Posts

वाचनश्री पुरस्कार

Image
पुरस्कार म्हणजे कर्तृत्वाची रांगोळी..... रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी दुपारी वाचनश्री पुरस्कार वितरण सोहळा,पुणे .साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री एकनाथ आव्हाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ,डॉ संदीप सांगळे,लेखक नागेश शेवाळकर आणि शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आणि वाचन साखळी समूह संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार स्विकारला त्याची क्षणचित्रे... उपस्थित पुस्तकप्रेमी ,रसिकवाचक आणि वाचन साखळी समूहाचे कार्यकारिणी सदस्य...  शाल श्रीफळ चारहजार किंमतीची पुस्तके, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह..... पुरस्काराचे स्वरूप...

पुस्तक परिचय क्रमांक:२०४ रामाचा शेला

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२०४ पुस्तकाचे नांव-रामाचा शेला लेखक: साने गुरुजी  प्रकाशन-रिया पब्लिकेशन, कोल्हापूर  प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती-१५ऑगस्ट, २०११ पृष्ठे संख्या–२१६ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--२१०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २०४||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव-रामाचा शेला  लेखक:साने गुरुजी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚   निर्मळ पवित्र सकस अजरामर साहित्य सर्जनशील संस्कारक्षम संस्कृतीचे दर्शन  संस्कारक्षम धडे अन् अमृतमय वाणी  मुलांची हृदये जिंकली साने गुरुजींनी| अध्यापन कार्य,समाजसेवा, स्वातंत्र्ययुद्ध अशा बहुविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. संवेदनशील हृदयमनाचे समाज शिक्षक आणि साहित्यिक साने गुरुजी यांच्या अक्षरधनातील एक अनमोल ठेवा‘रामाचा शेला’ही कादंबरी अतिशय संवेदनशीलतेने  गुरूजींनी या कादंबरीचे लेखक केले आहे. गरीब कुटूंबातील उदय आणि सरला यांच्या प्रेमाची कादंबरी.सरलाच्या पाठीवर ...

शिक्षक क्षमता समृध्दी २.०

Image
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, आणि जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था फलटण तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने  प्राथमिक शिक्षकांचे(इ.१ते ५वी) सक्षमीकरण व क्षमता वृद्धि प्रशिक्षण  वर्ग क्रमांक -२  दिनांक -१० ते १४ फेब्रुवारी २०२५                चतुर्थ दिवसाचा अहवाल  दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ पार्श्वसंगीताच्या साथीने सुलभक श्री.संजय भोसले सरांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन सुरुवात झाली.तदनंतर सरांनी स्वागतगीत सादर केले.   प्रस्तावनेत क्षमता आधारित मूल्यांकनाचे प्रश्ननिर्मिती कौशल्य आणि गटकार्य यावर फीडबॅक सुलभक श्री रवींद्रकुमार लटिंगे यांनी घेतला.तसेच अहवालाचे वाचन केले. सुलभक श्री विशाल खताळ सरांनी स्कॅफ-१ शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या विषयाच्या प्रस्तावनेत समता-समानता व सर्जनशीलता -सृजनशीलता या शब्दांवर चिंतन घेतले.वरील शब्दांचाअर्थ काही शिक्षकांनी एका शब्दात, व्याख्येत व उदाहरणासह स्पष्ट केला.तदनंतर मूल्यांकन का करायचे?या...

शिक्षक क्षमता समृध्दी तृतीय दिन अहवाल

Image
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, आणि जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था फलटण तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांचे(इ.१ते ५वी) सक्षमीकरण व क्षमता वृद्धि प्रशिक्षण  वर्ग क्रमांक -२ दिनांक -१० ते १४ फेब्रुवारी २०२५                तृतीय दिवसाचा अहवाल  दिनांक १२ फेब्रुवारी २०२५  प्रशिक्षण वर्गाच्या तृतीय दिवसाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने केली.तदनंतर प्रस्तावनेत गेल्या दोन दिवसांचा फीडबॅक श्री.रविंद्र लटिंगे यांनी घेतला.अध्ययन अध्यापन प्रक्रिया, संकल्पना आणि कार्यनीती या घटकांना स्पर्शून क्षमता आधारित विचार प्रवर्तक ही तासिका सुलभक श्रीम.अश्विनी जाधव यांनी सुरू केली.मूल्यांकनासाठी प्रश्ननिर्मिती करण्यापूर्वी शिक्षकाने सजग कसे असावे.अशी प्रस्तावना करत मानवी विचार प्रक्रिया कशी घडते.यावर स्पष्टीकरण देऊन जिज्ञासा विषयी प्रश्नावर चर्चा घडवून आणली.प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांनी या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला. ब्लूम यांच्या श्रेणीब...

