पुस्तक परिचय क्रमांक-१०६ आत्मचित्र

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे, वाई पुस्तक परिचय क्रमांक-१०६ पुस्तकाचे नांव--आत्मचित्रे लेखिकेचे नांव--संजीवनी बोकील प्रकाशक-सौर पब्लिकेशन, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती २०२१ वाड़्मय प्रकार--ललितलेख संग्रह पृष्ठे संख्या-१६८ मूल्य/किंमत--२५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १०६||पुस्तक परिचय आत्मचित्रे लेखिका: संजीवनी बोकील 💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆 आयुष्याच्या प्रवासात विविधांगी अनुभवायला आलेल्या घटना- प्रसंगाचे हृदयाच्या कप्प्यातील स्मरणगंधी आठवणींना लेखणी आणि कुंचल्यातून साकारलेली सशक्त 'आत्मचित्रे' आहेत.या अनुभवसिद्ध कथांत सुंदरशा शब्दात लेखिका व निवेदिका संजीवनी बोकील यांनी गुंफले आहे.हा सुखदुःखाच्या आठवणींचा दर्पण आहे.यातील अनेक अनवटपणे घडलेल्या कथा सहज सुंदर शब्दसाजात गुंफलेल्या आहेत. शाळा,काव्यमैफिल आणि सुत्रसंचलन अशा त्रिकोणी आविष्कारातील आयुष्य 'आत्मचित्र' या पुस्तकातून गुलदस्ता बहारदारपणे शब्दचित्रांनी सज...