काव्यपुष्प:२५७ खवय्येगिरी





खवय्येगिरी 


खुसखुशीत रुचकर कांदाभजीनं

तुपातल्या जिलेबिला दिली हाक 


जोडीला आहे रवाळ म्हैसूरपाक

अन् गुलाबजामचा रसदार पाक 


घोटंघोट प्यायला मसालेदार ताक 

कैरीची फोड,मिरचीचा ठेचा चाख


ओल्या भेळीवर जरा कांदा टाक

तिखटगोडाचा जमलाय परिपाक


कडकडीत खुसखुशीत बाकरवडी

मसालेदार चटकदार अळूचीवडी


आंबटगोड खमंग सुरळीचीवडी

पचायला पित्तनाशक सोलकढी


ओल्या भेळीतले शेंगदाणे चाखू

बर्फीपेढ्याची चिमूठभर भर टाकू


रेवडी गाठीशेवची चवच न्यारी

चिरोटे अनारसेंचा आस्वाद भारी 


अवीट गोडीच्या आवडत्या पदार्थांची

अस्सल चव जीभेवर रेंगाळणारी


मिठाईच्या प्रसिद्ध दुकानाकडे 

आपोआप पावलं वळवणारी


श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी