पुस्तक परिचय क्रमांक:१५७ संघर्षाची मशाल हाती

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१५७ पुस्तकाचे नांव-संघर्षाची मशाल हाती लेखकाचे नांव-नरसय्या आडम शब्दांकन: दत्ता थोरे व संतोष पवार प्रकाशक-समकालीन प्रकाशन , पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०२३ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–३०४ वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र किंमत /स्वागत मूल्य--४००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १५७||पुस्तक परिचय संघर्षाची मशाल हाती लेखक: नरसय्या आडम शब्दांकन: दत्ता थोरे व संतोष पवार 📚📚📚📚📚📚📚📚📚📚 कामगारांसाठी दिवसातील बारा-चौदा तास काम करणारे आणि दरवाजे कोणासाठीही केंव्हाही उघडे ठेवणारे माकपचे लढवय्ये नेते म्हणून नरसय्या आडम मास्तर यांची जनसामान्यांत ओळख आहे.उभं आयुष्य कामगार चळवळीला वाहिलेला नेता. कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढलेल्या झुंजार नेत्याची कहाणी संघर्षाची मशाल हाती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे जोशपूर्ण आवेशात व्यासपीठ गाजविणारे क्रॉमेड नरसय्या आडम मास्तर; पोटतिडकीने आपले विचार शासन द...