काव्यपुष्प:२५६ इंद्रधनू







श्रावणातल्या ऊनपावसातील इंद्रधनूचे विलोभनीय दर्शन आज आषाढात झालं!

             इंद्रधनुष्य
आकार सातरंगी वर्णपटाचा
 निसर्ग आहे किमयागार
पिवळ्या प्रकाश किरणांचा 
क्षणभर दिसे चमत्कार||

आषाढ मासातही रंगला
 खेळ ऊनपावसाशी
 इंद्रधनूचा गोफ विणला 
 कृष्णधवल अवकाशी   ||

 उमटली आभाळाच्या पाटीवर 
मनमोहक सप्तरंगी कमान 
वाऱ्यासंगे रिमझिम पावसाचे  
गायन वादन छान छान||

साज तुषार किरणांचा 
उभारला  आसमानी 
नजराणा इंद्रधनूचा   
भुरळ घालतो मनी||

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड