Posts

Showing posts from October, 2024

पुस्तक परिचय क्रमांक;१६२ नोबेल पुरस्कार विजेते

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१६२ पुस्तकाचे नांव-नोबेल पुरस्कार विजेते  लेखकाचे नांव- संभाजी पाटील प्रकाशन -रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर  प्रकाशन वर्ष व आवृत्ती- ऑगस्ट २०१६ प्रथमावृत्ती  पृष्ठे संख्या–४१६ वाड़्मय प्रकार-संदर्भ ग्रंथ किंमत /स्वागत मूल्य--५००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १६२||पुस्तक परिचय               नोबेल पुरस्कार विजेते          लेखक: संभाजी पाटील 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 जगात सर्वात प्रतिष्ठेचा सर्वश्रेष्ठ मानांकित आणि सर्वांत मौल्यवान पुरस्कार... म्हणजे 'नोबेल पुरस्कार'.हा पुरस्कार विजेता कोट्याधीशच होतो. दरवर्षी १० डिसेंबर या दिवशी अल्फ्रेड नोबेल यांचा स्मरणदिन. याच दिवशी हा पुरस्कार जाहीर केला जातो.मानव कल्याणासाठी शांती, साहित्य, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, चिकित्सा व शरीर विज्ञान शास्त्र आणि अर्थशास्त्र अशा सहा विभागात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या व्यक्तिला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. नोबेल पुरस्क...

पुस्तक परिचय क्रमांक:१६१ श्यामचा जीवन विकास

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१६१ पुस्तकाचे नांव-श्यामचा जीवन विकास  लेखकाचे नांव- साने गुरुजी  प्रकाशन -रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर  प्रकाशन वर्ष व आवृत्ती- ऑगस्ट २०११ प्रथमावृत्ती  पृष्ठे संख्या–१४४ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह  किंमत /स्वागत मूल्य--१४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १६१||पुस्तक परिचय               श्यामचा जीवनविकास            लेखक: साने गुरुजी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 संवेदनशील मनाचे समाजशिक्षक साने गुरुजी यांच्या लिखाणात सद्विचारांचा आणि सद्भावनांचा वर्षाव असतो. संस्कारक्षम कथांची भेट रसिक वाचकांना गोष्टीतून मिळते.त्यांचे लिखाण साधे सोपे आणि सरळ असते.त्यामुळेच लिखाणात जिवंतपणा असतो.कथा वाचताना श्रावक मंत्रमुग्ध होऊन कथेचे श्रवण करीत असतात. “श्यामचा जीवनविकास” हा कथासंग्रह  पूर्वी मन्वंतर मासिकात प्रसिद्ध झालेल्या कथांचे पुस्तक आहे.यालाच खंड-३ संबोधित केले आहे. आनंद,सहकार्य, सेवा, बंधुभा...

पुस्तक परिचय क्रमांक:१६०नि: शब्द

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१६० पुस्तकाचे नांव-नि: शब्द  लेखकाचे नांव- सप्तर्षी माळी प्रकाशन -अक्षरबंध प्रकाशन, नाशिक  प्रकाशन वर्ष व आवृत्ती- फेब्रुवारी २०२३ प्रथमावृत्ती  पृष्ठे संख्या–८८ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह  किंमत /स्वागत मूल्य--२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १६०||पुस्तक परिचय               नि: शब्द           लेखक: सप्तर्षी माळी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚    'नि:शब्द'कथासंग्रहातील कथा नावाप्रमाणेच रसिकांना नि:शब्द करतात. क्षणभर मनाला चटका लावून जातात. डोळे ओले करतात. अस का घडले असेल ?याचे चिंतन करायला लावतात. या कथा मानवी जीवनातील इंद्रधनू सारखे सप्तरंग घेऊन आकारास आलेल्या आहेत. वर्तमानपत्रात आलेल्या बातमी वरुन कथालेखकाने कथा गुंफली आहे. घटनेचे गांभीर्य वाचक मनाला हळवे करते. सभोवतालचा वर्तमान सजगतेने टिपणाऱ्या चिंतनशील कथा असतात. सामाजिक मूल्यावर विचार व्यक्त करणाऱ्या कथा आहेत   ‘जीवन म...

पुस्तक परिचय क्रमांक:१५९त्या तरुस्थळी

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१५९ पुस्तकाचे नांव-त्या तरुतळी  लेखकाचे नांव-डॉ.अश्विनी देहाडराय  प्रकाशक-साहित्य प्रसार केंद्र, नागपूर   प्रकाशन वर्ष व आवृत्ती- मे २०२० प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१३० वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य--१७५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १५९||पुस्तक परिचय          त्या तरुतळी लेखक: डॉ.अश्विनी देहाडराय  📚📚📚📚📚📚📚📚📚📚 मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचा आस्वाद “त्या तरुतळी”या पुस्तकात गुंफला आहे.  मराठी साहित्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे वनभटकंतीकार तथा लेखक मारुती चितमपल्ली आहेत. अरण्यलिपीतील पशुपक्षी, वृक्षवेली,वने, कीटक,मधमाश्या,भुंगे,सर्पसृष्टीचे आणि अनवटवाटांची वर्णने अफलातून असतात. त्यांचे लेखन वाचताना वाचकाला जंगल सफारी घडते.जीवनाच्या रुळलेल्या वाटा सोडून स्वतःची वेगळी तेजस्वी पायवाट निर्माण करणारे वनाधिकारी. निसर्गसृष्टीत आयुष्य खुलवलेले भटकंतीकार आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद लेखणीतून उतरवणारे लेखक मारुती...

पुस्तक परिचय क्रमांक:१५८ वारी

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१५८ पुस्तकाचे नांव-वारी  लेखकाचे नांव-डॉ.वसुधा वैद्य  प्रकाशक-कॉन्टिनेन्टल प्रकाशन , पुणे   प्रकाशन वर्ष व आवृत्ती- एप्रिल २०२४ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–२६० वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--३५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १५८||पुस्तक परिचय          वारी  लेखक: डॉ. वसुधा वैद्य  📚📚📚📚📚📚📚📚📚📚 विठू माझा लेकूरवाळा|संगे भक्तांचा मेळा|| गजर हरीनामाचा,गजर  भक्तीचा,जय हरी विठ्ठल.माऊली माऊली….असा मुखाने नामोस्मरण करत दिंड्या पताका खांद्यावर घेत ,टाळमृदंगाचा गजर करीत अवघा जनसमुदाय आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतो…त्या वारीचा आनंदाचा सोहळा! वारकरी परंपरा असलेल्या गोविंदपंतांच्या पंढरीच्या वारीच्या दिंडी सोहळ्याचे शब्दचित्र भावस्पर्शी शब्दात संतसाहित्याच्या व्याख्याता तथा लेखिका डॉ.वसुधा वैद्य यांनी रेखाटले आहे.लेखिकेच्या कुटूंबातच त्यांना वारीचे संस्कारित संचित लाभले आहे.त्याम...