Posts

Showing posts from April, 2023

पंगत जेवणाची गंमत मेजवानीची पितृपक्षातील पंगत

Image
पंगत जेवणाची गंमत मेजवानीची पितृपक्षात तर महाळाला  सकस भोजनाची मेजवानी असते.यालाच महालय श्राद्ध असेही म्हटले जाते. भारतीय संस्कृती पितृपक्षाचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.भाद्रपद मासातील दुसऱ्या कृष्ण पंधरवडयास पितृपक्ष म्हणतात.यात भरणी श्राद्ध आणि महाळ श्राद्ध असते.पितरांना जेवायला घालण्याबरोबरच भावकी आणि मित्र परिवारालाही आवातणं दिलेलं असतं. केळीच्या पानावर वाढलेल्या पदार्थांची रेलचेल असते. पानाभोवती रांगोळी काढली जाते.अगरबत्तीचा मंद सुवास दरवळत असतो. केळीच्या पानावर फळांचे काप,आल्याचे तुकडे, काकडीचे काप, शाकाभाज्या, कढी,आमटी,अळुची वडी आणि  बाकरवडी,बेसण पीठाच्या थापलेल्या वड्या, तळण,पापड,मेथीची भाजी, खीर, वरणभात, गोडाचा पदार्थही खास असतो.पुरणपोळी,श्रीखंड पुरी, बालुशाही, खीर चपाती,गुलाबजाम यापैकी काही नसेलतर निदान शिरा (रवा) तरी असतोच.   या महाळाच्या पंधरवड्यात दररोज कुणाच्या ना कुणाच्या घरी घरगुती पंगती उठत असतात.संपूर्ण शाकाहारी पौष्टिक भोजन.षडरिपुयुक्त हे भोजन असते. तिखट, आंबट,कडू,गोड,तुरट आणि खारट अशी चव असणारे भाजलेले, तळलेले, शिजवलेले, परतलेले, उकडलेले पदार्थ...

इयत्ता सातवी निरोप समारंभ शाळा कोंढावळे २०२३

Image
     इयत्ता सातवी विद्यार्थी निरोप समारंभ कोंढावळे प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ प्रमुख अतिथी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री.विलास पोळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी त्यांनी मुलांना शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन करुन गावाचे नाव उज्ज्वल करा.तुमच्या बालजीवनात संस्कारक्षम अक्षरधन पेरणाऱ्या शाळा आणि गुरुजनांचे ऋण,पितृऋण,मातृऋण आणि मायभूमीचे ऋण कधीही विसरू नका.ज्ञानवंत आणि गुणवंत व्हा.असे विचार प्रतिपादन करुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!यावेळी श्री.सुनील जाधव सरांनी अनुभव कथनपर मनोगत व्यक्त केले.तर  वर्गाध्यापक तथा मुख्याध्यापक श्री रविंद्रकुमार लटिंगे यांनी''वाचन आणि माणुसकीचे आभाळ कसं जपावं'', याविषयी मुलांशी हितगुज केले.अपर्णा कोंढाळकर, तेजस्विनी कोंढाळकर व श्रेया कोंढाळकर यांनी अनुभव कथनपर मनोगत व्यक्त केले. सातवीच्या मुलांनी श्री.सुनील जाधव सर,सौ.वर्षा पोळ मॅडम,सौ.नलिनी मुसळे मॅडम आणि स्वयंपाकी पूजा कोंढाळकर यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान केला. विद्यार्थ्यांनी शाळेला एक आठवण भेट म्हणून एक सतरंजी दिली.स्वागत...

पंगत जेवणाची गंमत मेजवानीची सामिष भोजनाची पंगत

Image
      पंगत जेवणाची गंमत मेजवानीची कंदुरी,जागरण,गोंधळ,देवादिकांच्या जत्रा आणि जावाळ वाढवायचा (काढणे) वेळी सामिष जेवणाची पंगत असायची.बकऱ्याचे उक्कड सुक्के मटण, तर्रीबाज लालभडक पातळ रस्सा,भात आणि शाळूची चुलीवर केलेली कडक पापुड्याची खरपूस भाजलेली भाकरी असा झणझणीत आणि चमचमीत बेत असायचा.जेवताना हमखास कपाळावर घाम यायचाच. पुर्वी तालमीच्या परिसरात सामिष जेवणाच्या पंगती व्हायचा.त्याचीच ही झलक:   तालमीच्या बाहेर अंधुकश्या लाईटच्या बलाच्या नाहीतर गॅसबत्तीच्या उजेडात दोन-तीन ओळींची शंभरसाठ माणसांची पंगत मातीतच धरलेली असायची.जेवायला जाताना पितळी (खोलगट ताट),भाकरी आणि कांदे घेऊन जायला लागायचे.रस्सा वाढणारा बादलीतून आणलेला पातळसर रस्सा ढवळून बास म्हणस्तवर पितळीत दांड्याच्या पातेल्याने ओतायचा. रस्स्याने पार पितळी अर्धी भरायची.मग पितळीला खाली दगडाचं वटकावून लावायचं.त्यानं खाली रस्सा निम्म्या पितळीत अन् वरच्या  मोकळ्या जागेत भाकरी ठेवायची.रस्स्यात एकदा दुसरा मटणाचा नळीपुंगळीसारखा मऊ तुकडा घावायचं.तेवढ्यात प्रसाद म्हणून खोबरं आणि शिजलेल्या मटणातील काळीज अन् फुफ्फुसाचे बारीकबारीक के...