शिक्षक क्षमता समृध्दी द्वितीय दिवस अहवाल

Image
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, आणि जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था फलटण तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांचे(इ.१ते ५वी) सक्षमीकरण व क्षमता वृद्धि प्रशिक्षण  दिनांक -१० ते १४ फेब्रुवारी २०२५               वर्ग क्रमांक -२        द्वितीय दिवस अहवाल  प्रशिक्षणाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने करून प्रशिक्षणाला सुरुवात केली.प्रथम सुलभक श्री. दत्ता नाळे सरांनी  क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया या CBA-1 तासिकेचा फीडबॅक घेऊन आजच्या तासिकांचे वेळापत्रक सांगितले. क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन संकल्पना CBA-2या पहिल्या तासिकेची प्रस्तावना सुलभक श्री.महेश धुमाळ सरांनी पीपीटी द्वारे केली. शिक्षणाची लक्ष्ये ते अध्ययन निष्पत्ती प्रशिक्षणार्थींशी आंतरक्रिया साधत गटचर्चा केली. क्षमता म्हणजे काय? मूल्यांकन व मूल्यमापन यातील तुलना करत फरक स्पष्ट करुन दिला. मूल्यांकनाचे स्वरूप, आकारिक व संकलित मूल्यमापन आणि क्षमतेवर आधारि...

शिक्षक क्षमता समृध्दी प्रथम दिन

Image
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, आणि जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था फलटण तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा आणि शिक्षण विभाग पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांचे(इ.१ते ५वी) सक्षमीकरण व क्षमता वृद्धि प्रशिक्षण  वर्ग क्रमांक -२ दिनांक -१० ते १४ फेब्रुवारी २०२५               प्रथम दिन अहवाल  प्रारंभी मालोजीराजे शेती विद्यालय व ज् ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री.. वेदपाठक सर,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे जेष्ठ अधिव्याख्याते डॉ.सतिश फरांदे सर ,साधन व्यक्ती श्रीम.कुंभार मॅडम संस्थेचे विश्वस्त या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलन करून प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला.  प्रस्तावना सुलभक श्री.दत्तात्रय नाळे सरांनी केली.सर्वांचे स्वागत साधन व्यक्ती श्रीमती कुंभार मॅडम यांनी केले.यावेळी शिक्षकक्षमता समृध्दीमुळे शिक्षकांचे शिक्षणातील नवीन ज्ञान अपडेट राहते. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण, केंद्र व राज्य अभ्यासक्रम आराखडा शाळेच्या मूल्यांकनाचे नवीन तंत्र प्रणाली तसेच समग्...

पुस्तक परिचय क्रमांक:२०३ आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध

Image
  वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२०३ पुस्तकाचे नांव-आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध  लेखक: डॉ.जयसिंगराव पवार  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीयावृत्ती मार्च २०१८ पृष्ठे संख्या–७६ वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक लेख किंमत /स्वागत मूल्य--१००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २०३||पुस्तक परिचय              आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध         लेखक: डॉ.जयसिंगराव पवार  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 इतिहास अभ्यासक आणि संशोधक‘शाहू चरित्रकार’डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी पंचवीस पेक्षा अधिक ऐतिहासिक ग्रंथांचे लेखन केले आहे.त्यापैकीच एक ‘आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध’,हा छोटेखानी ग्रंथ इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले होते.तेंव्हा केलेल्या अध्यक्षीय अगर प्रमुख अतिथी म्हणून केलेल्या भाषणांचे लेख एकसंघ संपादित करुन ग्रंथ स्वरुपात प्रकाशित केले आहे.या ग्रंथाचा उपयोग जे इतिहासप्रेमी आणि नवं अभ्यासक आहेत त्यांना मार्गदर्शक दीपस्...