पुस्तक परिचय क्रमांक:१२३ मराठेशाहीचे अंतरंग
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
१२३||पुस्तक परिचय
मराठेशाहीचे अंतरंग
लेखक: डॉ.जयसिंगराव पवार
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१२३
पुस्तकाचे नांव-मराठेशाहीचे अंतरंग
लेखकाचे नांव-डाॅ.जयसिंगराव पवार
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीयावृत्ती/ मार्च २०१८
पृष्ठे संख्या--१३४
वाड़्मय प्रकार-संशोधनात्मक
किंमत /स्वागत मूल्य--१७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
महाराष्ट्राचा इतिहास व राजर्षी शाहू चरित्राचे लेखक, संपादक व संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कलमातून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ते स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजे यांच्या ऐतिहासिक कालखंडानंतरच्या काळातील संशोधनात्मक मराठ्यांच्या गौरव गाथेचा ग्रंथ म्हणजे 'मराठ्यांचे अंतरंग'होय.यामध्ये महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक घटनांचा ऊहापोह या ग्रंथात केलेला आहे.इतिहासात फारशी ज्ञात नसलेल्या व्यक्ती व घटनांचा मागोवा या ग्रंथात इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी घेतला आहे.
तत्कालीन मराठेशाहीतील राजकारणातील संघर्ष, राजघराण्यातील घडामोडींचा इतिहास व सरदार वतनदार घराण्यांची ओळख ऐतिहासिक कागदपत्रांचा संशोधनात्मक व चिकित्सक अभ्यास करून निष्कर्ष लेखमालिकेतून वर्णिलेला आहे.अनेक बाजूंनी अभ्यास करून विश्लेषण दिलेले आहे.
या ग्रंथात कार्यकाळातील १२ लेख समाविष्ट करण्यात आली आहेत. ऐतिहासिक कागदपत्रातील वर्णन जसेच्या तसे प्रकाशित करुन त्यांचे विश्लेषण समर्पक शब्दात मांडलेले आहे.समारोपात अभ्यासलेल्या कागदपत्रांची यादी पुराव्यानिशी दिलेली आहे.अतिशय अभ्यासपूर्ण संशोधन करून लेख प्रस्तुत केलेले आहेत.यातील काही लेख यापुर्वीच मासिके व स्मरणिकेत प्रसिद्ध झालेले आहेत.या लेखातील माहिती नव्याने आपणाला समजते.अनेक तत्कालीन घडामोडींची माहिती आपणाला या लेखातून समजते.
'मराठ्यांचे अंतरंग' संशोधनात्मक ग्रंथ संशोधक व लेखक डॉ.जयसिंगराव पवार यांनी इतिहास संशोधनातील आद्य गुरू कै.डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केला आहे.संशोधनाचे पहिले धडे त्यांच्या सहवासात गिरवल्याचे ते आवर्जून नमूद करतात.त्यांनी मनोगतात बारा लेखांची आशयघनता संक्षेपाने रेखाटली आहे.त्या मनोगताचे रसग्रहण करताना स्वराज्याच्या मराठेशाहीतील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील अनेक नवेनवे पैलू आपणास समजतात.