पंगत जेवणाची गंमत मेजवानीची, हरिनाम सप्ताहातील महाप्रसाद

Image
पंगत जेवणाची गंमत मेजवानीची          हरिनाम सप्ताहातील महाप्रसादाची पंगत….. पारायण सोहळ्यातील पंगत ही तर महाप्रासादिक पंगत म्हणून भाविकांच्यात अग्रमानांकित आहे. पंचक्रोशीतील भाविक अवघा जनसमुदाय हरिनाम सप्ताहाच्या समारोपाच्या काल्याच्याकिर्तनाला आणि महाप्रसादाला आवर्जून उपस्थित असतात.संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथराज पारायण सोहळ्याची सांगता महाप्रसादाने होते. काही ठिकाणी तर हजारो भाविक भक्तांची सोय केली जाते.काही ठिकाणी ही पंगत दुपारी किंवा रात्रीची आयोजित करतात.त्या भोजनाची गोडीच अवीट असते.       भली मोठी पंगत देवळाच्या पुढे टाकलेल्या मंडपात बसायची.एकाच वेळी चारशेपाचशे माणसं एकदम जेवायला बसलेली असतात. पिंपरणीच्या झाडाखाली शाळेच्या समोर चुलवान काढलेलं असायचं.(चुलवान म्हणजे दहा एक फुटाचा सरळ चर काढलेली जागा)त्यावर तांब्याच्या तपेल्यात भात शिजत असायचा तर दुसऱ्या तपेल्यात आमटी रटरट उकळत असायची.गावातीलच जाणती माणसं आचारी काम करायची.तेंव्हा आजच्या सारखे व्यावसायिक आचारी नव्हते. गावातल्या कार्यक्रमात जे जेवणं बनवायचे तीच दहाबाराजणं भट्टीवर राबायचे. त्यांच्य...

पंगत जेवणाची गंमत मेजवानीची , लग्नातली पंगत

Image
पंगत जेवणाची गंमत मेजवानीची           लग्नातली पंगत गावातल्या लग्नातल्या पंगतीत जेवणाची मजा तर काही औरच असते.ते ही लगीन चिठ्ठी आणि आमंत्रण नसतांना पोरसवदा वयात जाणं म्हणजे धमाल असायची. घरासमोर मांडव घातलेला असायचा. त्याच्याच एका बाजूला सावलीत नाहीतर जवळच्या छपरात आचाऱ्याने जेवणासाठी भट्टी पेटवलेली असते.बॅरलमध्ये पाणी भरून ठेवललं असतं. दोस्तांबरोबर लग्नाला गेल्यावर लगीन लागण्याची वाट सगळी बघत असतात.लग्न लागल्यावरच पंगती बसणार असतात.आम्ही पोरं त्याचीच वाट बघत असतो.'तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव' । असं कानी पडताच बॅण्डवाले वाजवतात आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू झालेली असते. याच गलबल्यात माणसं जेवायसाठी पंगतीला घाईगडबडीत बसतात.तरुण मंडळाची पोरं वाढपी असतात. माईकवरुन एक जाणकार बाप्पा मोठ्या आवाजात आरडत सूचना देत असतो.त्यापरमाणे सगळे वाढपी ऐकत असतात.गोंधळात जागा मिळवायला धावपळ करावी लागते.       मंडपातच पंगत बसलेली असते.वाऱ्याच्या झुळकीबरोबर मातीही व चगाळ चोथाही उडत असतो. स्पिकरवर उडत्या चालीची गाणी वाजत असतात.  पत्रावळी वाढणारी पोरं एक...

