरावर शब्दप्रहार करायला त्या विसरल्या नाहीत.

अस्पृश्यतेचा कलंक काढू या

माणसा हीन लेखणे टाळू या

रक्त सर्वांचे लाल सांगू या

उच्चनिच ना कुणी सांगू या…

आंबेडकर -सावरकर करुया प्रणाम

जगा दिनाला जयांनी समतेचा मान !


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची 'बाबासाहेब'ही रचना अप्रतिम लेखणशैलीत सादर केली आहे.


एक नवा आयाम देऊन

करुणेचा सागर होऊन

बुध्द अष्टांग मार्ग दावला….

मानवता जोपासून,कसोटीवर उतरुन

बुध्द आणि त्याचा धम्म

भारताच्या घराघरात रुजविला….

त्यांनी भावविश्वातील कल्पना काव्यात शब्दबध्द करून बालरसिकांना कवितांची सुंदर मेजवानी दिली आहे. विद्यार्थीदशेतील मुलांनी ज्ञानार्जन कसं करावं हे सांगणाऱ्या आशयघन कविता परीक्षा व विषयज्ञान या कवितांचा समावेश या संग्रहात केलेला आहे.बालसाहित्यात 'चंद्राचा रथ ' हा काव्यसंग्रह स्वतंत्र ठसा उमटविणारा आहे.

नवीनतम आणि समृद्ध प्रतिभेचा आविष्कार त्यांच्या काव्यातून प्रगटतो. मंगल, उदात्त आणि उत्कट अशी अलौकिक कल्पना रचनेच्या ठायीठायी दिसून येते.वेगळ्या धाटणीचा काव्यसंग्रह

'चंद्राचा रथ!'

   तृण मी…..या कवितेतील 

खडक कपारी रुजतो मी

वसुंधरेला सजवतो मी

हिरवा शालू लेवूनी धरा

हिरवे गीत तिचे अधरा…. या ओळीप्रमाणे हा काव्यसंग्रह मुलांचे अनुभव विश्व संवर्धित करणारा आहे.  

""""""'"'“"'"'"'"'"'"'"'"'"'"'"'"'"'"'""""""""""

@परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई










Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड