Posts

Showing posts from 2022

गरजू विद्यार्थ्यांला मदतीचा हात

सामाजिक दातृत्वाच्या कार्याचं प्रत्यक्ष दर्शन... आज मी माझ्या शाळेतील मुलांना आधारकार्ड काढण्यासाठी शहरातील एका बॅकेच्या आधारकेंद्रात घेऊन गेलो होतो.आधारकार्ड नोंदणी कुठे जावून करायची,कागदपत्रे कोणती लागतात. याचा गंधही नसलेले पालक,त्यात ते वंचित घटकातील त्यामुळे शिक्षणाची फारच अनास्था.शिष्यवृत्ती आणि शालेय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे लागणारी कागदपत्रे शाळेतच तयार करून गेले अनेक दिवस पेडिंग पडलेलं कार्य आज पुर्णत्वास गेले. आधार केंद्रावर अतिशय समंजस वृत्तीने तिथल्या ताईंनी सहकार्य केले. एका मुलाचे आधारकार्ड नोंदणी करताना त्यांचे लक्ष मुलांच्या पायाकडे गेले.त्यांंनी लगेच मला विचारणा केली.'मुलगा चपला घालून आला नाही का'  ''मॅडम होती त्याच्याकडे पण ती तुटली आहे.मी जाताना त्याला घेऊन देणार आहे.'' माझं उत्तर.  ''ती मुलं फारच गरीबा घरची दिसतायतं.''मॅडम अंदाजाने बोलल्या. आणि लगेच त्यांनी घरातील कोणालातरी संपर्क करुन बोलावून, त्या मुलाला रिक्षाने दुकानात नेहून त्याला नवीन चप्पल घेऊन दिली. अगोदर अनवाणी असणारा मुलगा थोड्याच वे...

एवढं पुकारा ओ...गुरुजी!

Image
उत्कर्ष..... एवढं पुकारा ओ….गुरुजी!   एवढं पुकारा ओ….गुरुजी! नोकरीच्या गावात,स्वताच्या गावात धार्मिक कार्यक्रमात विशेषतः लग्न समारंभ नाहीतर सामाजिक कार्यक्रमात त्यांच्या हक्काचा,हाक दिली की, हाकेला ओ देणारी व्यक्ती म्हणजे त्या गावच्या शाळेतील गुरुजी होय. साधारणपणे २५ते ३० वर्षांपूर्वी लग्नात स्वागत समारंभापेक्षा मानाचे पोशाख,आहेर,पेहरावा, नातेवाईकांची नवरदेव व नवरीमुलीला भेट आणि भावकीतल्या व्यक्तींचे मानपान करताना त्यांच्या नावाचा पुकारा माईकवरुन हमखास केला जायचा! हे काम बऱ्याचदा गावच्या शाळेतील गुरुजींना करावं लागायचं. त्यातूनच काहींच्या हातात नावं पुकरायला माईक आला.आपलाच माणूस म्हणून लोकं बोलवू लागली. बोलण्यातील तारतम्य आणि आवाजातील सफाईदारपणा लोकांना आवडू लागला. 'गुरुजी बेस काम झालं.'अशी जनमानसातील कौतुकाची थाप मिळू लागली. मग कार्यक्रमात पुकारायला गुरुजींनाच सांगायचं, याचं आवातणं मिळू लागलं.त्याचाच परिपाक म्हणजे आजतागायत कित्येक गुरुजी विविध सभा-संमेलन, लोकोत्सव कार्यक्रम, फेस्टिव्हल,लग्न समारंभ,बारशे, स्नेहसंमेलन,गॅदरिंग, विविध खेळांच्या स्पर्धा,बाल आनंद मेळावे,वाढदिवस, ...