पंगत जेवणाची गंमत मेजवानीची,सवाष्णीची पंगत

Image
पंगत जेवणाची गंमत मेजवानीची            सवाष्णीची पंगत    त्यांचं बारशाच्या पंगतीतल्या जेवणाचे वर्णन ऐकताना माझं मन बहुविध पंगतीतल्या मेजवानीची खासियत कशी चवदार व स्वादिष्ट असते.त्या पंचपक्वन्नाच्या थाळीकडे  आशाळभूतपणे डोकावत होते.खरोखरीच सुखदुःखाच्या अनेक धार्मिक, सार्वजनिक आणि सामाजिक कार्यांत कारणपरत्वे अनेक पंगती उठत असतात. यजमान(अन्नदाते) बल्लवाचार्याकडून खास पदार्थ व्यंजने बनवून घेतात.आणि आदरातिथ्याने वाढतात.आग्रह करून खिलावतात.जिभेवर रेंगाळलेल्या पंगतीतल्या खास पदार्थांची शाब्दिक मेजवानीची बरसात आपल्या साठी खास..    गावोगावी देवदेवतांच्या सवाष्णी घालण्याची गावच्या यात्रेनिमित्त,मुलामुलींच्या लग्नाच्या प्रित्यर्थ किंवा धार्मिकविधी प्रसंगी प्रथा आहे.खास सुग्रास पुरण पोळीचा बेत केलेला असतो.घरातील महिला मंडळ (आई,पत्नी,बहीण, आजी, काकी) सकाळी पहाटे उठून जेवण रांधत असतात.एकमेकिंना मदत करत सगळे पदार्थ मनापासुन बनवतात.त्याच पदार्थांची ही काव्यरचना..  तेलची पुरणपोळी कटाची आमटी काळसर गुळवणी बटाट्याची भाजी  खमंग कांदाभजी,लिंबाची...

पंगत जेवणाची गंमत मेजवानीची पुरणपोळी

Image
पंगत जेवणाची गंमत मेजवानीची               पुरणपोळी   विविधांगी पंगतीत जेवण्याची मजाच काही और असते.धार्मिक कार्य, लग्न,बारसं, वाढदिवस,मेळावे, कंदुरी,ऊरुस,उद्घाटने, यात्राजत्रा, आणि सुखदुःखाच्या प्रसंगी निमंत्रक स्नेहभोजनासाठी आमंत्रित करत असतात.पैपाहुणे मित्रपरिवारा सोबतीने गप्पा मारत आस्वाद घेणं म्हणजे सुखाचे घास मुखात घेणं होय.             असाच एकदा एकदीडचा सुमार असेल ओढ्या पलीकडच्या वस्तीवर चालत निघालो असताना ओळखीच्या गृहस्थाने समोरून येताना,'गुरुजी ऊन्हातान्हात एकटंच कुठं निघालाय.' "अहो जरा पलीकडील वस्तीवरुन जाऊन येतो. तिथली दोनतीन मुलं शाळेत येत नाहीत.अन् तुम्ही कुठं गेला होता. अंगावर नवी कापडं अन् कपाळाला गंध दिसतोय.  माझं त्यांना पुसणं.असं म्हणल्याव त्यांनी हुकार दिला.त्यांचा होकार आल्यावर पुढे मी म्हणालो  की," काय सत्कार्य बित्कार झाला काय तुमचा?" त्यांच्या गळ्यात अडकवलेल्या शाल पाहून चौकशी स्वरुपात विचारले.लगेच ते म्हणाले की,"आवं, गुरुजी गेलो हुतं सोयऱ्याकडं.आमच्या एका लांबच्या नात्यातल्या सोयऱ्याच्य...

पुस्तक परिचय क्रमांक:१२० काचवेल

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १२०||पुस्तक परिचय           काचवेल लेखक: आनंद यादव  ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२० पुस्तकाचे नांव–काचवेल  लेखकाचे नांव- आनंद यादव प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जानेवारी, २०१७ पृष्ठे संख्या--३२४ वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र, चौथा खंड किंमत /स्वागत मूल्य--३२० ₹ """""""""""""""""""""""""""""""  काचवेल" हे विख्यात साहित्यिक आनंद यादव यांचे आत्मचरित्रात्मक चौथे चरण आहे.हा जीवनपट त्यांनी संत शिरोमणी कैवल्याची संजिवनी श्री ज्ञानदेवांच्या पवित्र चरणी अर्पण केला आहे. नव्या घरातील सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात ' काचवेल'काढण्याची लोकप्रथा आहे.कांकणांच्या काचतुकड्यांनी ही वेल रेखाटली जाते.ही वेल वंशवेलीचंही प्रतीक असते.त्या घराची गृहिणी नकळत स्वत:ला वंशवेल...