१)छत्रपती संभाजी महाराजांस मोगली कैदेतून सोडविण्याचा एक अज्ञात प्रयत्न२) इतिहासाच्या अज्ञातवासातील मराठ्यांची एक राणी३)गिरजोजी यादव:मराठेशाहीतील एक कर्तबगार पण मतलबी मराठा ४) सेनापती धनाजी जाधव व गिरजोजी यादव यांचा तंटा ५) धनाजी जाधव: इतिहासाला कलाटणी देणारा सेनापती ६) मराठेशाहीतील एकमेव रक्तहीन राज्यक्रांती ७)महाराणी जिजाबाई आणि पेशवे माधवराव ८) मराठेशाहीतील पाच कर्तृत्वशालिनी स्त्रिया९) मराठेशाहीतील विजयादशमी आणि क्षात्र परंपरा १०)कुणबीण: मराठेशाहीतील स्त्री गुलाम ११) मराठेशाहीतील छत्रपती ऱ्हासाला का गेले?१२)किल्ले विशाळगड -महाराष्ट्राचे एक धारातीर्थ हे वैशिष्टयपूर्ण लेख समाविष्ट करण्यात आले असून शेवटी संदर्भ सूची व व्यक्तिनाम सूची दिलेली आहे.यातील क्रमशः असणारे लेख वैशिष्ट्यपूर्ण आहेत.अभ्यासपूर्ण संशोधन करून अनेक उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून निष्कर्ष काढून लेख प्रकाशित केले आहेत.मराठेशाहीतील अनेक घडामोडींचा परामर्श या लेखात दिलेला आहे. यातील लेख यापुर्वी स्मरणिका व स्मारकग्रंथात प्रकाशित झालेली आहेत.
पहिल्याच लेखात मराठ्यांचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांना संगमेश्वर येथे कपटाने मुघलांनी जेरबंद केले.सह्याद्रीच्या छत्रपतींची सुटका करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा या लेखातून उलगडत जाते. संभाजी महाराजांना सोडविण्याचा ज्योत्याची केसरकरांचा प्रयत्न यांची माहिती डॉ.शिंदे यांनी उलगडून दाखविली आहे.तर बत्तिस शिराळा येथील अप्पाशास्ञी दीक्षित यांच्या प्रयत्नांची माहिती अनपेक्षितपणे मिळते.ही दैनिक पुढारी वर्तमान पत्रातील 'वाचकांचा पञव्यवहार' या सदरातून प्रसिद्ध झाली होती.लोककथेच्या शोधातून आणि या घराण्याची हकिकत समजली त्याआधारे हा उल्लेख या लेखात केलेला आहे.
छत्रपती घराण्याच्या उल्लेखात अज्ञातवासात असणारी राणी म्हणजे राणी जानकीबाई.मराठ्यांचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची ही प्रथम पत्नी होय.शिवछत्रपतींच्या अनेक घडामोडींनी खच्चून भरलेल्या आयुष्यात त्यांच्या हातून पार पडलेले शेवटचे कार्य म्हणजे आपल्या धाकट्या पुत्राचा या जानकीबाईशी त्यांनी रायगडावर घडवून आणलेला विवाह समारंभ!कृष्णाजी अनंत सभासद यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही इतिहासकारांनी त्यांची ओळख अधोरेखित केलेली नाही.या जानकीबाई म्हणजे प्रतापराव गुजर या निधड्या छातीच्या असामान्य सेनापतीची कन्या. सेनापती प्रतापराव गुजर यांच्या हिंदवी स्वराज्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांची कन्या आपल्या धाकट्या पुत्रास करून सन्मानाने स्नुषा म्हणून रायगडावरील राजप्रसादात आणले.पण या जानकीबाईस २८ वर्षांहून अधिक काळ वनवासाच्या अग्निदिव्यातून जावे लागले.
गिरजोची यादव कर्तबगार पण मतलबी सरदार कराडच्या वतनदार देशमुखी घडलेला तंटाबखेडा आणि महाराणी ताराबाई यांच्या काळातील अंतपुरातील हवालदार गिरजोजी यादव..या सरदाराची माहिती या लेखातून आपणाला समजते. असे अनेक ऐतिहासिक घडामोडींचे पैलू प्रकाशित आणण्याचे आणि अलौकिक कर्तृत्वाचे ठसे अधोरेखित करणारा हा ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल.इतकं वास्तव मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात सखोलपणे केला आहे.
अप्रतिम लेखन शैलीतून ऐतिहासिक शब्दभंडार उमजते…इतिहासाचे गाढे अभ्यासक व संशोधक आदरणीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या लेखणी मानाचा मुजरा!!!!
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
परिचयक::श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई
Comments
Post a Comment