परिसर भेट घळवी कोंढावळे

Image
आज आमच्या शाळेची सहल परिसर भेटीसाठी कोंढावळे गावातील डोंगर उताराच्या वहाळीच्या(ओढा) उगमा जवळील घळवी बघायला गेली होती. घळवीच्या डोक्यावर एक भलामोठा खडक येऊन बसलेला आहे.त्यामुळे आतमध्ये अतिशय गारवा असून पाण्याचा झिरप कमी होत आलेला आहे. आतमध्ये दहा-बाराजण आरामशीर बसतील एवढी जागा आहे.  सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे दगडातच घडीव गोल आकाराचे कुंड तयार झाले आहे. कुंड भरल्यानंतर पाणी लगतच्या भिंतीवरुन वाहत पुढे पुढे मोठ्या प्रवाहास मिळते. पावसाळ्यात तो प्रवाह पांढऱ्याशुभ्र धारेत प्रवाहित होताना अतिशय मजेशीर दिसत असतो.साधारणपणे ३० वर्षांपूर्वी याच घळवीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी वाडीतील लोकं करत होती.घळवीच्या आजुबाजुलाही मोठमोठाले ओबड धोबड दगड येऊन पडलेले दिसतात.           प्रत्यक्ष धबधबा वहात असताना त्याच्या पायथ्याला वहाळ कशी प्रवाहित होते.यांचे प्रत्यक्ष उदाहरण पहायला मिळाले.पायथ्याच्या भागात उतारती छोटीछोटी चंद्रकोरीच्या आकारात शेतीची खाचरं असून त्यातील नाचणी, वरी आणि भात ही पिकं काढलेली दिसून आली. तदनंतर पाण्याचा झिरप नसल्याने आणि जंगलातील प्राण्यांच्या वावरांमुळे...

पुस्तक परिचय क्रमांक:११६ आपण माणसात जमा नाही.

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-११६ पुस्तकाचे नांव--आपण माणसात जमा नाही लेखकाचे नांव- राजन गवस प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथम आवृत्ती/ जुलै २०१७ पृष्ठे संख्या--१७६ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१८०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ११६||पुस्तक परिचय            आपण माणसात जमा नाही लेखक:राजन गवस ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃        भारतीय कृषीसंस्कृतीशी नाळ जोडणारे ,विश्वज वासल्य, कारुण्यानं भरलेली आणि भारलेली दृष्टी ज्या साहित्यात वाचायला मिळते.वास्तवाचे दर्शन तटस्थपणे वाचकांना होते.कृषीप्रधान जगण्याकडे आतून येणाऱ्या जाणिवेने आणि दूरस्थपणे पाहण्याची क्षमता ज्या साहित्यिकांना आहे.त्यातील लौकिकार्थाने राजन गवस यांचे साहित्य लोकप्रिय आहे.    महाराष्ट्रातील गावगाड्याचं बदलतं अवकाश आणि शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण ग्रामीण भागात कसेकसे पसरले आहे.याचा उलघडा 'आपण माणसात ...

पुस्तक परिचय क्रमांक:११५ उजेड अंधाराचं आभाळ

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-११५ पुस्तकाचे नांव-उजेड-अंधाराचं आभाळ (फिरस्ती) लेखकाचे नांव-उत्तम कांबळे प्रकाशक- सकाळ प्रकाशन प्रकाशन वर्ष व आवृत्ती-दुसरी आवृत्ती/ डिसेंबर २०१७ पृष्ठे संख्या--११२ वाड़्मय प्रकार-ललित  किंमत /स्वागत मूल्य--१४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 ११५||पुस्तक परिचय            उजेड-अंधाराचं आभाळ लेखक:उत्तम कांबळे ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾 ''आभाळ अनेक आकारांचं असतं… मोकळं आभाळ,पावसाच्या ढगांनी भरलेलं आभाळ, वांझोटे ढग गोळा करणारं आभाळ, कोणत्याही क्षणी डोक्यावर कोसळणारं आभाळ वगैरे वगैरे.डोक्यावर सतत तोल सावरत राहिलेल्या आभाळाला किती किती नावं दिली आहेत….  फिरस्ती करताना मलाही वेगवेगळी आभाळं बघता आली व माणसांच्या जगातलं आभाळ.. ते कधी वेदनेने भरलेलं तर कधी मस्तीत आलेल्या मोराला नाचण्यासाठी जागा देणारं… ते कधी कोडानं भरलेलं तर कधी सौंदर्य स्पर्धेत जाऊन आल्यासारखं...कधी फक्त उजेडानं  भरलेलं तर कधी आपल्या शरीरावर फक्त अंधार आणि अं...

अक्षर नक्षत्र' दिवाळी अंक लेखन प्रसिध्दी

Image
शिक्षण विभाग पंचायत समिती वाई आयोजित नवोदित लेखक व कवी मनाच्या प्राथमिक शिक्षकांच्या 'अक्षर नक्षत्र ' २०२२ या दिवाळी अंकाचे  प्रकाशन करताना गटविकास अधिकारी श्री नारायण घोलप, सहायक गटविकास अधिकारी श्री महेश कुचेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप यादव , गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर महामुनी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री साईनाथ वाळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विष्णू मेमाणे ,शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सहदेव फणसे व  श्री राजेन्द्र दगडे, संपादिका सौ.निर्मला भांगरे मॅडम आणि संपादक मंडळ सदस्य, केंद्रप्रमुख, राजेन्द्र गायकवाड, विठ्ठल माने, रविंद्र बाबर, नवोदित कवी व लेखक, शिक्षकमित्र बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत दिवाळी अंक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यातील माझी भटकंती "कोंढावळे मुरा" या लेखास तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह,पुस्तक व दिवाळी अंक देवून गौरविण्यात आले.सर्वांचे मनस्वी आभार व धन्यवाद......  माझी भटकंती  कोंढावळे मुरा  दिनांक १९ फेब्रुवारी २०२१      कोंढावळे गावाच्या तिन्ही बाजूंनी विळखा घातलेल्या सह्याद्री पर्व...

पुस्तक परिचय क्रमांक:११४ वळीव

Image
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य  परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई  पुस्तक क्रमांक-११४  पुस्तकाचे नांव--वळीव  लेखकाचे नांव--शंकर पाटील प्रकाशक-मेहता पब्लिकेशन्स हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण डिसेंबर २०२१ एकूण पृष्ठ संख्या-१५० वाङ्मय प्रकार --कथासंग्रह मूल्य--१५०₹ 📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖        ११४|पुस्तक परिचय             वळीव  लेखक--शंकर पाटील  🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾----------------------------------------------- वैशाख वणव्याने अंगाची लाही लाही होत असते.नरड्याला सारखा सोक पडतो. ऊनाच्या काहिलीनं  छपरात नाहीतर घरातल्या पडवीत गप्प पडावं लागतं. रानवाटेतल्या फुफाट्याने सगळा धुरळा उडत असतो.झाडांच्या पानांवर धुळीचं किटाण बसलेलं असतं.भेगाळलेल्या जमिनीला तृष्णेची आस लागलेली असते. नदीनालीकोरडी ठणठणीत पडलेली असतात. सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या असतात.अन् अचानक सोसायट्याचा वारा वाहू लागतो.आभाळ भरुन येते.आणि ढगांचा कडकडाट करत  टपोऱ्या गारांचा वर...

पुस्तक परिचय क्रमांक:११३ कलाकार

Image
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य  परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई  पुस्तक क्रमांक-११३  पुस्तकाचे नांव--कलाकार  लेखकाचे नांव--रा.अ.कुंभोजकर प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती अॉक्टोंबर २०१६ एकूण पृष्ठ संख्या-१०२ वाङमय प्रकार ----ललित लेखसंग्रह मूल्य--१४०₹ 📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖        ११३|पुस्तक परिचय             कलाकार  लेखक--रा.अ.कुंभोजकर 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾 नाटक सिनेमातील चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व लाभलेले चित्रतपस्वी कलेतील भीष्माचार्य, अभिनेते,अभिनेत्री,गायक,नाटककार, दिग्दर्शक,नाटक व चित्रपट कंपनीचे मालक असलेल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या सर्जनशील मनांचा व्यक्तिवेध 'कलाकार' या माहितीपटात संपादक व पत्रकार रा.अ. कुंभोजकर यांनी करून दिलेला आहे. रा.अ.कुंभोजकरांचा हा व्यक्तिचित्रसंग्रह असून चित्र व नाट्यक्षेत्रातील नामवंत कलाकारांचा कर्तृत्वपट उलगडून दाखविण्याचे कार्य आत्मीयतेने व रसिकतेने केले आहे. ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्मानित के...